‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
किशोरकुमार आणि रफी : सलामत रहे दोस्ताना हमारा !
आपल्या देशातच नाही तर जगात कलावंतांचे फॅन क्लब असतात. आपापल्या आवडत्या कलाकाराबाबत फॅन क्लब प्रचंड पझेसिव्ह असतात. आपल्याकडे साउथ मध्ये रजनीकांतचे खूप मोठे फॅन क्लब आहेत. तिकडे बंगालमध्ये गुरुदेव टागोरांच्या रवींद्र संगीताबद्दल पझेसिव्ह असणारा एक मोठा वर्ग आहे. रफी किशोर (rafi and kishor) यांचे देखील जगभर चाहते आज देखील आहेत. त्यांच्यात कायम कोण श्रेष्ठ याची चर्चा होत असते. हे संगीताच्या बाबत जसे आहे तसेच अभिनेत्यांच्या बाबत देखील आहे. अमिताभ श्रेष्ठ की दिलीप कुमार किंवा शाहरुख श्रेष्ठ की अक्षय कुमार यावर हिरीरीने चर्चा करणारे प्रसंगी हमरी तुमरी वर देखील येतात! अर्थात या सगळ्याच्या मागे या रसिकांचे त्या कलाकारांच्या प्रति असलेलं प्रेम असतं हे नक्की.
सत्तरच्या दशकामध्ये किशोर कुमार अक्षरशः छा गया था. प्रत्येक संगीतकार , प्रत्येक अभिनेता त्याचा स्वर घेण्यासाठी आतुर होता. साहजिकच इतर पुरुष गायक काहीसे मागे पडले होते. त्या काळातील सिने गॉसिप्स मॅगझिन मधून रफी आणि किशोर यांच्यातील सुप्त संघर्षाबद्दल तिखट मीठ लावून छापून येत असे. किशोरने कशी रफीची छुट्टी केली असे फुशारकीचे पत्र देखील वाचकांच्या पत्रामध्ये छापून येत असे. (rafi and kishor)
पण खरंच तसे होते का? रफी आणि किशोर (rafi and kishor) यांच्या संघर्ष होता का? एकमेकांच्या काटाकाटीसाठी ते प्रयत्न करत होते का? या सर्व प्रश्नांचे उत्तर नाही असेच आहे. या दोघांमध्ये व्यावसायिक स्पर्धा होती कां? नक्कीच होती. पण त्याला एक डिग्निटी होती. अलीकडेच अमित कुमार यांनी किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांच्यातील मैत्री बाबतचे अनेक किस्से एका मुलाखतीत सांगितले. ते किस्से ऐकून या दोन महान कलाकारांमधील अद्वैत किती उच्च कोटीचं होतं हे लक्षात येतं.
या मुलाखतीत अमित कुमार यांनी असे सांगितले की १९७२ साली जेव्हा किशोर कुमार त्याच्या कारकिर्दीच्या अगदी टॉपवर पोहोचला होता. त्या काळात एका शो साठी किशोर कुमार आणि अमित कुमार लंडनला गेले होते. तिथे त्यांचा एक म्युझिकल शो होता. योगायोगाने त्याच काळात मोहम्मद रफी देखील लंडनमध्ये होते. कारण त्यांचा मोठा मुलगा तिथे बिझनेस करत होता. जेव्हा वर्तमानपत्रातून मोहम्मद रफी यांना असे कळाले की किशोर कुमार लंडनमध्ये आहे लगेच त्यांनी माहिती काढून किशोर कुमार सोबत संपर्क केला. आणि त्यांना मोठ्या आत्मीयतेने आपल्या घरी जेवायला बोलावले. (rafi and kishor)
किशोर कुमार जेव्हा रफी (rafi and kishor) यांच्याकडे लंडनला घरी जेवायला गेला तेव्हा रफी स्वतः दारात येऊन त्याने मोठ्या आनंदाने त्याला आलिंगन दिले. आणि सन्मानाने त्यांना हॉलमध्ये बसवले. दोघांनी भरपूर गप्पा मारल्या. दोन मित्रांमधील या गप्पा पाहून घरातली मंडळी खुश झाली. अमित कुमार सांगतात की त्यांच्यातील ते निर्मळ मैत्री पाहून आम्ही सर्वजण आश्चर्यचकित झालो कारण त्या काळातील मिडियामधून काहीच्या काही लिहून येत होते. किशोर कुमारने या मासिकांचा संदर्भ देखील आपल्या बोलण्यात दिला. त्यावर ते ऐकून ते दोघे मनसोक्त हसले.
किशोर कुमारने ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला एक चित्रपट निर्माण केला होता ‘दूर वादियो मे कही’ यात रफीने दोन गाणी गायली होती. या गाण्याचे रफीने मानधन अवघे एक रुपया घेतले होते! किशोर कुमारने खूप आग्रह केला. पण रफी म्हणाले, ”माझ्या भावाच्या सिनेमातील गाण्याचे मानधन मी कसे घेऊ?” (rafi and kishor)
३१ जुलै १९८० या दिवशी मोहम्मद रफी यांचे निधन झाले. ही वार्ता जेव्हा किशोर कुमार यांना कळाली तेव्हा ते ताबडतोब रफी विलामध्ये दाखल झाले. आणि रफीचे अचेतन शरीर पाहून त्यांच्या पायावर डोके ठेवून असा ओक्साबोक्शी रडत राहिले. या प्रसंगाबद्दल अमित कुमार सांगतात की मी किशोर कुमार यांना एवढे रडताना यापूर्वी कधीच पाहिले नव्हते! रफी किशोर (rafi and kishor) आणि मुकेश हे भारतीय सिनेमातील तीन आघाडीचे स्वर. पण तिघांचे एकमेकांबद्दल संबंध खूप चांगले होते. मुकेश यांचं अमेरिकेत निधन झालं. त्यांची बॉडी जेव्हा मुंबईत आली तेव्हा एअरपोर्टवर त्या वेळी रफी आणि किशोर कुमार हे दोघेही उपस्थित होते. त्यांच्या पार्थिवाला खांदा या दोघांनी दिला होता!