Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

Big Boss 19: ‘आता बघूच कोण जातंय…’ Pranit More साठी अंकिता वालावलकरने बसीर

Nana Patekar एक्स गर्लफ्रेंड मनिषा कोईरालाबद्दल काय म्हणाले?

Subodh Bhave लवकरच आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार; हिंदीत साकारणार ‘ही’

अनुराधा : Hrishikesh Mukherjee यांची भावरम्य कविता!

Amitabh Bachchan यांचं खरं नाव ‘हे’ असतं; भाऊ अजिताभने केला

Crew 2 चित्रपटाची तयारी सुरु; पुन्हा ३ अभिनेत्रींचं त्रिकुट धम्माल

स्त्री आणि भेड़ियाच्या जगात नवीन सुपरहिरो Thama ची एन्ट्री!

Bappi Lahiri ने संगीत दिलेल्या गाण्याला किशोर कुमारने कसे इम्प्रोवाइज केले?

‘मनाचे श्लोक’मधून Leena Bhagwat – मंगेश कदम मोठ्या पडद्यावर प्रथमच

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

संगीतकार नौशाद आणि मदन मोहन: निर्व्याज्य मैत्रीची भावस्पर्शी कथा!

 संगीतकार नौशाद आणि मदन मोहन: निर्व्याज्य मैत्रीची भावस्पर्शी कथा!
बात पुरानी बडी सुहानी

संगीतकार नौशाद आणि मदन मोहन: निर्व्याज्य मैत्रीची भावस्पर्शी कथा!

by Team KalakrutiMedia 09/05/2024

हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातील एक प्रतिभावान संगीतकार म्हणजे संगीतकार मदन मोहन(madan mohan). अतिशय भावोत्कट चाली देणारा हा संगीतकार गझल प्रांतातील बादशहा होता. लता मंगेशकर– राजा मेहंदी अली खान आणि मदन मोहन या त्रिकूटाने हिंदी चित्रपट संगीतातील गजलांचे एक दालन अतिशय समृद्ध करून ठेवले आहे.

संगीतकार मदन मोहन(madan mohan) हा अतिशय प्रतिभावान संगीतकार होता पण तितकाच दुर्दैवी देखील होता. त्या बिचाराच्या वाट्याला कधीच चांगले बॅनर, चांगले नायक आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या चित्रपटाचे संगीत जरी चांगले असले तरी ते सिनेमे अक्षरश: फ्लॉप होत होते. त्यामुळे संगीतकार मदन मोहन यांना ‘फ्लॉप चित्रपटांचा हिट संगीतकार’ असे देखील म्हटले जाते. अर्थात त्यामुळे मदन मोहनच्या संगीताचे महत्त्व अजिबात कमी होत नाही.

१९६२ साली मोहन कुमार यांनी एक चित्रपट दिग्दर्शित केला होता ‘अनपढ’. या चित्रपटातील सर्वच गाणी अतिशय गोड आणि भावस्पर्शी बनली होती. यात लता मंगेशकर यांची पाच बेहतरीन गाणी होती. ‘आपकी नजरोने समझा प्यार के काबिल मुझे’, ‘वो देखो जला घर किसी का’. ‘जिया ले गये हो मोरा सावरिया’, ‘है इसी मे प्यार की आबरू वो जफा करे मै वफा करू’, आणि ‘रंग बिरंगी राखी लेके आयी’. मदन मोहन(madan mohan) यांना या चित्रपटाकडून खूप काही अपेक्षा होत्या. पण नेहमीप्रमाणे चित्रपट चालला नाही. निदान या चित्रपटाच्या संगीतासाठी फिल्मफेअर अवार्ड मिळेल अशी अपेक्षा मदन मोहन यांना होती. ‘अनपढ’  या चित्रपटाला संगीतासाठी फिल्मफेअरचे नामांकन मिळाले पण पारितोषिक नाही मिळाले!  

पण या चित्रपटातील एका गझले बाबत संगीतकार नौशाद यांनी फार मोठे विधान मदन मोहन यांचे कार्य कर्तृत्व सिद्ध करणारे असे केले होते. या चित्रपटात एक गझल होती ‘है इसी मे प्यार की आबरू वो जफा करे में वफा करू’ ही गझल ऐकल्यानंतर संगीतकार नौशाद यांना खूप आवडली. रात्रभर ती तबकडी नौशाद ऐकत बसले. सकाळी उठल्यानंतर ते तडक मदन मोहन(madan mohan) यांच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं “आपने ‘अनपढ’ में जो गजल बनाई है वो वाकइ में काबिले तारीफ है. उस पर मेरा सारा संगीत कुर्बान है. अगर मै भी इस गझल को संगीत देता तो यकीनन आपके जैसा नही बना सकता. मदन मोहन जी मेरे सारे गाने आप ले लिजिये और आपका ये गाना मेरे नाम कर दीजिये! यह गाना कोई दुसरा मोसिकार इतना सुंदर बना ही नही सकता!”

संगीतकार नौशाद यांचे हे उद्गार ऐकून मदन मोहन अक्षरशः सद्गतीत झाले. त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. ते म्हणाले ‘नौशाद जी आप कितने सीनियर हो. हम तो आपके शागीर्द है.” त्यावर नौशाद म्हणाले, ”ये ज्युनिअर सीनियर का सवाल नही है. क्वालिटी का सवाल है और जिस अंदाज से आपने एक गझल बनाई है वो काबील तारीफ है!” हे ऐकताच मदन मोहन यांनी नौशाद यांना मिठीच मारली.

========

हे देखील वाचा : महात्मा गांधींनी आयुष्यभरात पाहिला एकच हिंदी चित्रपट!

========

त्यावर नौशाद म्हणाले, ”मै ये मेरी ये राय सिर्फ आपको देख के नही बता रहा हु. मै किसी मजने मे भी यही बताऊंगा.” नंतर काही दिवसांनी एका कार्यक्रमात नौशाद यांनी मदन मोहनच्या(madan mohan) या गझलचे आणि मदन मोहनच्या संगीताचे मनापासून कौतुक केले. तो काळ निरोगी स्पर्धेचा होता. प्रत्येकाला दुसऱ्याच्या कलेबाबत आदर होता. याच संगीतकार नौशाद यांनी ‘आजाद’ (१९५५) या चित्रपटाचे संगीत जे त्यांच्या स्वतःकडे आले होते त्यांनी स्वतःहून संगीतकार सी रामचंद्र यांच्याकडे दिले होते!

आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये हे सर्व अजब आणि न पटणारे आहे पण त्या काळातील सर्वांमध्येच एक भावनिक ओलावा होता एक दुसऱ्याची कदर होती आणि जाणीव होती. त्यामुळेच त्या काळात बनलेल्या कलाकृती आज देखील तितक्याच ताज्या आणि टवटवीत वाटतात. आज ६०-७० वर्षे झाली तरी ती गाणी आपल्याला आजही मनाला मोहून टाकतात.

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment lata mangeshkar madan mohan Naushad Ali Raja Mehdi Ali Khan
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.