Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Vicky Kaushal-Katrina Kaif यांनी अखेर आपल्या लेकाचं नाव केलं रिव्हील,

स्टार प्रवाहच्या ‘तुझ्या सोबतीने’ मालिकेला सुरु होण्याआधीच ब्रेक; १२ ऐवजी

Bigg Boss Marathi 6 मध्ये होणार  राजकीय नेत्याची एन्ट्री? रितेश भाऊने दिली

सत्तरच्या दशकात Dev Anand यांनी एका राजकीय पक्षाची स्थापना केली

Dharmaveer 2 मधील शिवरायांची ‘ती’ फ्रेम खास का आहे?

४००० कोटींच्या Ramayanaची धुरा ‘या’ मराठी माणसावर!

गौरव अमुलची काळजी कशी घेणार?; लवकरच Single Papa 2 प्रेक्षकांच्या

Hollywood मधून मराठीत रिमेक झालेले ‘हे’ चित्रपट माहिती आहेत का?

अखेर Shashank Ketkar ने स्क्रिन शॉट्ससह शेअर केलं 5 लाख

Border 2: ‘घर कब आओगे…’ तब्बल 28 वर्षांनंतर प्रसिद्ध गाणं

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

वैजयंतीमालाची पद्मभूषण पुरस्कारासाठी निवड झाली तेव्हा…

 वैजयंतीमालाची पद्मभूषण पुरस्कारासाठी निवड झाली तेव्हा…
कलाकृती विशेष

वैजयंतीमालाची पद्मभूषण पुरस्कारासाठी निवड झाली तेव्हा…

by दिलीप ठाकूर 01/02/2024

कलेच्या क्षेत्रात कधी थांबायचं याचं भान अनेकांना का येत नाही याचं नेमके उत्तर नाही. पण कसं थांबायचं आणि नवीन खेळी सुरु करायची हे वैजयंतीमालाकडून शिकावे. नरेशकुमार निर्मित ‘गंवार’ ( १९७०) हा आपला शेवटचा चित्रपट असं पक्कं ठरवून वैजयंतीमालाने (Vaijayantimala) खरोखरच हिंदी चित्रपटसृष्टी सोडली. अगदी निर्माते गुलशन राॅय आणि दिग्दर्शक यश चोप्रा यांनी “दीवार” (१९७५) मधील ‘मां’च्या भूमिकेसाठी थेट चेन्नईत (तेव्हाचे मद्रास) जाऊन वैजयंतीमालाला ऑफर दिली तेव्हाही तिने निक्षून ‘नाही’ म्हटलं आणि मग मनोजकुमारने “क्रांती’मधील (१९७९) आईच्या भूमिकेसाठी फारच समजून घातली तेव्हाही तिने त्याच ठामपणाने “नाही” असेच म्हटले. येथे आपण आघाडीची नायिका म्हणून राज्य केले, त्या काळातील आघाडीच्या सर्वच नायकांनी आपल्यासोबत भूमिका साकारलीय, आपण रुपेरी पडद्यावर साकारलेली अनेक गाणी सर्वकालीन लोकप्रिय आहेत, तेथे आपण चरित्र भूमिकेत काम करावे हे वैजयंतीमालाला पटले नाही. आयुष्यभर आपण ‘कलाकार’ नाही हे स्वीकारणे तिने यशस्वी केले.

केंद्र शासनाकडून वैजयंतीमालाची (Vaijayantimala) पद्मभूषण पुरस्कारासाठी निवड झाली तेव्हा वैजयंतीमालाच्या अनेक वैशिष्ट्यांतील हे एक पटकन आठवलं. हेमा मालिनीने वैजयंतीमालाचे अभिनंदन केल्याचा सोशल मिडियातील फोटो दोन पिढीतील नंबर वनच्या अभिनेत्रीच्या भेटीचे वैशिष्ट्य दाखवणारा. आजच्या मल्टीप्लेक्स, ओटीटी पिढाला कदाचित वैजयंतीमाला नावाची साठच्या दशकातील ‘नंबर वन ‘ची अभिनेत्री फारशी माहित नसेल. गोल बोलका चेहरा हे तिचे विशेष वैशिष्ट्य. त्यांनी एका क्लिकवर बिमल राॅय दिग्दर्शित ‘मधुमती’, बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘नया दौर ‘, नीतिन बोस दिग्दर्शित ‘गंगा जमुना’, राज कपूर दिग्दर्शित ‘संगम’, विजय आनंद दिग्दर्शित ‘ज्वेल थीफ’ पहावेत अथवा तिची अशा अनेक चित्रपटांत साकारलेली विविध प्रकारची नृत्य पहावीत. सौंदर्य, अभिनय, नृत्य व आत्मविश्वास ( या सगळ्यात भन्नाट गाॅसिप्सही आहेच) यांची अतिशय छान केमिस्ट्री वैजयंतीमालात आहे.

