Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Prarthana  Behare आणि Shreyas Talpade पुन्हा झळकणार एकत्र; नव्या प्रोजेक्टची केली घोषणा

Mahesh Manjrekar पहिल्यांदाच दिसणार साधूच्या भूमिकेत; ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ लूक

कलात्मक चित्रपटाची नांदी देणारा : Bhuvan Shome!

लग्नाला यायचं हं! ‘या’ दिवशी होणार प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा लग्न

Sandhya : ‘पिंजरा’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम काळाच्या पडद्याआड

Vijay Deverakonda आणि Rashmika Mandanna यांनी गुपचूप उरकला साखरपूडा; पण

Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Neena Kulkarni यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!

Jitendra Kumar सचिवजींचा Bhagwat चित्रपटात दिसणार रुद्रावतार!

मीनाक्षी शेषाद्रीचा पहिला सिनेमा Painter Babu आठवतो का?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

भारतीय चित्रपटसृष्टीतील महान क्लासिक चित्रपट ‘कागज के फूल’

 भारतीय चित्रपटसृष्टीतील महान क्लासिक चित्रपट ‘कागज के फूल’
कलाकृती विशेष

भारतीय चित्रपटसृष्टीतील महान क्लासिक चित्रपट ‘कागज के फूल’

by दिलीप ठाकूर 02/01/2024

जेवढे चित्रपटांचे प्रीमियर, त्यापेक्षा त्यांचे किस्से,गोष्टी,स्टोरीज,ब्रेकिंग न्यूज जास्त. काही तर अनेक वर्ष चर्चेत. पण एखाद्या चित्रपटाच्या प्रीमियरचा रंग वेगळा असू शकतो. गुरुदत्त दिग्दर्शित ‘कागज के फूल’ ( मुंबईत रिलीज २ जानेवारी १९५९. 65 वर्ष पूर्ण) च्या मराठा मंदिर चित्रपटगृहातील प्रीमियरची प्रचलित असलेला किस्सा अथवा गोष्ट अगदी वेगळी.(Movie)

चित्रपटाचा मध्यंतर होतोय तोच शम्मी कपूर चक्क जोरजोरात ओरडत बाहेर आला आणि म्हणाला, फिल्म का हीरो कहा है ?…. यावर कोणीतरी गुरुदत्तकडे बोट दाखवले. त्यावर शम्मी कपूर म्हणाला, वो नही यार… असली हीरो मूर्ती. तेवढ्यात शम्मी कपूरची नजर कोपर्‍यात उभे असलेल्या मूर्तींकडे गेले आणि तो तसाच त्यांच्याकडे जात म्हणाला, तुसी ग्रेट हो यार…क्या कमाल का काम किया है… या चित्रपटाचे छायाचित्रणकार व्ही. के. मुर्ती यांच्यासाठी हा महत्वाचा क्षण होता.

याचं कारण, हा चित्रपट दिग्दर्शक सुरेश सिन्हा (गुरुदत्त) यांची शोकांतिका सादर करणारा होता, आपल्या देशातील पहिला सिनेमास्कोप चित्रपट आणि दिग्दर्शक गुरुदत्त यांना अपेक्षित असलेला परिणाम छायाचित्रणकार व्ही. के. मूर्ती यांनी रुपेरी पडद्यावर अतिशय कल्पकपणे साकारला होता. चित्रपट कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट स्वरुपात होता. पण पडद्यावरील सादरीकरणाचा रंग काही वेगळाच होता. तोच महत्वाचा असतो.(Movie)

गुरुदत्त फिल्म निर्मित ‘कागज के फूल’ भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महान क्लासिक चित्रपट. दुर्दैवाने या चित्रपटाला रसिकांनी नाकारले. ही कलाकृती म्हणजे दिग्दर्शक गुरुदत्तचे खाजगी जीवन चितारणारा चित्रपट होता. यातील काही प्रसंग प्रत्यक्ष त्याच्या आयुष्यातील होते. त्यामुळे ते अधिक परिणामकारक वठले होते आणि गुरुदत्तला या चित्रपटाबाबत विलक्षण आपलेपण होते. पण रसिकांना वेगळ्या नातेसंबंधांच्या या गोष्टीत कसलीही रुची वाटली नाही.

