Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

भारतातील पहिला एक कोटी रुपये बजेट असलेला सिनेमा

 भारतातील पहिला एक कोटी रुपये बजेट असलेला सिनेमा
बात पुरानी बडी सुहानी

भारतातील पहिला एक कोटी रुपये बजेट असलेला सिनेमा

by धनंजय कुलकर्णी 10/11/2023

बॉलीवूड आणि काळा पैसा यांचं नातं खूप जुनं आहे अगदी सिनेमाच्या सुरुवातीपासून ! सत्तरच्या दशकात तर अनेक अंडरवर्ल्डचे डॉन चित्रपटात पैसा गुंतवत होते. नव्वदच्या दशकात त्याचा कहर झाला होता. तेच लोक बॉलीवूड चालवत होते. कुणीही निर्माता ऑफिशिअल चित्रपटाचे बजेट कधीही सांगत नव्हते. अंडरवर्ल्ड, भ्रष्टाचारी लोकांना काळा पैसा पांढरा करण्याचा एक गोरख धंदा एक राजमार्ग म्हणजे चित्रपट तयार करणे असे सूत्र बनले होते. असं असतानाही अगदी साठच्या दशकाच्या शेवटी एका निर्मात्याने आपल्या चित्रपटाचा एकूण खर्च एक कोटी झाला आहे असे जाहीर रित्या सांगितले होते. (Indian Cinema Budget)

खरंतर त्याच्यासाठी  ही एक मोठी रिस्क होती कारण हा एवढा पैसा तुझ्याकडे आला कुठून असे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट त्याला विचारू शकत होते. पण त्याने ही हिम्मत दाखवली. अर्थात त्या काळात अनेक चित्रपटांची निर्मिती ही करोडो रुपयांची होत होतीच. पण हे निर्माते कधीही आपल्या चित्रपटाला एवढा खर्च झाला असे दाखवत नव्हते. ते कायम आपला चित्रपटाचा खर्च लाखांमध्ये दाखवत होते. असे असताना या निर्मात्याने मात्र धाडसाने आपल्या चित्रपटाला एक कोटी रुपये खर्च झाले आहेत असे सांगितलेच आणि त्याचे जाहीर प्रकटन त्याने आपल्या सिनेमाच्या पोस्टवरच केले ! त्यामुळे हा भारतातील पहिला ऑफिशियल एक कोटी रुपयांचा चित्रपट ठरला! हा चित्रपट कोणता होता? आणि कोणत्या निर्मात्याने हे धाडस दाखवले ? त्याचाच हा भन्नाट किस्सा.

खरंतर साठच्या दशकामध्ये कितीतरी बिग बजेट सिनेमा बनत होते. उदाहरणार्थ मुघल ए आजम, गंगा जमुना, संगम…. परंतु याच्या निर्मात्याने कधीही आपल्या सिनेमाचे खरे बजेट सांगितलेच नाही. पण १९६९ साली प्रदर्शित झालेल्या यांच्या ‘तलाश’ या चित्रपटाचे बजेट एक कोटी आहे आणि तो पैसा सिनेमा निर्मितीसाठी खर्च झाला आहे असे सांगितले गेले. या सिनेमाचे निर्माते होते ओ पी रल्हन. त्यांनी तर या सिनेमाच्या पोस्टरवरच एक कोटी रुपये खर्च असे जाहीर केले होते. त्यामुळे ही भारतातील पहिली ऑफिशियल एक कोटी रुपयांची मूवी होती.

या सिनेमांमध्ये राजेंद्रकुमार, शर्मिला टागोर, बलराज सहानी, ओ पी रल्हन, हेलन, जीवन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. शर्मिलाचा या सिनेमात डबल रोल होता. या चित्रपटातील गाणी मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिली होती तर संगीत सचिन देव बर्मन यांनी दिले होते. या सिनेमाची गाणी अतिशय अप्रतिम बनली  होती. पलको के पीछे से क्या तुमने फरमाया फिर से तो फरमाना, आज तो जुनली रात मा धरती पार है आतमा, खाई है रे हमने कसम संग रहने की, उसको नही देखा हमने कभी पर उसकी जरूरत क्या होगी वो मा तेरी सुरत से अलग भगवान की सुरत क्या होगी…. ही आणि अशी अप्रतिम गाणी या चित्रपटात होती. (Indian Cinema Budget)

त्या काळात राजेंद्र कुमारचा प्रत्येक सिनेमा हा सिल्वर जुबली होत असल्यामुळे त्याला जुबली कुमार असेच नाव पडले होते. परंतु एवढा खर्च करून देखील हा चित्रपट मात्र सुपरफ्लॉप झाला. त्या काळात तरी या सिनेमाला फारसे यश मिळाले नाही. नंतर सत्तरच्या दशकात मात्र मॉर्निंग मॅटीनी शोमध्ये हा संपूर्ण देशात अनेक ठिकाणी पुन्हा रिपीट रनला सिनेमा येत होता. त्या काळात याची गाणी देखील खूप गाजली गेल्यामुळे या सिनेमाला नंतर चांगले यश मिळत गेले. पण ज्यावेळी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता त्यावेळी मात्र या सिनेमाने अगदी आठवड्याभरातच मान टाकली होती. या सिनेमाचं एक मराठी कनेक्शन म्हणजे यातील आईची भूमिका सुलोचना लाटकर यांनी केली होती आणि त्यांच्यावर ‘मेरी दुनिया है मां तेरे आंचल में.. हे अप्रतिम गीत जे सचिन ते बर्मन यांनी स्वतःच्या स्वरात गायलं होतं, चित्रित झालं होतं. तसेच या चित्रपटातील एका शास्त्रीय गाण्यांमध्ये शाहू मोडक यांचे दर्शन झाले होते. हे गाणं त्यांच्यावर चित्रित होतं. गाण्याचे बोल होते ‘ तेरे नैना तलाश कर….’ 

============

हे देखील वाचा : मनोज कुमारमुळे बदललं प्रेम चोप्रा यांचं आयुष्य

============

शर्मिला टागोर ची चांगली अदाकारी देखील चित्रपटाला त्या काळात यश मिळवून देऊ शकली नाही ! एक कोटी रुपये बजेट असलेला आणि ऑफिशिअल तसे डिक्लेअर करून बनवलेला ‘तलाश’ मात्र सुरुवातीला सुपर फ्लॉप झाला होता.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood budget Celebrity Entertainment Featured India first film
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.