‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
सुनील दत्त नर्गिस च्या लग्नाची दुसरी गोष्ट !
मेहबूब यांच्या मदर इंडिया या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान लागलेल्या आगीचा किस्सा तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. याच आगीतून सुनील दत्त यांनी नर्गिस यांचे प्राण वाचवले आणि पुढे या दोघांनी लग्न केले. पण हे लग्न त्यांनी चित्रपट प्रदर्शन झाल्यानंतर लोकांसमोर जाहीर केले. या सोबतच आणखी एक छोटी भावस्पर्शी आठवण सुनील दत्त यांनी रेडिओवरील एका मुलाखतीत सांगितली होती जी फारशी कुणाला माहिती नाही.
‘मदर इंडिया’ या चित्रपटात सुनील दत्त ने नर्गिसच्या मुलाची भूमिका केली होती. या सिनेमात ते दोघे माता आणि पुत्र या भूमिकेत होते. तो आगीचा प्रसंग झाल्यानंतर दोघांमध्ये वेगळे नाते फुलत होते; पण ठोस निर्णयापर्यंत येणे दोघांनाही शक्य होत नव्हतं. याची कारणं बरीच होती. मुख्य म्हणजे दोघांचे धर्म वेगळे होते, दोघांच्या वयात अंतर होते, नर्गीस सुनील दत्तहून वयाने मोठी होती आणि राज कपूर आणि नर्गिस यांच्यातील रिलेशन शिप जगजाहीर होती. पण असे असताना देखील ते शक्य झालं एका घटनेने.(Sunil Dutt lovestory)
ही घटना अभिनेते सुनील दत्त यांनी एका मुलाखतीत सांगितली होती. या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान सुनील दत्त यांची धाकटी बहीण हिच्या मानेवर टीबी ग्लॅंड्स झाल्या होत्या. त्या काळात हा आजार खूपच भीतीचा आणि दहशत निर्माण करणार होता. साहजिकच सुनील दत्त आपल्या बहिणीच्या प्रकृतीमुळे खूपच नाराज असायचे कारण या बहिणीला एक छोटी एक वर्षाची मुलगी होती. या आजाराने बहिणीचे काही बरे वाईट झाले तर त्या चिमुरडीचे काय होणार ही चिंता त्याला असायची.
एकदा सेटवर सुनील दत्त असेच गंभीर असताना नर्गीसने सहज विचारले,” बिरजू, (या चित्रपटात सुनील दत्तचे नाव बिरजू होते) तुम्ही एवढे उदास का ?” त्यावर सुनील दत्त यांनी नर्गिसला आपल्या बहिणीच्या प्रकृती बद्दल सांगितले. त्यावर नर्गिस म्हणाली,” अरे यात काळजी करण्यासारखं काय आहे ? पूर्वीसारखी परिस्थिती आता नाही. आता या आजारावर भरपूर चांगली औषधे आली आहेत आणि व्यवस्थित इलाज होतो आहे. त्यामुळे अजिबात काळजी करू नकोस. तुझी बहीण नक्की बरी होईल !” सुनील दत्तला वाटले नर्गिसचे हे बोल म्हणजे आपल्याला थोडं बरं वाटावं म्हणून सांगितलेले असावे म्हणून त्याकडे त्याने लक्ष दिले नाही.(Sunil Dutt lovestory)
त्या दिवशी संध्याकाळी ते एका मित्राच्या घरी गेले आणि रात्री जेवण करून उशिरा आपल्या घरी पोहोचले. त्यांना वाटले आपली बहीण आता झोपली असेल. पण ती चक्क जागी होती. तिने सुनील दत्त यांना विचारले ‘शूटिंग झाल्यानंतर तू कुठे गेला होतास ?” त्यावर त्यांनी सांगितले,” मी एका माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो. पण तू अजून जागी कशी ?” तेव्हा सुनील दत्त यांची बहीण म्हणाली “आज संध्याकाळी शूटिंग नंतर अभिनेत्री नर्गीस आपल्या घरी आल्या होत्या. त्यांनी मला त्यांच्या गाडीतून एका डॉक्टरकडे नेले. डॉक्टरने माझ्या टीव्ही ग्लॅंड्स पाहिल्या आणि त्याचे तातडीने ऑपरेशन करायला सांगितले आहे.
उद्याच मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचे आहे. नर्गिसने खर्चाची काळजी करू नको असे सांगितले आहे आणि हॉस्पिटलची फीस देखील भरून टाकली आहे !” सुनील दत्त आपल्या बहिणीचे उद्गार ऐकून स्तब्ध झाले. दुपारी नर्गीस त्याला जे बोलली होती ते किती सिरीयसली तिने घेतले होते हे त्याच्या लक्षात आले. दुसऱ्या दिवशी नर्गिस पुन्हा सुनील दत्त यांच्या घरी आली आणि बहिणीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली आणि कमाल म्हणजे पुढचे तीन दिवस तिने शूटिंगला सुट्टी टाकली आणि तिच्या ऑपरेशन्स होऊन घरी डिस्चार्ज मिळे पर्यंत नर्गिस सुनील दत्तच्या बहिणी सोबत राहीली. त्याच्या बहिणीच्या एक वर्षाच्या मुलीची काळजी देखील नर्गिसने आपल्या घरी ठेवून घेऊन घेतली ! (Sunil Dutt lovestory)
==============
हे देखील वाचा : यश चोप्रा यांचे नावडते संगीतकार अचानक आवडते झाले ?
==============
सुनील दत्त यांच्या डोळ्यातून पाणी आले. आपल्या चित्रपटातील एका मोठ्या अभिनेत्रीने आपल्यासारखे एका छोट्या कलाकाराच्या बहिणीसाठी इतकी मेहनत घ्यावी हे त्याला खूप मनापासून भावले. नर्गिसच्या मनात इतरांविषयी अपार करुणा आहे, माया आहे. हे त्याच्या लक्षात आले. त्या काळात दोघांच्या मनात प्रीतीचा अंकुर उमलत होता. एकदा शूटिंग संपल्यानंतर नर्गिसला घरी सोडताना सुनील दत्त यांनी नर्गिसला विचारले ,” क्या तुम मेरी जीवन साथी बनोगी ?” नर्गिसने त्या वर काहीच उत्तर दिले नाही. सुनील दत्त रात्रभर जागा राहिला. त्याला वाटले जर नर्गिसने नकार दिला तर काही हरकत नाही. ती एक खूप मोठी अभिनेत्री आहे. तिच्यापुढे माझी काहीच औकात नाही. आपण इथला बोरिया बिस्तर गुंडाळून आपल्या गावी निघून जावू आणि आयुष्यभर तिचे प्रेम जपत राहू. (Sunil Dutt lovestory)
दुसऱ्या दिवशी शूटिंग वरून आल्यानंतर सुनील दत्तची बहिण त्यांना म्हणाली,” तू मला काही सांगितलं नाहीस !” त्यावर सुनील दत्त म्हणाला ,” काय सांगितलं नाही ?” त्यावर ती म्हणाली ,” दादा लपवू नकोस. नर्गिस माझी वहिनी होणार आहे. तिने मला फोन करून ही बातमी सांगितली.” अशा प्रकारे नर्गिस आणि सुनील दत्त यांच्यातील नाते विवाह बंधनात परावर्तन झाले.