वैजयंतीमालाचा (Vaijayantimala) जन्म तमिळनाडूतील त्रिपलिकेन येथे एका अय्यर कुटुंबात १३ ऑगस्ट १९३६चा. म्हणजे आता ८८ वय सुरु आहे. वडिलांचे नाव एम. डी. रमन आणि आईचे नाव वसुंधरा देवी. त्या तमिळ चित्रपटात भूमिका साकारत. वयाच्या आठव्या वर्षी व्हॅटिकन सिटीतील शाळेत वैजयंतीमालाने केलेले नृत्य पाहून आई प्रभावित झाली. वजाहूर पिलाई यांजकडून ती भरतनाट्यम शिकली. वयाच्या तेराव्या वर्षी अरंगत्रेम शिकली. वडकई ( १९४९) या तमिळ आणि ‘जीवितम’ ( १९५०) या तमिळ चित्रपटातून तिने चित्रपट व्यवसायात पाऊल टाकले. दक्षिणेकडील चित्रपट निर्मिती संस्था एव्हीएमच्या ‘बहार’ (१९५१) पासून हिंदीत येताना ती भाषा शिकली. पहिला हीरो करण दिवाण. नृत्याच्या जोडीला आता हिंदी भाषा, वैजयंतीमालाला रोखणं अवघड होते. मीनाकुमारी, नर्गिस, मधुबाला, शकीला, नूतन, वहिदा रेहमान, माला सिन्हा अशी तगडी स्पर्धा होतीच आणि भर पडत गेली. तरी वैजयंतीमालाचं आपलं एक स्थान निर्माण झाले.

त्या काळातील सर्वच टाॅपच्या हीरोंची ती नायिका झाली हे यशाचे एक बॅरोमीटर. कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट काळातील चित्रपटातून सुरुवात करुन इस्टमनकलर चित्रपटापर्यंत ती फाॅर्मात राहिली. आर. के. फिल्म बॅनरचा पहिला रंगीत आणि देशातील पहिला दोन मध्यंतरचा चित्रपट ‘संगम’ (१९६४) च्या निर्मितीवस्थेत राज कपूर तिच्यात कळत नकळतपणे गुंतत गुरफटत गेल्याची खबर चेंबूरच्या आर. के. काॅटेजमध्ये पोहचताच राज कपूरची पत्नी कृष्णा राज कपूर आपल्या तीनही मुलांना घेऊन घराबाहेर पडली आणि मरीन ड्राईव्हवरील नटराज हाॅटेलमध्ये काही दिवस राहिल्याचे गाॅसिप्स पिक्चरला साठ वर्ष होऊन देखील आजही रंगवून खुलवून चघळले जाते. याला म्हणतात ‘पिक्चरच्या कलरफुल जगातील भन्नाट गाॅसिप्स’. राज कपूर आपल्या नायिकांच्या प्रेमात पडायचा त्यातून त्या आपलं सौंदर्य, अभिनय व नृत्य खुलवण्यात यशस्वी ठरे असा एक निष्कर्ष केव्हाच काढला गेलाय. त्यात वैजयंतीमालाचेही नाव आहे हा जणू शिलालेख.

वैजयंतीमालाच्या (Vaijayantimala) रुपेरी गीत संगीत व नृत्यांची ‘बहार’ काय वर्णावी. काही गाणी सांगायलाच हवी. तू माने या ना माने ( किस्मत का खेल), तुम संग प्रीत लगाई रसिया ( नई दिल्ली), मुहब्बत मे पहला कदम ( यास्मिन), अरे कोई जाओ रे ( पटरानी), आजा रे परदेसी, चढ गयो पापी बिछुआ ( मधुमती), उडे जब जब झुल्फे तेरी ( नया दौर), आसमा के नीचे ( ज्वेल थीफ), मेरे पास आओ ( संघर्ष), थंडी थंडी हवा मे ( प्रिन्स), तेरे हुस्न की क्या तारीफ करु ( लीडर), क्या करु राम मुझे बुढ्ढा मिल गया ( संगम), तुम रुठी रहो मै मनाता रहू ( आस का पंछी), देख हमे आवाज दे (अमरदीप), दूरिया नजदियाकीया बनी ( दुनिया), ‘संगम ‘मधील वैजयंतीमालाची अनेक लहान मोठ्या छटा असलेली भूमिका फार गाजली. प्रेम त्रिकोणाची ही गोष्ट होती. त्यात भरपूर भावनाविशेष होता. असे वैजयंतीमालाच्या अभिनयाचे अनेक पैलू अनेक चित्रपटांत पाह्यला मिळतात.
हा यशस्वी रुपेरी पडद्यावरील प्रवास स्वतःच थांबवायला एक विलक्षण धैर्य लागते. वेगळीच मानसिकता लागते. साठच्या दशकातील आपण ‘नंबर वन ‘च्या अभिनेत्री आहोत अथवा होतो, आता हेमा मालिनी, रेखा, जया भादुरी, राखी, लीना चंदावरकर अशा अनेक नवीन अभिनेत्री आल्या आहेत. हे लक्षात घेतले. त्यांना एक प्रकारे मार्ग मोकळा करुन दिला.

वैजयंतीमालाकडून आपण नक्की कधी थांबायचं हे शिकण्यासारखे आहे. एव्हाना नायकांचीही पुढची पिढी आलीच होती. राजेश खन्ना तिचा रोमॅन्टीक नायक म्हणून शोभणारा नव्हताच. सत्तरच्या दशकात वैजयंतीमालाचे अनेक चित्रपट गल्ली चित्रपट, मॅटीनी शो, रिपीट रन आणि दूरदर्शनवर पाह्यला मिळत. ऐंशीच्या दशकात रंगीत दूरदर्शन आणि व्हिडिओ आल्यावरही तो प्रवास सुरुच राहिला. आता यू ट्यूबवर वैजयंतीमालाचे चित्रपट, तिने नृत्य म्हणा प्रेमाची परिभाषा म्हणा यातून खुलवलेली गाणी आवर्जून पहा. एक छान व्यक्तिमत्व आणि उत्तम स्क्रीन प्रेझेन्स पाह्यला मिळेल.

वैजयंतीमालाचे (Vaijayantimala) मराठी चित्रपटसृष्टीला एक विशेष देणे आहे. तिने १९७१ साली सुचिन्द्र आर्ट्स या चित्रपट निर्मिती संस्थेच्या माध्यमातून राजदत्त दिग्दर्शित ‘झेप ‘ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटात डाॅ. काशिनाथ घाणेकर, दर्शना, रमेश देव, प्रभाकर पणशीकर,दर्शना, मधु आपटे, रमेश पडवळ इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा वैजयंतीमालाची असून पटकथा व संवाद श्रीनिवास जोशी यांचे आहेत. ग. दि. माडगूळकर यांच्या गीतांना सुधीर फडके यांचे संगीत आहे. हा चित्रपट त्यांनी त्या काळातील शिवसेनेला विशेष खुश ठेवण्यासाठी निर्माण केला असे म्हटले गेले. मला आठवतय लहानपणी आमच्या गिरगावातील मॅजेस्टीक चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. साधारण अठरा वीस वर्षांपूर्वी एकदा एक आमंत्रण हाती आले.

==========

हे देखील वाचा : शेट्टी आहे म्हणजे पिक्चरमध्ये ढिश्यूम ढिश्यूम नक्कीच

==========

बी.आर. फिल्म निर्मित बी. आर. चोप्रा निर्मित व दिग्दर्शित ‘नया दौर’ रंगीत स्वरुपात… ब्लॅक अँड व्हाईट काळातील हा चित्रपट मी शालेय वयात दूरदर्शनवर पाह्यला होता. आता रंगीत पाह्यची इच्छा होतीच. जुहूला बी. आर. चोप्रा यांच्या बंगल्यातील मिनी थिएटरमध्ये गेलो. शो सुरु व्हायला उशीर होत होता. तेवढ्यात समजले, वैजयंतीमाला येत आहे. भुवया उंचावणारच. कुतूहल वाढले. पूर्वीच्या धाटणीतील वैजयंतीमाला आता असणे वा दिसणे शक्य नव्हतेच. आणि तसेच झाले. ते काही असो. वैजयंतीमालाची भेट घेऊन काही गप्पा करता आल्या. केवढा सुखावलो हो. अभिजीत देसाईने यावर साप्ताहिक लोकप्रभात लेखही लिहिला. सध्या आपण चेन्नईत नृत्यशाळेत रमलोय, ती आपली आवड आहे हे तिने आवर्जून सांगितले, खरं तर नृत्य तिच्या अभिनयाचे ठळक वैशिष्ट्य. पद्मविभूषण पुरस्कारासाठी वैजयंतीमालाचे खूप खूप अभिनंदन. अतिशय मोठा गौरव. आदर्श वाटचाल.

  • 3
    Share
    Facebook
  • 1
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 1
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Featured
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.