मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
Bigg Boss OTT 3 मध्ये सामिल होणार अभिनेता जावेद जाफरी?
बिग बॉस ओटीटी ३ ची सध्या बरीच चर्चा आहे. हा शो २१ जूनपासून ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. या वर्षी हा शो सलमान खान नाही तर अनिल कपूर होस्ट करणार आहे. त्यामुळे बिग बॉस ओटीटी 3 च्या तिसऱ्या सीझनबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. मात्र, यंदा बिग बॉसच्या घरात कोणते स्टार्स कैद होणार याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. रिपोर्ट्सनुसार, या शोसाठी विश्वात्मा,अभिनेत्री सोनम खान आणि अभिनेत्री सना खान यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. दरम्यान, अभिनेता जावेद जाफरीला बिग बॉस ओटीटी 3 साठी अप्रोच करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.(Javed Jaaferi in Big Boss OTT 3)
‘द खबरी‘ आणि ‘बिग बॉस तक‘च्या म्हणण्यानुसार, बिग बॉस ओटीटी 3 च्या निर्मात्यांनी अभिनेता जावेद जाफरीशी संपर्क साधला असून त्याची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र ही बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांची या शोबद्दलची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. जावेद जाफरी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकले आहेत. ‘धमाल‘ चित्रपटातील जावेदच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. याशिवाय जावेद जाफरी ‘जे जंत्रम एम मंत्रम’ या चित्रपटातही दिसला होता.
जावेद जाफरी व्यतिरिक्त अभिनेत्री तनुश्री दत्ता, क्रिती सेननची बहीण नुपूर सेनन, सुपरहिट चित्रपट विश्वात्मा अभिनेत्री सोनम खान, सना खान, सई केतन राव, प्रसिद्ध वडापाव गर्ल चंद्रिका आणि डॉली चायवाला यांसारख्या सेलिब्रिटींशी संपर्क साधण्यात आला आहे. त्याचबरोबर निर्माते शहजादा धामी, शिवांगी जोशी, मॅक्सटर्न, विशाल पांडे, तारक मेहता का उल्टा चश्मा फेम भव्या गांधी यांच्याशीही चर्चा करत आहेत. त्यामुळे या सीझनमध्ये बिग बॉसच्या घरात कोणते स्पर्धक धुमाकूळ घालताना दिसतील हे पाहावं लागेल. (Javed Jaaferi in Big Boss OTT 3)
===============================
हे देखील वाचा: जाणून घ्या यावेळी Bigg Boss OTT 3 मध्ये कोणते सेलेब्स येऊ शकतात?
===============================
यावेळी बिग बॉस ओटीटी ३‘ अभिनेता अनिल कपूर होस्ट कराणार आहे आणि नुकतीच त्यांची पतेरकार परिषद पार पडली यावेळी अनिल कपूर म्हणाले की- ‘असे वाटते की मी वयाने रिवर्स करत आहे. बिग बॉस खरोखरच टाइमलेस आहे. असं वाटतंय की मी पुन्हा शाळेत जातोय आणि काहीतरी नवीन रोमांचक करण्याचा प्रयत्न करतोय.”