‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
बॉलिवूडचे शहेनशाह Amitabh Bachchan ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने’ सन्मानित
बॉलिवुड मधून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. 24 एप्रिल 2024 रोजी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची 82 वी पुण्यतिथी होती आणि या खास प्रसंगी गेल्या 34 वर्षांप्रमाणे यंदाही मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान संस्थान त्यांच्या स्मरणार्थ चित्रपट, समाज, कला आदी क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. अशातच बॉलिवूडचे शहेनशाह अर्थात बिग बी यांना बुधवारी लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.बच्चन यांना उषा मंगेशकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आशा भोसले यांना हा पुरस्कार देण्यात येणार होता, मात्र आजारपणामुळे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत. अमिताभ यांच्याव्यतिरिक्त इतरही अनेक स्टार्सना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, त्यापैकी एक प्रसिद्ध म्हणजे ए. आर. रेहमान. संगीत दिग्दर्शक ए. आर. रहमान यांना मास्टर दीनानाथ पुरस्कार आणि अभिनेता रणदीप हुडा यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.(Amitabh Bachchan)
मुंबईतील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात अमिताभ बच्चन यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. समोर आलेल्या फोटोंमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत रणदीप हुड्डाही स्टेजवर दिसत आहे. या सन्मानासाठी निवड झाल्याबद्दल अमिताभ बच्चन यांनी जनतेचे आभार मानले आहेत. यावेळी अभिनेत्याचा मुलगा अभिषेक बच्चनदेखील त्यांच्यासोबत दिसला. यावेळी पद्मिनी कोल्हापुरे देखील स्टेजवर दिसत आहे.
यावेळी अमिताभ बच्चन म्हणाले, ‘मी स्वत:ला अशा पुरस्कारासाठी कधीच पात्र मानले नाही, पण हृदयनाथजींनी येथे येण्यासाठी खूप प्रयत्न केले. गेल्या वर्षी त्यांनी मला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. हृदयनाथ जी, मी मागच्या वेळी तुमची माफी मागतो. तेव्हा मी तुम्हाला सांगितले होते की, मी आजारी आहे. या वर्षी माझ्याकडे कोणतेही निमित्त नव्हते, म्हणून मला येथे यावे लागले.
===========================
===========================
मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार- ए. आर. रहमान (दीर्घ संगीत सेवा), मोहन वाघ पुरस्कार- गालिब नाटक (उत्कृष्ट नाट्यलेखन २०२३-२३), आनंदमयी पुरस्कार – दीपस्तंभ फाऊंडेशन मोराळे, मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार- पद्मिनी कोल्हापुरे (दीर्घ चित्रपट सेवा), मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार- रूपकुमार राठोड (दीर्घ संगीत सेवा), मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार- रणदीप हुडा (उत्कृष्ट चित्रपट निर्मिती) कलावंतांना प्रदान करण्यात आले.