दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
यांचं गाणं ऐकून लता मंगेशकर झाल्या भावुक…
राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा २००६ साली प्रदर्शित झालेला ‘रंग दे बसंती’ हा चित्रपट आज देखील रसिकांच्या स्मरणात आहे. आमिर खान याचे प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटात ऐतिहासिक आणि वर्तमान या दोन्ही सामाजिक संदर्भांची जोड लावत एक अप्रतिम चित्रपटाची निर्मिती मेहरा यांनी केली होती. या चित्रपटाला संगीत ए आर रहमान यांचे होते. या चित्रपटात वहिदा रहमान या जुन्या बुजुर्ग अभिनेत्रीची खास भूमिका या चित्रपटात होती. चित्रपटाच्या एका सिच्युएशनमध्ये पायलट (आर माधवन) चा अपघाती मृत्यू होतो. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मातेला जो शोक झालेला असतो त्यावर मेहरा यांना एक गाणे बनवायचे होते. मेहरा यांनी प्रसून जोशी यांना गीत लिहायला सांगितले.(Lata Mangeshkar)
त्याच्या कामातील व्यस्तते मुळे गाणे लिहायला उशीर होत होता. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी वाट पाहिली पण शूटिंग लेट होईल म्हणून हे गाणे प्रसंगाच्या पार्श्वभागी टाकायचे ठरवले आणि त्या प्रसंगाचे चित्रीकरण उरकून टाकले. प्रसून जोशी यांनी वेळ घेतला पण गाणे कमालीचे भावस्पर्शी लिहिले. इतके सुंदर गाणे गाण्यासाठी तितकाच भावोत्कट स्वर हवा होता आणि यासाठी त्यांना लता मंगेशकर यांचा स्वर हवा होता. ते लता मंगेशकर यांना भेटले. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) गाण्याचे बोल ऐकून खूप खुश झाल्या. गाण्याचे रेकॉर्डिंग चेन्नईला होणार होते. १५ नोव्हेंबर २००५ या दिवशी. गाण्याचे रेकॉर्डिंग ठरले. लता मंगेशकर दहा नोव्हेंबरला चेन्नईला पोहोचल्या. पुढचे चार दिवस ए आर रहमान यांनी गाण्याची रिहर्सल करून घेतली.
लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे वय त्यावेळी ७६ होते परंतु त्यांचा उत्साह मात्र कायम होता. चाळीशीतील संगीतकार ए आर रेहमान यांच्या कर्तृत्वाची त्यांना जाणीव होती. त्यांच्या ऑर्केस्टेशन त्यांना कौतुक होते. तीन-चार दिवस भरपूर सराव झाल्यानंतर रेकॉर्डिंगच्या दिवशी लता मंगेशकर सकाळीच स्टुडिओत पोहोचल्या. ए आर रहमान प्रत्येक वादक आणि त्यांच्या इन्स्ट्रुमेंट बाबत लक्ष असायचे. त्यामुळे तब्बल आठ तास या गाण्याचे रेकॉर्डिंग चालले. लता मंगेशकर यांनी या वयात सलग आठ तास रेकॉर्डिंग स्टुडिओ थांबून गाण्याचे रेकॉर्डिंग केले. रेकॉर्डिंग होत असताना लता मंगेशकर यांचे डोळे सारखे भरून येत होते कारण गाण्यातील भाव तसेच होते. गाण्याचे बोल होते ‘लुका छुपी बहुत हुई….’
जाता जाता लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आणि ए आर रहमान यांनी एकूण पाच गाणी केली त्यापैकी हे दुर्दैवाने शेवटचं चित्रपट गीत ठरलं. मणिरत्नम दिग्दर्शित ‘दिल से’ या चित्रपटात पहिल्यांदा लता दिदी ए आर रहमान यांच्याकडे गायल्या. गीत होते ‘जिया जले जान जले..’ हे गाणं गुलजार यांनी लिहिलं होतं. चित्रपटांमध्ये प्रीती झिंटावर हे गाणे चित्रित झालं होतं. गंमत म्हणजे ‘दिल से’ हा चित्रपट एका दक्षिणात्य चित्रपटावरून घेतला होता आणि त्या चित्रपटातील तीच टीम इथे देखील वापरण्यात आली होती गुलजार यांनी अतिशय सुंदर शब्द या चालीवर लिहिले होते.
यानंतर १९९८ साली राजकुमार संतोषी यांच्या ‘पुकार’ चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी एक गीत गायले गीताचे बोल होते ‘एक तुही भरोसा एक तुही सहारा…’ हे एक प्रार्थना गीत होते. मजरूह सुलतानपुरी यांनी हे गाणं लिहिलं होतं आणि चित्रपटांमध्ये लता मंगेशकर यांच्यावरच हे गाणे चित्रीत झालं होतं. श्याम बेनगल यांच्या ‘झुबेदा’ या २००० साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये लता मंगेशकर यांनी या ए आर रहमान यांच्याकडे एक नितांत सुंदर गाणे गायले.
============
हे देखील वाचा : राज कपूरने मानधन न घेता यांच्या चित्रपटात भूमिका केली !
============
जावेद अख्तर लिखित या गाण्याचे बोल होते ‘ प्यारा सा गांव गांव में एक छोटा सा घर…’ आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’ हा चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये सुहासिनी मुळे यांच्यावर चित्रित एक गीत होते जे लता मंगेशकर यांनी ए आर रहमान यांच्या संगीत निर्देशनात गायले होते गीताचे बोल होते ‘ओ पालन हारे..’ लता मंगेशकर शेवटचं गाणं या रहमान यांच्याकडे जे गायलं ते कुठल्याही चित्रपटातील नव्हतं तर ते एका अल्बमसाठी गाणं केलं होतं या अल्बमचं नाव होतं रौनक आणि यातील ‘लाडली’ हे अतिशय सुंदर गाणं लता मंगेशकर यांनी गायलं होतं. हे गाणं गाताना लता मंगेशकर यांचे वय ८६ वर्ष होतं ! कमाल ! या अल्बम मधील सर्व गाणी ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी लिहिली होती हे एक विशेष. या अल्बमचे आणखी एक मराठी कनेक्शन म्हणजे या गाण्या चा जो व्हिडिओ रिलीज केला होता त्यात वैदही परशुरामी हिने अभिनय केला होता.