अमिताभ यांनी मुलाच्या नाही तर चक्क मुलीच्या नावावर केली वास्तू
अमिताभ बच्चनने आपला जुहू येथील दहाव्या रस्त्यावरील बंगला आपली मुलगी श्वेता बच्चन हिच्या नावावर केल्याने त्यातून त्याचे आपल्या मुलीवरचे निस्सीम प्रेम दिसून आले आणि पिता व मुलगी या नातेसंबंधाची चर्चाही काही प्रमाणात सुरु झाली. प्रत्येक माणसासाठी आपलं घर हे आपल्या कुटुंबातीलच एक नातेवाईक असते. आयुष्यातील एक महत्वाचा भाग असतो. उभ्या वा बैठ्या चाळीपासून बंगल्यापर्यंत हीच भावना. स्टार वा सेलिब्रिटीज याला अपवाद नाहीत. हा बंगला ८९०.४७ चौरस फूट बाय ६७४ चौरस फूट असा लंबा चौडा. देखणा आणि वास्तुशास्त्राचा सकारात्मक प्रत्यय देणारा. (Amitabh)
अमिताभचे प्रतिक्षा बंगल्याशी असलेले घट्ट नाते कायमच चर्चेत असते. आमचे गिरगावकर दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्या बंगलोर येथील ‘कुली’च्या सेटवर २६ जुलै १९८२ रोजी एका मारहाण दृश्यात पुनीत इस्सारचा ठोसा चुकवण्याच्या प्रयत्नात टेबलाचा कोपरा पोटात लागल्याने जीवावर बेतलेल्या अपघाती आजारातून बरं वाटल्यावर अमिताभने याच प्रतिक्षा बंगल्याच्या खिडकीतून प्रत्येक रविवारी संध्याकाळी चाहत्यांना दर्शन देणे सुरु केले आणि अनेक जणांनी प्रत्येक रविवारी अमिताभला सदिच्छा देण्यास गर्दी केली. ( ही प्रथा आजही सुरु आहे. फरक इतकाच की, आता जलसा बंगल्यावर अमिताभ चाहत्यांचे प्रेम, सदिच्छा स्वीकारतात. बंगला बदललाय. पण अमिताभ तोच आहे.) (Amitabh)
हा बंगला १९७६ साली बांधला गेला हे खुद्द अमिताभ बच्चननीच काही वर्षापूर्वीच आपल्या एका ब्लॉगवर म्हटले. या ‘प्रतिक्षा’मधील झाड पडले यावर त्यांनी ब्लाॅगच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. (त्यात या बंगल्याचे नाव प्रतिक्षा का याचेही उत्तर मिळेल.) २०१९ मधील मुसळधार पावसाने अमिताभ बच्चन यांच्या ‘प्रतिक्षा’ या बंगल्यातील एक ४३ वर्षे जुने झाड पडले. याबाबत अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये बरंच काही म्हटलं. त्यातील काही गोष्टी अशा, ‘1976 में जिस दिन हम अपने पहले घर में आए थे, जिसे इस पीढ़ी ने कभी खरीदा और बनाया था, और इसे अपना कहा था। इसे एक पौधे के रूप में लगाया गया था, तब ये सिर्फ कुछ इंच ऊंचा था…और इसे लॉन के बीच में लगाया गया था, जो कि संपत्ति के आसपास है। (Amitabh)
‘कविता के शब्द पर रखा घर का नाम आगे उन्होंने लिखा, ‘बाबूजी ने घर को देखा क्योंकि हमने उन्हें और मां जी को साथ रहने के लिए बुला लिया था और हमने इसका नाम प्रतीक्षा… रखा। जो कि हमने उनकी लिखी एक कविता की पंक्ति से लिया था। जो इस तरह थी… “स्वागत सबके लिए यहाँ पर, नहीं किसी के लिए प्रतीक्षा”…’ बच्चों की शादी भी इसके करीब ही हुई आगे उन्होंने बताया कि ये पेड़ किस तरह उनके हर सुख-दुख का साक्षी बना। उन्होंने लिखा, ‘बच्चे इसके आसपास खेलकर बड़े हुए… इसी तरह पोते-पोतियां भी… उनके जन्मदिन और त्योहारों की खुशियां भी इस गुलमोहर के सुंदर पेड़ के चमकीले नारंगी फूलों के साथ सजी हुई हैं, जो कि गर्मियों के दौरान खिलते थे। बच्चों की शादी भी बस इससे कुछ ही फीट की दूरी पर हुई थी… और ये अभिभावक की तरह उनके ऊपर खड़ा हुआ था…’ दुख की वजह से झुक गई थीं इसकी शाखाएं ‘इसकी शाखाएं दुख और शोक के भार से झुक गई थीं, जब इसके वरिष्ठ बाबूजी, मां जी… चले गए थे… उनके जाने के 13 और 12 दिन बाद हुई उनकी प्रार्थना सभा के दौरान सभी इसकी छाया में खड़े थे… होलिका… जब होली के उत्सव के एक दिन पहले बुरी शक्तियों को जलाया जाता है, इसी तरह दीपावली की सारी रोशनी इसकी शाखाओं को निहारती थी… सत्यनारायण की पूजा और शांति और समृद्धि के लिए किए गए हवन भी इसके आसपास होते थे।’