त्यामुळे चित्रपट तिकीट खिडकीवर पूर्ण अपयशी ठरला. चार्ली चॅप्लीनचा ‘लाईम लाईट’ (१९५८) या चित्रपटापासून गुरुदत्तला ‘कागज के फूल ‘ची कल्पना सुचली असे मानले जाते. पण गोष्ट स्वतंत्र होती. त्यानुसार त्याने अबरार अल्वी याला पटकथा व संवाद लेखन करायला सांगितले. या चित्रपटात संवेदनशील दिग्दर्शकाचा महत्वाकांक्षी चित्रपट फर्स्ट शोपासूनच अपयशी ठरतो आणि एकीकडे आर्थिक नुकसान होत असतानाच या दिग्दर्शकाला मानसिक भावनिक धक्का बसतो आणि त्यात त्याची परवड होत जाते. असा ‘फोकस’ स्पष्ट होता.

गुरुदत्त दिग्दर्शित ‘बाजी’ (१९५१), ‘जाल’ (१९५२), ‘बाज’ (१९५३), ‘सैलाब’ (१९५६), ‘आरपार’ (१९५४), ‘मिस्टर ॲण्ड मिसेस ५५’ (१९५५), ‘प्यासा’ (१९५७), यापर्यंतच्या वाटचालीपेक्षा ‘कागज के फूल’ पूर्णपणे वेगळा. अतिशय धाडसी पाऊल टाकणारा. चित्रपटात गुरुदत्त, वहिदा रेहमान, जाॅनी वाॅकर, रेहमान, मिनू मुमताज, वीणा, मेहमूद, बेबी नाझ व महेश कौल यांच्या प्रमुख भूमिका. कैफी आझमी यांच्या गीतांना सचिन देव बर्मन यांचे संगीत. हा चित्रपट एका नव्या स्वरुपात म्हणजे सिनेमास्कोप होता. त्यासाठी लागणारी लेन्स भारतात उपलब्ध नव्हती. ती हाॅलीवूडच्या ट्वेंन्टीथ सेंच्युरी फाॅक्सकडून आणली. गुरुदत्तचं व्हीजन खूप मोठे होते. या चित्रपटाच्या थीमचे रुपेरी पडद्यावरील सादरीकरण अधिकाधिक प्रभावी व्हावे याकडे त्याचा अधिकाधिक कल होता. तो चांगला तंत्रज्ञ होता असेही म्हटले गेले. (Movie)

विलक्षण सौंदर्यदृष्टी त्याच्याकडे होती हे त्याने दिग्दर्शिलेल्या कलाकृतीतून दिसते. दिग्दर्शकाला हवी असलेली कॅमेऱ्याची नजर वा दृष्टी त्याच्याकडे होते. त्यामुळेच त्याच्या दिग्दर्शनातील चित्रपटातील अनेक फ्रेम बोलतात, अगदी त्या चित्रपटाच्या पोस्टरवरही हे वैशिष्ट्य दिसते. त्याच्या चित्रपटांची पोस्टर त्या चित्रपटाचे व्यक्तिमत्व स्पष्ट करणारी. ‘येथे दिग्दर्शक दिसतो’ असेही म्हणायला हवे. ज्या स्टुडिओतील शूटिंगच्या फ्लोअरवर आपण राज्य केले आता त्याच ठिकाणी दिग्दर्शक सुरेश सिन्हाला पडत्या काळात कोणाचीच साथ नाही. या मनोरंजन क्षेत्रात सगळेच सुखाचे सोबती असतात, अपयशाला कोणी वाली नसतो हे हा चित्रपट सांगतो. पासष्ट वर्षांपूर्वीच सांगितलेले हे सत्य आजच्या म्हणजे २०२४ मध्ये अधिकाधिक प्रमाणात अनुभवण्यास येत असेल तर त्यात आश्चर्य नाही. याच स्वार्थी वृत्तीवर ‘कागज के फूल ‘मध्ये म्हटले गेले, देखी जमाने की यारी, बिछडे सभी बारी बारी…

एका अभिनेत्रीच्या सहवासात राहत राहत कळत नकळतपणे तिच्याबद्दलचे आकर्षण निर्माण झालेला एक विवाहित दिग्दर्शक आणि मग त्याची झालेली शोकांतिका हा या चित्रपटाचा मध्यवर्ती कथा आशय. दिग्दर्शक सुरेश सिन्हा (गुरुदत्त) आपली पत्नी (वीणा सप्रू) आणि मुलगी पम्मी (बेबी नाझ) असे कुटुंब असलेला. मुलीवर त्याचे विशेषत्वाने प्रेम. सुरेश सिन्हा ‘देवदास’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनात कार्यरत असताना ‘पारो’च्या व्यक्तिरेखेसाठी योग्य अभिनेत्रीची निवड करण्यात प्रयत्नशील आहे. अशातच दिल्लीत गेला असता मुसळधार पावसात बस स्टॉपवर उभी असलेल्या शालेय शिक्षिका शांतीला (वहिदा रेहमान) तो छत्री देतो. ही यांची पहिली भेट.

