‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
Mrunal Thakur ने केले रिलेशनशिप आणि बॉडी शेमिंगवर भाष्य, एग्ज फ्रीज करण्याचा ही अभिनेत्री करतेय विचार
टेलिव्हिजनपासून बॉलीवूड आणि नंतर दाक्षिणात्य चित्रपटांपर्यंत प्रवास करणारी अभिनेत्री मृणाल ठाकूरने अतिशय कमी वेळात ग्लॅमर विश्वात स्थान मिळवले आहे, आणि हे प्रत्येक संघर्षशील अभिनेत्रीचे स्वप्न असते. नुकतेच मृणाल ठाकूरने एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि नात्याबद्दल सांगितले आणि हे ही सांगितले की तिला आपले एग्ज फ्रीज करण्याचा विचार करत आहे. याशिवाय मृणालने आपल्या आयुष्यातील खडतर दिवस आणि त्या अडचणींमधून बाहेर पडण्याच्या संघर्षाचाही उल्लेख केला.(Mrunal Thakur On Body Shaming)
“मी माझ्या शरिराच्या कर्व्सला फ्लॉन्ट करून सौंदर्याचा तो दर्जा बदलणार आहे. पूर्वी मी बॉडी-हगिंग करणारे कोणतेही कपडे घालायला घाबरत असे, पण आता मी ‘बॉडी हगिंग’ला प्राधान्य देते सौंदर्य आणि परिपूर्ण शरीराचा निकष ठरवण्यासाठी आपल्याला कर्दाशियनांची गरज का भासते? रस्त्यावर फिरणारी प्रत्येक स्त्री इतकी सुंदर आणि सुडौल असते, त्या सर्व ब्यूटी आहे.’ बॉडी पॉझिटिव्हिटीबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, ‘असे काही दिवस होते जेव्हा मला जाग यावी असे वाटायचे नाही, मला माझ्या पलंगावरून उठायला व्हायचे नाही, परंतु मी ते केले. इतरांसाठी नाही, तर स्वत:साठी.”
ती पुढे अस ही म्हणाली, ‘मला एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस, आठवडे आणि बरेच महिने मला दु:ख व्हायचे, पण आपल्या कुटुंबाशिवाय कुणालाच त्याची पर्वा नसते, त्यामुळे वाईट दिवस आले तर चांगले दिवसही येतील, याची आठवण करून देणं मला खूप गरजेचं वाटतं.’ नात्यांविषयी बोलताना मृणाल म्हणाली, “नातेसंबंध, मला माहित आहे की ते कठीण आहे, परंतु म्हणूनच आपल्याला आपल्या कामाचे स्वरूप समजून घेणारा योग्य जोडीदार हवा आहे. मृणाल च्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती विजय देवरकोंडासोबत तेलुगू चित्रपट ‘द फॅमिली स्टार’ मध्ये दिसली होती. हा चित्रपट आज, 26 एप्रिलपासून अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर पाहता येत आहे.(Mrunal Thakur On Body Shaming)
===========================
हे देखील वाचा: Tamannaah Bhatia Summoned: अभिनेत्री तमन्ना भाटियाला सायबर सेलकडून समन्स
===========================
टीव्ही स्टार्ससाठी चित्रपटांमध्ये प्रवेश करणे सहसा सोपे नसते. पण मृणालने ते केले. आणि आता मृणालच्या कामाचं सतत कौतुक होत असून ती सतत वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये दिसत आहे. तसेच अभिनेत्रीचा फॅशन सेन्स ही लोकांना आवडतो.