दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
यामुळे मेहबूब यांच्या ‘अमर’ चित्रपटातून मीनाकुमारी बाहेर पडली.
निर्माता दिग्दर्शक मेहबूब हे चाळीस आणि पन्नास या दशकात या देशातील फार मोठे प्रस्थ होते कारण त्यांच्या सिनेमाचा मोठा बोलवाला भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात देखील होता. त्यांनी अतिशय अप्रतिम असे चित्रपट बनवले होते. नूरजहाँ सोबतचा ‘अनमोल घडी’ हा त्या काळातील सुपरहिट सिनेमा ठरला होता. (Mehboob)
स्वातंत्र्यानंतर त्यांनी अनोखी अदा, अंदाज, आन, अमर, मदर इंडिया हे चित्रपट दिग्दर्शित केले जे आजही भारतीय सिनेमाच्या इतिहासातील महत्वपूर्ण चित्रपट आहेत. त्याकाळात प्रत्येक जण त्यांच्या चित्रपटात काम करण्यासाठी उत्सुक असे. अभिनेत्री मीनाकुमारीला देखील मेहबूब यांच्या चित्रपटात काम करायला आतुर होती. खरंतर तिला एकदा संधी मिळाली होती पण नंतर ती या चित्रपटातून बाहेर पडली. चित्रपट होता ‘अमर’.
१९५४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची दिलीप कुमार, मधुबाला आणि मीनाकुमारी अशी ओरिजनल स्टार कास्ट होती. या सिनेमाची काही रिळे चित्रीकरण देखील झाले होते. परंतु नंतर मीनाकुमारीला या चित्रपटातून बाहेर पडावे लागले. याचे कारण तिने या सिनेमासाठी दिलेल्या तारखा कमाल अमरोही यांच्या ‘दायरा’ चित्रपटासाठी सुद्धा दिलेल्या होत्या. दोन्ही तारखा clash होऊ लागल्या. त्यामुळे तिला एक चित्रपट सोडणे भाग होते. साहजिकच आपल्या नवऱ्याचा चित्रपट तिने स्वतःकडे ठेवला आणि मेहबूब यांच्या ‘अमर’ या चित्रपटातून मीनाकुमारी बाहेर पडली. त्या काळात अभिनेते आणि अभिनेत्री स्वतःचे पर्सनल सेक्रेटरी ठेवत नसत. तसा ट्रेंडच नव्हता. (Mehboob)
त्यामुळे घरातील कुणी जवळचे नातेवाईकच सेक्रेटरी चे काम करत असे. तीच व्यक्ती चित्रपटाच्या डेट्स बाबत निर्मात्यांशी बोलत असे. मीनाकुमारी चे वडील हे काम करत असत. परंतु त्यांच्याकडून इथे चूक झाली आणि मीनाकुमारीच्या हातातून ही संधी गेली. नंतर हि भूमिका निम्मी या अभिनेत्रीला देण्यात आली. महबूब यांच्या चित्रपटात काम करण्याची मीनाकुमारी ची इच्छा मात्र अधुरीच राहिली. जेव्हा मीनाकुमारी या चित्रपटातून बाहेर पडली. तेव्हा तिच्या जागी कोणत्या अभिनेत्रीची निवड करावी असा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा राजकपूर ने नर्गिसचे नाव या भूमिकेसाठी सुचवले पण नर्गिसने ती भूमिका नाकारली. (Mehboob)
==========
हे देखील वाचा : यामुळे दिग्दर्शकाने नीतू सिंग सोबतचे सिनेमाचे कॉन्ट्रॅक्ट फाडले
=========
मेहबूब यांना नर्गिस आपल्या चित्रपटासाठी हवीच होती म्हणून त्यांनी लक्षात ठेवून पुढे काही वर्षांनी बनवलेल्या मदर इंडिया या चित्रपटात नर्गिसला लीड भूमिका देऊन तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम भूमिका तिला साकारायला दिली. ‘अमर’ या चित्रपटातील मीनाकुमारीला ऑफर झालेली भूमिका खरोखरच खूप सुंदर होती. ती भूमिका एका पीडित तरुणीची होती. आपल्याच प्रियकराकडून झालेल्या अत्याचाराने ती त्रस्त असते. मीना कुमारी ने ही भूमिका खूप चांगल्या पद्धतीने केली असती. या चित्रपटातील गाणी शकील बदायुनी यांची होती तर संगीत नौशाद यांचे होते. इंसाफ का मंदिर है ये भगवान का घर है, ना मिलता गम तो बरबादी के अफसाने कहा जाते, जाने वाले से मुलाकात ना होने पायी, न शिकवा है कोई ना कोई गिला है, तेरे सडके बलम न कारे कोई गम… हि गाणी सुंदर होती. गंमत म्हणजे या चित्रपटातील एकही गाणे दिलीप कुमार वर चित्रित झाले नाही. (Mehboob)
सिनेमासृष्टीत अशा अनेक गमती जमती असतात एकाला संधी मिळते तर दुसऱ्याची संधी हिरावली जाते. या जर तर च्या शक्यतांमध्येच घरी गंमत असते.