शांती मुंबईत आल्यावर सुरेश सिन्हाला ती छत्री देण्यासाठी स्टुडिओत जाते तेव्हा योगायोगानेच ती कॅमेऱ्यात आलेली असती. ते सुरेश सिन्हा पाहतो आणि ती आपल्या चित्रपटात भूमिका साकारु शकते याचा त्याला विश्वास बसतो. शांतीला अभिनय म्हणजे काय, कॅमेरा मूव्हमेंट म्हणजे काय, मेकअप कसा असतो याबाबत काहीच माहित नसते. सुरेश सिन्हा तिच्यावर खूप मेहनत घेतो. तिला एक गुणी अभिनेत्री म्हणून आकाराला आणत जाताना तो तिच्यात गुंतत, गुरफटत जातो.(Movie)

दरम्यान अनेक घडामोडी घडत जातात. शांती आघाडीची तारका बनते तर सुरेश सिन्हाची अपयशी दिग्दर्शक म्हणून घसरण होते. एकदा रिक्षा अपघातात सुरेश सिन्हा जखमी होतो तेव्हा शांती त्याची खूप सेवा करते. सुरेश सिन्हाच्या कारकिर्दीला पुन्हा उभारी यावी म्हणून शांती त्याच्यापुढे नवीन चित्रपटाचा प्रस्ताव ठेवते. तेव्हा अतिशय स्वाभिमानी सुरेश सिन्हा म्हणतो, मुझमे केवल एक चीज बची है, मेरा गौरव. चित्रपटात असे संवेदनशील प्रसंग बरेच. वक्त ने किया क्या हंसी सितम ( पार्श्वगायिका गीता दत्त) गाणे खूपच अस्वस्थ करते.

गुरुदत्तच्या प्रत्यक्ष आयुष्यातील पत्नी गीता दत्त आणि मग वहिदा रेहमानला त्याने राज खोसला दिग्दर्शित ‘सी. आय. डी.’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात आणले. मग एकत्र काम करता करता गुरुदत्तला वहिदा रेहमानबद्दल निर्माण झालेले आकर्षण याचं बरंचसं प्रतिबिंब ‘कागज के फूल ‘मध्ये पडल्याचे हा चित्रपट निर्मितीवस्थेत असल्यापासूनच चर्चेत होते आणि मग ही कुजबुज त्यानंतर जणू रंगतदार चर्चेत रुपांतरीत झाली. त्या काळातील मिडिया अशा नात्याची चर्चा करीत असे पण त्यापेक्षाही ‘कागज के फूल ‘ एक अजरामर कलाकृती आहे यावरचा ‘फोकस ‘ कायम असे. कालांतराने मिडिया वाढला. मनोरंजन क्षेत्रातील गाॅसिप्स मुख्य प्रवाहात आले. कलाकारांची लफडी म्हणजेच जणू सिनेपत्रकारीता अशी प्रतिमा असल्याच्या काळात वहिदा रेहमान यांना गुरुदत्तबद्दल प्रश्न केला गेल्यावर त्या अतिशय संयमाने उत्तर देतात आणि दिग्दर्शक म्हणून गुरुदत्तचे सामर्थ्य अधोरेखित करतात.(Movie)

‘कागज के फूल’ मी माझ्या काॅलेजच्या दिवसात म्हणजे सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात दक्षिण मुंबईतील मोती चित्रपटगृहात एका आठवड्यासाठी रिपीट रनला प्रदर्शित झाला असताना पाहिला. विशेष उल्लेखनीय गोष्ट, तत्पूर्वी मी गुरुदत्तचे ‘प्यासा ‘ (नाझला मॅटीनीला) आणि ‘चौदहवी का चांद’ (सुपरला मॅटीनीला) पाहिले होते. असे माझ्या अगोदरच्या काळातील चित्रपट पाहण्यासाठी मॅटीनी शो, रिपीट रन, गल्ली चित्रपट व रविवार संध्याकाळ दूरदर्शन हेच उपलब्ध होते. पण जुन्या चित्रपटांबाबत तात्कालिक मुद्रित माध्यमातून बरेच काही जाणून घेता येत होते, चित्रपटाचा इतिहास समजत होता. फ्लॅशबॅक, वो दिन याद करो, गुजरा हुआ जमाना अशी सदरे त्या काळात असत. त्यांनी आपापल्या पध्दतीने चित्रपट संस्कृती रुजवली. ‘कागज के फूल ‘बद्दलही बरेच वाचले होते आणि त्यानंतर चित्रपट पाहायचा योग आला.