बिना किसी को नुकसान पहुंचाए चुपचाप गिर गया ‘और आज वो सभी दुखों से दूर है… ये चुपचाप गिर गया… बिना किसी आत्मा को नुकसान पहुंचाए… नीचे फिसला और वहां अचेत हो गया…जिन फूलों को खुद इसने समृद्ध किया था, वही आसपास बिखरे हुए थे… इसकी शाखाएं और पत्तियों ने मानसून की बौछारों के बाद भी इसका साथ नहीं छोड़ा… शांत… विशाल… और अपनी मौत पर उदार…’
आगे उन्होंने एक कविता के रूप में इस पेड़ का महत्व बताया, उन्होंने लिखा… ‘उँगली भर कोंपल, लगाई थी हमने, इस बहु सुंदर गुलमोहर वृक्ष की, चालीस तीन बरसों तक साथ दिया उसने, आज अचानक हमें छोड़ दिया उसने। ऐतिहासिक वर्ष बिताए थे हमने, इसकी सुगंधित छात्र छाया में, शोक है, दर्द है, फिर से उगाएँगे, हम, इक नयी कोंपल पल भर में। उसके अस्तित्व की सुंदरता हमारे साथ होगी ‘सूचीविहीन… निर्जीव और अलग… उत्तर की रेगिस्तानी भूमि के एक महल ने मुझे उसी की तरह का पौधा रोपने के लिए प्रेरित किया था…(Amitabh)
प्रत्येक माणसाचे आपल्या घराशी कमालीचे भावनिक नाते असतेच. सेलिब्रिटीजनाही ‘आपले घर ‘ विलक्षण प्रिय. याच प्रतिक्षा बंगल्यात अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय यांचे लग्न अगदी धुमधडाक्यात पार पडले. लाईव्ह टेलिकास्टमुळे प्रतिक्षा ते जलसा बंगल्यापर्यंतचा सगळा उत्साह जनसामान्यांपर्यंत पोहचला. लग्नाचा थाटमाट भारी होता. शहेनशाहच्या मुलाचे विश्वसुंदरीशी लग्न झाले, त्यात हा बंगला महत्वाच्या भूमिकेत.
काही वर्षांपूर्वी या बंगल्यालगतचा रस्ता वाहतुकीसाठी वाढवताना बंगल्याचा काही भाग द्यावा लागेल हे वृत्त फार गाजले.
===========
हे देखील वाचा : दोन कडक डायलॉग आणि थिएटरमध्ये टाळ्यांचा गडगडाट
===========
२०२२ च्या अमिताभच्या वाढदिवसानिमित्त एका हिंदी डिजिटल चॅनेलसाठी ‘विशेष कव्हरेज ‘ म्हणून या बंगल्याबाहेर काही शूटिंग करायचं ठरवलं आणि पूर्वपरवानगीने ते केले. तेव्हा मी रोमांचित झालो. ही वास्तू मुंबईची एक ओळख आहे. जुहू परिसरातच अमिताभचे प्रतिक्षा, जलसा, जनक हे बंगले आहेत. सातत्याने मेहनत करीत आणि आपल्या गुणवत्तेचा अधिकाधिक सदुपयोग करीत त्याने हे आणि इतर वैभव प्राप्त केले आहे.
अनेकांचा मला प्रश्न असतो, अमिताभच्या शेजारी कोण राहतो ? प्रतिक्षा बंगल्याच्या मागील बाजूने डावीकडे वळल्यावर सुजीतकुमारचा बंगला आहे. (Amitabh)
आजच्या चित्रपट रसिकांना सुजीतकुमार कदाचित माहित नसावा. ‘आराधना’मध्ये मेरे सपनो की रानी कब आयेगी तू गाण्यातील राजेश खन्नाचा मित्र म्हणून त्याने भूमिका साकारलीय. सत्तरच्या दशकात हिंदी चित्रपटात लहान मोठ्या भूमिका साकारत असतानाच त्याने भोजपुरी चित्रपटाचा नायक म्हणून चांगले यश प्राप्त केले तेव्हा त्याने हा बंगला बांधला. नव्वदच्या दशकात त्याने आम्हा सिनेपत्रकारांना आपल्या या बंगल्याच्या हिरवळीवर छान पार्टी दिली तेव्हा त्या बाजूने म्हणजे मागच्या बाजूने प्रतिक्षा बंगला पाहता आला. आज या परिसरात जाताना प्रतिक्षा बंगल्यावर नजर पडतेच आणि सुजीतकुमारची आठवण येते.