आमिर खानचा मुलगा जुनैद खानचा पहिला चित्रपट ‘महाराज’चा फर्स्ट लूक रिलीज
‘वी आर फॅमिली‘ आणि ‘हिचकी‘ या चित्रपटांमध्ये आपल्या कामासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक सिद्धार्थ पी. मल्होत्रा ‘महाराज’ नव्या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून ओटीटीवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटातून आमीर खानचा मुलगा जुनैद खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सिद्धार्थ आणि ओटीटी स्ट्रीमर नेटफ्लिक्सच्या इन्स्टाग्राम पेजवर या प्रोजेक्टचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले. ज्यात जुनैद खान आणि जयदीप अहलावत यांचा समावेश आहे. हे फोटो आता इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.(Junaid Khan Debut Film Maharaj First Look)
जुनैदचा हा पहिलाच चित्रपट आहे. जाणून घेउयात हा चित्रपट तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता. जुनैद खान गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र, हा पहिला चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार नाही तर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर स्ट्रीम केले जाईल. १४ जून रोजी प्रदर्शित होणारा आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून १८०० च्या दशकावर आधारित आहे. सामान्य माणूस माणसाला आणि समाजाला कशी मदत करतो हे यातून आपल्याला पहायला मिलणार आहे.
जुनैद खान, जयदीप अहलावत, शर्वरी वाघ आणि शालिनी पांडे हे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. विपुल मेहता आणि स्नेहा देसाई यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. वायआरएफ एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली आदित्य चोप्रा ने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘एक शक्तिशाली व्यक्ती आणि एक निर्भीड पत्रकार यांच्यातील सत्याची लढाई’. महाराज हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे.(Junaid Khan Debut Film Maharaj First Look)
==============================
हे देखील वाचा: Dhadak 2 संदर्भात करण जोहरची मोठी घोषणा,जान्हवी आणि ईशानच्या जागी दिसणार ‘ही’ जोडी
=============================
‘महाराज‘ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. अर्जुन रेड्डी फेम शालिनी पांडे या चित्रपटात जुनैदसोबत दिसणार आहे. शर्वरी या चित्रपटात एका खास भूमिकेत दिसणार आहे. ‘महाराज‘ या चित्रपटाचे लेखन विपुल मेहता यांनी केले असून चित्रपटाचे संगीत सोहेल सेन यांनी दिले आहे. आणि यशराज फिल्म्स महाराजांची प्रस्तुती करत आहे. हा चित्रपट १४ जून २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.