‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
कोणता सिनेमा पाहून राजकपूर प्रचंड अस्वस्थ झाले होते ?
स्वातंत्र्यानंतर भारतात पहिल्यांदा १९५२ साली जागतिक चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता. पन्नासचे दशक हे भारतासाठी नवे स्वप्न साकारणारे दशक होते. या दशकात भारताच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिप्रेक्ष्यात मोठे सकारात्मक असे बदल घडून येताना दिसत होते. जागतिक चित्रपट महोत्सव हा त्याचाच एक भाग होता. या फिल्म फेस्टिवलमध्ये जगातील उत्तमोत्तम चित्रपट दाखवण्यात आले. त्याचप्रमाणे जगभराच्या सिनेमातील नामांकित कलावंत या महोत्सवाला उपस्थित राहिले. त्या सर्वांच्या विचारांचे संचित भारताच्या चित्रपटाच्या बदलाला पूरक असे ठरले.(raj kapoor)
‘बायसिकल थीफ’ हा चित्रपट बघून दिग्दर्शक विमल रॉयअक्षरशः थक्क झाले. या माध्यमाची ताकद केवढी प्रचंड असते याची त्यांना जाणीव झाली. कल्पनारम्य मनोरंजक चित्रपट हे समाजासाठी गरजेचे असतात पण त्यापेक्षाही गरजेचे असतात इथल्या सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे चित्रपट आणि येथील सामाजिक स्थित्यंतराचे दर्शन घडवणारे चित्रपट. थोडक्यात कलात्मक चित्रपटाची हि एक नांदी होती. यांना रवींद्रनाथ टागोर यांची ‘दुई बीघा जोमी’ हि कविता आवडली होती त्या कवितेवरच संगीतकार सलील चौधरी यांनी काम केले आणि ‘दो बीघा जमीन’ या चित्रपटाची निर्मिती सुरू झाली.(raj kapoor)
शहरीकरणाच्या रेट्यात आणि भांडवलशाही प्रगतीमध्ये कष्टकरी समाजाची होणारी होरपळ या चित्रपटात अतिशय प्रभावीपणे दाखवली होती. आपल्या ‘दो बीघा जमीन’चा तुकडा सावकाराच्या पाशातून पुन्हा मिळविण्यासाठी एक कष्टकरी जीव अक्षरशः कलकत्त्याच्या रस्त्यावर हाताने ओढणारी रिक्षा चालवतो आणि पोटाची खळगी भरतो. गरीबीचे हे भीषण वास्तव फार प्रभावीपणे विमल रॉय यांनी या चित्रपटात मांडले होते.बलराज सहानी, निरुपा रॉय आणि मीना कुमारी यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. बलराजने साकारलेला शंभू महातो ऑल टाईम ग्रेट परफॉरर्मंस होता.
या सिनेमाचा प्रीमियर १६ जानेवारी १९५३ रोजी मुंबईमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रीमियरला यांनी राज कपूर(raj kapoor) यांना देखील निमंत्रित केले होते. हा चित्रपट बघितल्यानंतर राज कपूर एकदम शांत झाले. ते काहीही न बोलता आपल्या गाडीत येऊन बसले. त्यांची पत्नी कृष्णा कपूर त्यांच्या सोबत होती. तिलाही कळेना राज कपूरला नेमके काय झाले. संपूर्ण प्रवासात राजकपूर एक शब्द देखील बोलले नाही. त्या दिवशी रात्री अन्नाचा एक कण देखील त्यांनी खाल्ला नाही. रात्रभर ते अंथरुणावर तळमळत होते.
सकाळी उठल्यानंतर ते (raj kapoor) कृष्णा कपूरला म्हणाले, ”मी काय चित्रपट काढतो आहे? हे काय सिनेमे झाले का? सिनेमा असावा तर असा तो ‘दो बीघा जमीन’ सारखा! जो मस्तक सुन्न करून टाकतो. याला म्हणतात खरा सिनेमा. मला अशा प्रकारचा सिनेमा काढता आला पाहिजे. आणि मी त्या पद्धतीने आता प्रयत्न करणार आहे.” कृष्णा कपूरने सांगितले, ”तुम्ही जे चित्रपट काढता ते देखील इथल्या शोषित वंचितांची व्यथाच पडद्यावर मांडत असतात.” त्यावर राज कपूर म्हणाले, ”हो ,पण त्याला मी मनोरंजनाची फोडणी देऊन लोकप्रिय करत असतो. मला सिनेमा लोकप्रिय नाही झाला तरी चालेल पण परिणामकारक व्हावा.
असा चित्रपट मी आता निर्माण करणार आहे.” लगेच त्यांनी(raj kapoor) ख्वाजा अहमद अब्बास यांना आपल्या ऑफिसमध्ये बोलून घेतले आणि आपली तळमळ त्यांना बोलून दाखवली. सर्व आर के ची टीम कामाला लागली. आणि यातूनच ‘जागते रहो’ या चित्रपटाची निर्मिती झाली. या सिनेमाचे दिग्दर्शक राज कपूर यांनी स्वतः न करता शंभू मित्र या बंगाली दिग्दर्शकाला करायला सांगितले. ‘दो बीघा जमीन’ प्रमाणेच ‘जागते रहो’ हा देखील एक कल्ट क्लासिक सिनेमा बनला.
=======
हे देखील वाचा : शशी कपूरचा पहिला सुपरहिट सिनेमा
=======
यात रात्रभर घोटभर पाणी पिण्यासाठी तळमळत राहणाऱ्या एका श्रमिकाची व्यथा राज कपूरने फार सुंदर रित्या या चित्रपटात मांडली होती. हा चित्रपट राज कपूरने(raj kapoor) हिंदी सोबत बंगालीमध्ये (एक दिन रात्रे) देखील बनवला होता. दोन्ही चित्रपटांचे संगीत सलील चौधरी यांनी दिले होते. ‘जागते रहो’ हा चित्रपट ३ ऑगस्ट १९५६ रोजी प्रदर्शित झाला. ‘दो बीघा जमीन’ या चित्रपटाला ‘ऑल इंडिया सर्टिफिकेट ऑफ मेरिट फॉर बेस्टफिचर फिल्म’ हा पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मिळाला तसेच या चित्रपटाला कांस फिल्म फेस्टिवल मध्ये आणि कार्लोव्ही व्हेरी या फेस्टिवल मध्ये पुरस्कार मिळाला. आपल्याकडील फिल्मफेअर पुरस्कार सोहळात सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन असे दोन पुरस्कार या चित्रपटाला मिळाले.
धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी