मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
जो जीता वोही सिकंदर: युथफुल म्युझिकल धमाका!
‘कयामत से कयामत तक’ या सुपरहिट चित्रपटानंतर नासिर हुसेन यांनी आपल्या पुढच्या चित्रपटाची घोषणा केली. चित्रपटाचे नाव होतं ‘जो जीता वही सिकंदर’(Sikandar) . या सिनेमाचे दिग्दर्शन देखील त्यांचा मुलगा मन्सूर खान हाच करणार होता. चित्रपटांमध्ये मुख्य नायकाच्या भूमिकेत नासिर हुसेन यांनी आपल्या पुतण्याला म्हणजे आमिर खानलाच घेतले होते. हा चित्रपट २२ मे १९९२ या दिवशी प्रदर्शित झाला आणि प्रचंड यशस्वी झाला. या सिनेमाच्या वेळी अनेक गमती जमती झाल्या. मुळात या सिनेमाची जी नायिका होती ती अर्धा सिनेमा झाल्यानंतर बदलण्यात आली होती!
किस्सा असा होता नासिर हुसेन यांनी प्रियदर्शन दिग्दर्शित एक तमिळ चित्रपट बघितला होता. त्यात गिरीजा शेट्टर ही अभिनेत्री काम करत होती. नासिर हुसेन यांना ती मुलगी खूपच आवडली लगेच तिला अप्रोच झाले आणि त्या मुलीला आपल्या आगामी ‘जो जीता वही सिकंदर’ (Sikandar) या चित्रपटासाठी साइन केले. गिरीजा अभिनेत्री म्हणून फार काही विशेष नव्हती.तिला देखील अभिनयात फारसा रस नव्हताच. पण निर्मात्याचा आग्रह असल्यामुळे तिला चित्रपटात घेण्यात आले.
प्रत्येक शॉट समजावून सांगताना मंसूर खान ला खूप त्रास होत असे. या चित्रपटाचे शूटिंग चाळीस टक्के पूर्ण झाल्यानंतर गिरिजा मद्रासला
आपल्या घरी गेली आणि तिथे आजारी पडली. आजारपणातून बरी होऊन पुन्हा सेट वर आल्यानंतर तिच्यात अमुलाग्र बदल झाला होता. ती कमालीची बारीक झाली होती तिच्या चेहऱ्यावर काही फोड देखील आले होते. अशी हीरोइन आता चालणे शक्यच नव्हते. त्यामुळे सर्वांनुमते तिला बदलण्याचा
निर्णय झाला.
आता ऐनवेळी कुणाला हीरोइन म्हणून घ्यायचे? हा प्रश्न निर्माण झाला. जूही चावला, नगमा, प्रतिभा सिन्हा यांना विचारले गेले. परंतु तिघीही आपल्या कामात प्रचंड बिझी असल्यामुळे तिथे आयशा झुल्का ची निवड झाली! जो प्रकार नायिकेच्या बाबत झाला तोच प्रकार खलनायकाच्या बाबत झाला या सिनेमात आधी मिलिंद सोमण खलनायक सादर करणार होता. पण वैयक्तिक कारणासाठी त्याने हा सिनेमा अर्ध्यातून सोडून दिला. त्या मुळे पुन्हा सर्व रिशूट करावे लागले. नंतर त्या भूमिकेसाठी तिथे दीपक तिजोरी ची निवड झाली. या भूमिकेसाठी आदित्य पंचोली देखील इंटरेस्टेड होता. सिनेमाचे कथानक बऱ्यापैकी १९७९ साली आलेल्या अमेरिकन चित्रपट ‘ब्रेकिंग अवे’ वर बेतलेले होते. खरंतर ही स्टोरी दिग्दर्शक मंसूर खान याला खूप आवडली होती.
‘कयामत से कयामत तक’ च्या आधीच त्याला या कथानकावर चित्रपट बनवायचा होता. पण वडील नासिर असेल यांनी प्रेम कथेला प्राधान्य दिल्याने ‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट आधी बनला. ‘जो जीता वही सिकंदर’ (Sikandar) हा चित्रपट तरुणांचा अतिशय लाडका सिनेमा. यातील थरारक सायकल रेस तरुणाईला खूप खूष करून गेली. या चित्रपटासाठी दिग्दर्शक मंसूर खान याने जवळपास दोन चित्रपट तयार होतील एवढी फिल्म वापरली याचे कारण या सिनेमांमध्ये रिप्लेसमेंट खूप झाल्या. नायिका आणि खलनायक यांच्यासोबतच यातील सादर केलेली पूजा बेदी हिची भूमिका देखील आधी करिश्मा नावाच्या एका मॉडेलला देण्यात आली होती पण तिला अजिबात अभिनय करण्यात करता येत नव्हता. त्यामुळे तिच्या जागी पूजा बेदीची निवड झाली.
हे देखील वाचा : यांच्या हट्टापाई राजकुमारीने १९७८ साली ही लोरी
नासीर हुसेन यांच्या चित्रपटातील गाणी १९५७ सालच्या ‘तुमसा नही देखा’ पासून मजरूह सुलतानपूरी लिहित. आर डी बर्मन हे त्यांचे खास संगीतकार. पण ‘कयामत से कयामत’ तक ला आनंद मिलिंद आणि ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटाला जतिन ललित यांनी संगीत दिले. चित्रपटांचे लोकेशन डेहराडून जरी दाखवले असले तरी संपूर्ण चित्रपट साउथ कडील भागात चित्रित झाला होता.
या चित्रपटातील राजपुताना कॉलेज आणि मॉडेल कॉलेज या दोन महाविद्यालयातील तरुणांच्या संघर्षाची कथा फार मनोरंजक पद्धतीने मांडली होती. चित्रपटाचे संगीत जबरदस्त होते. तरुणाईला आवडणारे होते. पहला नशा पहला ,यहा के हम सिकंदर,नाम है मेरा फोन्सेका,अरे यारो मेरे प्यारो हि आणि इतर गाणी मस्त जमली होती. या सिनेमाला फिल्मफेअर ची आठ नामांकने मिळाली तर सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट संकलनाचे पारितोषिक देखील मिळाले.आमीर खान च्या करीयर मधील महत्वाचा सिनेमा ठरला.