मोती थिएटरमधील जाहिरातपट संपले. पूर्ण अंधार झाला. सेन्सॉर प्रमाणपत्र झाले. सुरुवातीची गुरुदत्त फिल्मची आद्याक्षरे झाली. काही नावे झाली आणि पडद्यावर एका विशाल चित्रपट स्टुडिओचे विस्तीर्ण निर्मनुष्य आवार खूपच उंचावरुन दिसू लागते. चित्रपटाची थीम पहिल्याच फ्रेममध्ये दिसू लागते. याच स्टुडिओच्या आवारातील एका हिंस्र पक्ष्याचा पुतळा केंद्रस्थानी ठेवून त्याच पाश्र्वभूमीवर दुबळा असा सुरेश सिन्हा एकटा चालण्याची धडपड करतोय. पहिल्याच फ्रेममध्ये आपण पडद्यावरील गोष्टीत गुंतत जातो.(Movie)

चित्रपटातील एक बोलके दृश्य, शांती अगर तुम ॲक्ट्रेस अच्छी हो तो मै भी डायरेक्टर बुरा नही’, सुरेश सिन्हा तिला सांगतो. सुरेश सिन्हाकडे शांतीने विणलेल्या स्वेटरखेरीज काही उरलेले नसते…खरं तर चित्रपटसृष्टीतील भयावह अनिश्चितेवर अगदी प्रभावीपणे फोकस टाकणारी ही कलाकृती. पण चित्रपटसृष्टीतील वास्तव स्वीकारण्यास ‘भारतीय चित्रपट रसिकांचे मन तेव्हाही, आताही आणि केव्हाही तयार नसते’ याचं कारण, चित्रपटाचे जग म्हणजे ग्लॅमर, गाॅसिप्स, हलक्या फुलक्या गप्पा आणि गल्लापेटीवरील मोठ्ठे मोठ्ठे आकडे असा समज अथवा प्रतिमा एस्टॅब्लिज झाली आहे. ती ‘कागज के फूल ‘ बदलू शकली नाही आणि बदलू शकत नाही..

==========

हे देखील वाचा : महेश भट्टचा हा आहे सर्वोत्तम चित्रपट

==========

पण म्हणून अशा कलाकृतींचे महत्व कमी होत नाही.’कागज के फूल ‘च्या काळात समांतर चित्रपट, नवप्रवाहातील चित्रपट (न्यू वेव्ह) अशी व्याख्या प्रचलित झाली नव्हती. मुख्य प्रवाहातील चित्रपट आणि स्टंटपट (भगवानदादा वगैरेंचे) एवढाच फरक मानला जात होता. ‘कागज के फूल ‘ क्लासिक चित्रपट म्हणून ओळखला जातो. आणि म्हणूनच या चित्रपटावर अनेक वर्ष कायमच अभ्यासपूर्ण फोकस टाकला गेल्याचे लक्षात येते. ही या चित्रपटाची मोठीच मिळकत. ‘कागज के फूल ‘ व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरल्याने एक शोकांतिका झाली. गुरुदत्तने पुन्हा चित्रपट दिग्दर्शन न करण्याच्या घेतलेल्या निर्णयाशी तो ठाम राहिला. त्यानंतर ‘चौदहवी का चांद ‘,( १९६०, दिग्दर्शक एम. सादिक ), ‘साहिब बिवी और गुलाम ‘ ( १९६२. दिग्दर्शक अबरार अल्वी) या चित्रपटाचा निर्माता व नायक म्हणून तो ‘दिसला’. पण एका महान कलाकृतीच्या अपयशाने एका संवेदनशील आणि चित्रपट माध्यमाची उत्तम जाण असलेल्या दिग्दर्शकाची अशी शोकांतिका व्हायला नको होती..(Movie)

चित्रपटाला पासष्ट वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त हा थोडक्यात फोकस. आज ‘कागज के फूल ‘ निर्माण करायचा झाला तर? विवाहबाह्य संबंध, परस्री आकर्षण, काॅन्ट्रॅक्ट मॅरेज, घटस्फोट, दुसरा विवाह, कुठे दुसरा घटस्फोट, कुठे पुरुषाचा चक्क तिसरा विवाह अशा गोष्टी आता फक्त मनोरंजन क्षेत्रातच आहेत असे नाही. कार्पोरेट युगात त्याची वाढ झालीय. आज ‘कागज के फूल ‘चे सिक्वेल निर्माण होतील. पण ते कचकड्याचे असू शकतात. पासष्ट वर्षांत बरेच काही बदललयं.

  • 3
    Share
    Facebook
  • 4
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 4
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Featured
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.