Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    indian cinema

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून का डच्चू दिला होता?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

“Tesla आणलीत, पण चांगले रस्ते केव्हा आणणार?” Actor Shashank Ketkar

Gharoghari Matichya Chuli मालिकेत जबरदस्त ट्विस्ट; रणदिवे कुटुंब ऐश्वर्यावर करणार

Rajinikanth : नाहीतर ‘दशावतार’मध्ये दिसले असते रजनीकांत !

Sachin Pilgoankar :  ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

War 2 x Coolie : बॉक्स ऑफिसवर कुणी मारली बाजी?

Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन

“Ramayana चित्रपट हॉलिवूडपेक्षा कमी नसणार”; सनी देओलची प्रतिक्रिया चर्चेत

Mahesh Manjrekar : डॉन बॉस्कोचा विद्यार्थी ते सिनेसृष्टीतला बेस्ट आर्टिस्ट

Supriya Pilgoankar : सबनीस ते पिळगांवकर होण्यापर्यंतचा फिल्मी प्रवास…

Sholay सिनेमात हि कव्वाली का समाविष्ट होऊ शकली नाही?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते ‘स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार’ गायक-संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना प्रदान!

 पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते ‘स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार’ गायक-संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना प्रदान!
Singer Tyagraj Khadilkar
Press Release

पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते ‘स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार’ गायक-संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना प्रदान!

by रसिका शिंदे-पॉल 05/06/2024

सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृती जपणारा आणि कुठलाही बडेजावपणा न आणता अत्यंत साधेपणाने घरगुती मंगलमय वातावरणात गेली २७ वर्षे साजरा होणारा ‘स्व. अरुण पौडवाल यांच्या स्मृति प्रित्यर्थ देण्यात येणारा “कृतज्ञता गौरव पुरस्कार” नुकताच प्रसिद्ध गायक संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधाजी पौडवाल यांच्या हस्ते आणि कवीता पौडवाल-तुळपुळे व पौडवाल कुटुंबियांच्या उपस्थितीत, त्यांच्या खार येथील निवास्थानी प्रदान करण्यात आला. ५१ हजार रोख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.(Singer Tyagraj Khadilkar)

Singer Tyagraj Khadilkar
Singer Tyagraj Khadilkar

या गौरव सन्मानाची संकल्पना विशद करताना सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल म्हणाल्या, “अरुणजी हे स्वतः एक अतिशय उच्चकोटीचे संगीतकार – म्युझिशियन होते. त्यामुळे कलाकारांचा योग्य तो सन्मान व्हायला पाहिजे. बहुतेकवेळा त्यांचे फॅन्स काही सत्कार सोहळे करीत असतात. पण आर्टिस्टने एका आर्टिस्टचा सन्मान करणे याला जास्त महत्व आहे. आजचा हा २७ वा सोहळा आहे. याच्या आधी ज्या ज्या कलाकारांनी अरुणजींसोबत काम केले आहे, ज्यांना त्यांच्या कामाची पद्धत, त्यांचा स्वभाव माहित आहे अश्या कलावंतांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी त्यागराज यांची निवड करण्यामागे विशेष कारण आहे.”

Singer Tyagraj Khadilkar
Singer Tyagraj Khadilkar

या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना गायक संगीतकार त्यागराज खाडिलकर म्हणाले, “माझ्यासाठी हा अत्यंत महत्वाचा पुरस्कार आहे. गेल्या २६ वर्षातील पुरस्कार्थींची यादी पाहिल्यावर खरंतर मी थरारून गेलो. अरुणजींच्या नावाचा हा पुरस्कार मिळविणाऱ्यांच्या या मांदियाळीमध्ये माझीही नोंद झाली हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अरुणजींच्या संगीताचे आणि संगीतसंयोजनाचे अनेक संस्कार माझ्यावर झाले आहेत. माझ्या गाण्यांतून ते आपल्याला पदोपदी जाणवतात सुद्धा. या प्रतिभावान संगीतकाराची गाणी आजही तितक्याच लोकप्रियतेने गायली जातात. त्यांच्या नावाचा पुरस्कार लाभावा आणि तोही साक्षात पद्मश्री अनुराधाताई यांच्या हस्ते ही माझ्यासाठी विशेष भाग्याची आणि प्रेरणादाई गोष्ट आहे.(Singer Tyagraj Khadilkar)

===========================

हे देखील वाचा: मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांना भावला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’, तरुणांना ही चित्रपट पाहण्याचे केले आवाहन

==========================

हा सोहळा अनुराधा पौडवाल यांच्या निवास्थानी स्थित दक्षिणेश्वरी काली माता मंदिरात संपन्न झाला. याच वेळी ‘स्वरकुल ट्रस्ट’तर्फे सादर झालेल्या “तिमीरातुनी तेजाकडे” या भारतातील पहिल्या दिव्यांग कलाकारांनी गायलेल्या अल्बम मधील अतुल कसबे आणि विजयालक्ष्मी यादव या दोन दिव्यांग गायकांना देखील अनुराधाजींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले! या अंध गायकांनी गायलेल्या महाराष्ट्रातील नवोदित गीतकरांच्या त्यागराजजींनी स्वरबद्ध केलेल्या रचनांना उपस्थितांचा भरभरून प्रतिसाद दिली!

=

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Anuradha Paudwal Arun paudwal award Entertainment Singer Singer tyagraj khadilkar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.