Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

‘या’ दिवशी रिलीज होणार ‘पंचायत 3’चा ट्रेलर; कलाकारानेच पोस्ट शेअर करत दिली बातमी
ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या सर्वात प्रसिद्ध वेब सीरिजमध्ये सामील झालेला ‘पंचायत 3′ पुन्हा एकदा ओटीटीवर धडक देण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत चर्चा सुरू आहे. वेब सीरिजच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत सतत सस्पेन्स होता. निर्मात्यांनी पंचायत ३ ची घोषणा लौकीचा वापर करून केली. त्याचबरोबर आता या वेब सीरिजचा ट्रेलर कोणत्या दिवशी रिलीज होणार हे जाहीर करण्यात आले आहे. होय, ‘पंचायत ३’च्या ट्रेलरची रिलीज डेट समोर आली आहे. यासोबतच एक नवीन पोस्टर ही शेअर करण्यात आली आहे.(Panchayat 3 Trailer Release Date)

‘पंचायत 3′च्या ट्रेलरची रिलीज डेट समोर आली असून पोस्टरसोबत शेअर करण्यात आलेले कलाकार प्रधान रघुबीर यादव, मंजू देवी म्हणजेच नीना गुप्ता, बनराकस उर्फ दुर्गेश कुमार, त्याची पत्नी क्रांती देवी उर्फ सुनीता रजवार आणि आमदार चंद्र किशोर सिंह म्हणजेच पंकज झा, सानविका तसेच चंदन राय म्हणजेच विकास अशा स्टारकास्टमध्ये शेअर करण्यात आले आहे. पोस्ट पाहिल्यावर असं वाटतं की, यावेळी फुलेरा गावात प्रचंड गदारोळ होणार आहे.

‘पंचायत ३’च्या ट्रेलर रिलीजची तारीख सांगताना या वेब सीरिजचे नवे पोस्टर शेअर करण्यात आले आहे, ज्यात गावकरी काठीने भिडताना दिसत आहेत. बनारकसची भूमिका साकारणाऱ्या दुर्गेश कुमारने हे पोस्टर शेअर केले आहे. आणि सीरिजचा ट्रेलर १७ मे रोजी प्रदर्शित होणार असल्याचेही त्याने सांगितले आहे. एकीकडे ट्रेलर पाहण्यासाठी लोक उत्सुक झाले आहेत, तर दुसरीकडे सचिव कुठे आहेत? ते या पोस्टरमध्ये का नाहीत? असे प्रश्नही उपस्थित केले जात आहे.(Panchayat 3 Trailer Release Date)
=========================
हे देखील वाचा: सेरोगेसीच्या माध्यमातून निर्माती एकता कपूर दुसऱ्यांदा होणार आई? खरी माहीती आली समोर
=========================
‘पंचायत ३‘ ही वेब सीरिज 28 मे 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर आपल्याला ही पाहता येणार आहे. याचा पहिला सीझन 3 एप्रिल 2020 रोजी रिलीज झाला होता. त्यानंतर दुसरा सीझन 18 मे 2022 रोजी आला आणि आता तिसरा सीझन 28 मे रोजी येणार आहे