‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
वीरजारा : मदनमोहन च्या संगीतात फुललेली प्रेमकथा!
संगीतकार मदन मोहन यांचे पुत्र संजीव कोहली(Sanjeev Kohli) यांची एक इच्छा होती की अमिताभ बच्चन आणि हेमामालिनी यांच्या एखाद्या चित्रपटाला आपल्या वडिलांनी संगीत द्यावे. कारण हे दोन्ही कलाकार संजीव कोहली यांचे अतिशय आवडते कलाकार. पण मदन मोहन यांचे १४ जुलै १९७५ रोजी दुर्दैवी निधन झाल्याने त्यांची ही अपेक्षा अधुरीच राहीली. पण दैवाचे खेळ कसे असतात ते पहा त्यांची ही अपुरी, अधुरी इच्छा तब्बल तीस वर्षानंतर पूर्ण झाली! ते कसे काय? सांगतो.
संजीव कोहली(Sanjeev Kohli) यांचा लहानपणापासूनच अमिताभ बच्चन हा आवडीचा कलाकार होता. अमिताभ आणि हेमामालिनी यांचे चित्रपट त्यांना खूप आवडायचे. या दोघांना घेऊन एक चित्रपट बनवावा आणि त्या चित्रपटाला आपल्या वडिलांचे संगीत असावे असे त्यांना खूप वाटायचे. पण ते शक्य झाले नाही. अमिताभ बच्चन यांच्या एका चित्रपटाला संगीत मदन मोहन यांचे संगीत नक्कीच होते. १९७१ साली आलेल्या ‘परवाना’ या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांची भूमिका होती आणि या चित्रपटाला संगीत मदन मोहन यांचे होते. परंतु या चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांची खलनायकाची भूमिका होती. या चित्रपटाचे नायक होते नवीन निश्चल.
त्याचप्रमाणे अभिनेत्री हेमामालिनीच्या एका चित्रपटाला संगीतकार मदन मोहन यांनी सांगितले होते. १९७३ साली आलेल्या ‘शराफत छोड दी मैने’ या चित्रपटाला मदन मोहन यांचे संगीत होते. पण या दोन्ही चित्रपटांमध्ये अमिताभ आणि हेमा एकएकटे होते. मदन मोहन यांचे पुत्र संजीव कोहली(Sanjeev Kohli) यांना ह्या दोघांचा एकत्रित चित्रपट असावा असे वाटत होते. संगीतकार मदन मोहन यांचा मृत्यू झाला तेव्हा ते ‘मौसम’, ‘लैला मजनू’ या चित्रपटाला संगीत देत होते. अर्धवट ‘लैला मजनू’ नंतर संगीतकार जयदेव यांनी पूर्ण केला. गुलजारचा ‘मौसम’ (१९७५) हा चित्रपट संगीतकार मदन मोहन यांना डेडिकेट करण्यात आला.
या चित्रपटाच्या प्रीमियरला यश चोप्रा यांना देखील बोलण्यात आले होते. तेव्हा यश चोप्रा यांनी संगीतकार मदन मोहन यांच्या संगीताची खूप तारीफ केली. संजीव कोहली हे देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांना वाटत होते खरंच यश चोप्रासारख्या मातब्बर दिग्दर्शक आणि आपल्या वडिलांना संगीतकार म्हणून कुठल्यातरी एखाद्या सिनेमात एकत्र यायला हवे होते.
पण ते शक्य झाले नाही. संजीव कोहली यांना मदन मोहन यांच्या खोलीमध्ये एक खजिना सापडला यात त्यांना अनेक टिप्स सापडल्या ज्यावर संगीतकार मदन मोहन यांनी काही टीम्स तयार करून ठेवल्या होत्या हा खजिना सापडल्यानंतर संजीव कोहली(Sanjeev Kohli) यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा होणार आहे आपल्या वडिलांचा तो मोलाचा खजिना त्यांनी जपून ठेवला.
काळ बदलला संजीव कोहली यांनी कलकत्त्याच्या आय आय एम मधून मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले. २००० साली ते यशराज फिल्म्समध्ये सीईओ म्हणून जॉईन झाले. आता यश चोप्रा आणि त्यांच्या रोजच भेटी होऊन लागल्या. यश चोप्रा यांना संजीव कोहली(Sanjeev Kohli) यांनी सांगितले की, ”माझे वडील मदन मोहन यांच्या बऱ्याच अनयूज्ड अशा ट्युन्स बनवून ठेवलेल्या आहेत.” यश चोप्रा यांना ते ऐकून खूप आनंद वाटला. ते संजीव कोहली यांना म्हणाले, ”यातील काही ट्युन्स घेऊन आपण जावेद अख्तर त्यांच्याकडून त्यावर शब्द लिहून घेऊ आणि एक चित्रपट बनवू!”
========
हे देखील वाचा : अशाप्रकारे आशा पारेख ठरली हिट गर्ल…
========
त्या पद्धतीने ‘वीरजारा’ हा चित्रपट २००५ साली बनला. या चित्रपटाला संगीत मदन मोहन यांचे होते. मदन मोहन यांच्या मृत्यूनंतर तब्बल तीस वर्षानंतर हा चित्रपट आला. मदन मोहन यांनी तयार केलेल्या ट्युन्सवरील संगीत रसिकांना गोल्डन इरामधील संगीत आपण ऐकतो आहोत असे वाटले.
या चित्रपटांमध्ये शाहरुख खान, प्रीती झिंटा, मनोज वाजपायी आणि राणी मुखर्जी यांच्या प्रमुख भूमिका होत्या तसेच या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि हेमामालिनी यांच्या देखील भूमिका होत्या. या दोघांवर एक गाणे देखील चित्रित झाले होते. मदन मोहन यांचे पुत्र संजीव कोहली(Sanjeev Kohli) यांची तीस वर्षांपूर्वीची एक अधुरी इच्छा पूर्ण झाली होती.
मदन मोहन यांच्या अनयुज ट्युन्स वापरल्या गेल्या होत्या आणि अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्यावर चित्रित झालेले एक होळीचे गाणे देखील मदन मोहन यांनी तयार केलेल्या एका संगीत रचनेवरच बनले होते. अशा रीतीने संजीव कोहलींची इच्छा तीस-पस्तीस वर्षानंतर पूर्ण झाली! वाईट एकच वाटते त्या वर्षीच्या फिल्म फेअर अवार्ड सोहळ्यात सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून मदनमोहन (वीरजारा) च्या तुलनेत अन्नू मलिक ला ‘मै हू ना‘ साठी मिळाले!
धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी