मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
आशा पारेखने हे गाणे हट्टाने स्वत:वर चित्रित करायला लावले !
दिग्दर्शक राज खोसला यांचा १९७१ साली एक सॉलिड सिनेमा आला होता. ‘मेरा गाव मेरा देश’. खरंतर हॉलीवूडच्या सिनेमाची आठवण करून द्यावा इतकी ही जबरदस्त ॲक्शन मुव्ही होती. आपल्या रमेश सिप्पी यांच्या ‘शोले’ वर देखील या ‘मेरा गाव मेरा देश’ ची गडद छाया होती. या सिनेमातील एका गाण्याचा मजेशीर किस्सा आहे. या चित्रपटाचा नायक धर्मेंद्र नायिका आशा पारेख आणि खलनायक विनोद खन्ना होता. या चित्रपटात सहनायिका लक्ष्मी छाया होती. चित्रपटाची गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली होती तर संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी दिले होते. या सिनेमातील ‘सोना ले जा रे चांदी लेजा रे…’ या गाण्याचे रेकॉर्डिंग चालू होते. गाण्याची चाल कॅची होती, मस्त होती. या रेकॉर्डिंगला आशा पारेख देखील उपस्थित होती. पण जेव्हा तिला कळाले की चित्रपटात हे गाणे तिच्यावर नाही तर सहनायिका लक्ष्मी छायावर चित्रित होणार आहे. (Asha Parekh)
तेव्हा तिचा मूड गेला आणि तिने दिग्दर्शक राज खोसला यांच्याकडे हट्ट केला की हे गाणे तिच्यावरच चित्रित व्हावे. तेव्हा दिग्दर्शक राज खोसला म्हणाले,” आशा जी या चित्रपटात अशी कुठलीही सिच्युएशन नाही की हे गाणे तुमच्यावर चित्रित व्हावे.” त्यावर आशा पारेख म्हणाली,” सिच्युएशन नसेल तर सिच्युएशन क्रिएट करा. पण गाणं माझ्यावर चित्रित व्हायला पाहिजे !” राज खोसलांना मोठा प्रश्न पडला काय करायचे? सिनेमाची हिरोईन च जर असा हट्ट करत असेल तेव्हा तो हट्ट पुरावाच लागतो. त्याने निर्मात्यांशी चर्चा केली. आशा पारेखला त्यांनी देखील समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु ती ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हती. आशा भोसले तेव्हा टॉपची अभिनेत्री असल्यामुळे तिचे नखरे सांभाळणं गरजेचे होते. तेव्हा राज खोसला यांनी निर्णय घेतला की हे गाणे आशा पारेख वरच चित्रित केले जाईल. मग त्या साठी एक सिच्युएशन क्रिएट केले गेले धर्मेंद्र साधूच्या वेषामध्ये तिला भेटायला येतो त्यावेळेला हे गाणे ती गाते अशी सिच्युएशन निर्माण केली गेली.(Asha Parekh)
पण प्रश्न कायम राहिला. लक्ष्मी छाया च्या गाण्याचे काय? म्हणून पुन्हा त्यांनी आनंद बक्षी यांना एक गाणे लिहायला सांगितले. आनंद बक्षी यांनी गाणे लिहून दिले. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी त्याला मस्त संगीत दिले. ते गाणे होते ‘आया आया अटरिया पे कोई चोर…’ गंमत पहा ‘मेरा गाव मेरा देश’ या चित्रपटात एकूण पाच गाणी होती. त्यापैकी नायिकेवर फक्त एकच गाणे चित्रित होते ‘सोना लेजा रे चांदी लेजा रे ‘ एक युगलगीत होते जे धर्मेंद्र आणि आशा पारेख वर चित्रित झाले होते ‘कुछ कहता है ये सावन’ आणि उरलेली तिन्ही गाणी सहनायिका लक्ष्मी छाया हिच्यावर चित्रित होती. वर उल्लेख केलेल्या गाण्या व्यतिरीक्त दुसरं गाणं होतं ‘मार दिया जाय के छोड दिया जाये’ आणि तिसरे गाणे होते ‘हाय शरमाऊ किसी किसी को बताओ अपनी प्रेम कहानीया…’ म्हणजे नायिके पेक्षा इथे सहनियिकाच बाजी मारून गेली होती.लक्ष्मी छाया साठच्या दशकाच्या उत्तरार्धात आणि सत्तरच्या दशकाच्या पूर्वाधात एक हिट सहनायिका म्हणून लोकप्रिय झाली होती. (Asha Parekh)
============
हे देखील वाचा : ‘या’ चित्रपटातील आनंदची भूमिका राजकपूर यांना द्यायची होती…
============
जाता जाता थोडंसं लक्ष्मी छाया या अभिनेत्री बद्दल खरंतर अतिशय गुणी अशी ही कलाकार पण तिला नायिका म्हणून प्रेक्षकांनी स्वीकारले नाही. पण सहनायिका म्हणून तिने जबरदस्त कामगिरी केली. विशेषत: १९६६ सालच्या ‘गुमनाम’ या चित्रपटातील ‘जान पहचान हो…’ या तिच्या जबरदस्त पाश्चात्य शैलीतील नृत्यावर पब्लिक फिदा झाले. या नृत्यात तिच्यासोबत हरमन बेंजामिन होता. यानंतर ‘तिसरी मंजिल’,’ राम और शाम’,’ आया सावन झुमके’,’ बहारों के सपने’ यातील तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या पण तिला खऱ्या अर्थाने ओळख दिली ती ‘मेरा गाव मेरा देश’ या चित्रपटातील मुन्नीबाई च्या भूमिकेने. यानंतर अमिताभ बच्चन यांच्या ‘रास्ते का पत्थर’(१९७२) या सिनेमात तिची प्रमुख भूमिका होती. पुढे दो चोर, बिंदिया और बंदूक, शरफात छोड दी मैने, हैवान, दो फुल, धोती लोटा और चौपाटी या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या पुढे आली. १९७९ साली आलेल्या मराठी चित्रपट ‘पैजेचा विडा’ या सिनेमात तिची प्रमुख भूमिका होती. १९८५ नंतर तिने चित्रपटातील कामे कमी केली आणि नृत्य शाळा सुरू केली तिच्या अनेक विद्यार्थिनी पुढे बॉलीवूडमध्ये चमकल्या. लक्ष्मी छाया यांचा मृत्यू ९ मे २००४ रोजी झाला.