मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
ऋषीकपूर – नीतू सिंगची गुलकंदी लव्हस्टोरी !
सत्तरच्या दशकातील लोकप्रिय रोमँटिक जोडी म्हणजे ऋषी कपूर आणि नीतू सिंग. त्या काळातील तरुणाईला या जोडीने अक्षरशः वेड लावले होते. या दोघांची पडद्यावरची आणि पडद्यामागची केमिस्ट्री इतकी परफेक्ट होती की त्यांच्या चित्रपटाला सारी तरुणाई वेड्यासारखी गर्दी करत असे. ऋषी कपूर आणि नीतू सिंग हे पहिल्यांदा १९७३ साली भेटले ‘जहरीला इंसान’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी. ऋषी कपूर (Rishi kapoor) हा पहिल्यापासून चॉकलेट बॉय इमेज असलेला कलाकार. सहनायिका नीतू सिंगसोबत त्याचे फ्लर्टिंग या सिनेमापासून सुरु झाले.
ऋषी कपूरचा या रिलेशनकडे पाहण्याचा खूपच कॅज्युअल अप्रोच होता. नीतू सिंग मात्र पहिल्यापासून त्याच्याबाबत सिरियस होती. पण ऋषी कपूर (Rishi kapoor) मात्र तितका तिच्यात इन्व्हॉल नव्हता. तो नीतू सिंगला म्हणायचा, ”आपली मैत्री अशीच राहील. लग्न वगैरे करून नको बंधनात अडकायला!” १९७५ साली ऋषी कपूर आणि नीतू सिंग यश चोप्रा यांच्या ‘कभी कभी’ या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी काश्मीरला गेले होते. काश्मीरची गुलाबी थंडी तिथंलं रोमँटिक वातावरण या दोघांना आणखी जवळ करून गेलं.
पण ऋषी कपूर मात्र भारी हा पठ्या काही प्रेमाचा इजहार करतच नव्हता. त्यानंतर ऋषी कपूर काश्मीरहून थेट पॅरिसला त्याच्या ‘बुलेट’ नावाच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी निघून गेला. पॅरिससारख्या रोमँटिक शहरात मात्र त्याला आता नीतू सिंगची आठवण येत होती. त्याने तिथून तिला टेलिग्राम केला आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यात त्याने लिहिले होते ‘सिखनी, तेरी बहुत याद आती है’. हा ऋषीकडून प्रेमाचा पहिला संदेश होता. नीतू सिंग आता आंतर बाह्य फुलून आली. कारण पहिल्यांदाच ऋषी कपूरने आपल्या प्रेमाचा इजहार केला होता. तिने धावत धावत जाऊन यश चोप्रा यांना तो टेलिग्राम दाखवला. पण प्रेमाची गाडी पुढे सरकत नव्हती.
ऋषी कपूर नंतर भारतात परत आला. ऋषी – नीतू यांचे चित्रपट आता प्रचंड यशस्वी होत होते. खेल खेल में, झूठा कही का, रफू चक्कर, धन दौलत, दुसरा आदमी, कभी कभी…. या दोघांच्या प्रेमाला आता चांगलाच बहर आला होता. ऋषी कपूरची बहिण रितू नंदा हिला आपल्या भावाच्या प्रेमाची कुणकुण लागली होती. तिने नीतू सिंगला कॉन्टॅक्ट करून कन्फर्मेशन मिळवले. ऋषी कपूर सहजासहजी एंगेजमेंटला तयार होणार नाही याची रितूला जाणीव होती.
तिने एक आयडिया केली. ती तेंव्हा दिल्लीत रहात होती. तिने दिल्लीला तिच्या घरी एक फॅमिली फंक्शन आहे म्हणून सर्व कपूर फॅमिलीला तिकडे बोलावून घेतले तसेच नीतू सिंगच्या फॅमिलीला बोलावून घेतले. सर्व सिंग आणि कपूर फॅमिली एकत्र आल्यानंतर रितू सिंगने सरप्राईज देत ऋषी कपूर (Rishi kapoor) आणि नीतू सिंग यांचे एंगेजमेंट घडवून आणली! त्यानंतर २२ जानेवारी १९८० या दिवशी या दोघांनी लग्न केले.
या लग्नात मोठा धुमधडाका होता. सेलिब्रिटींचे लग्न त्यामुळे अख्ख बॉलीवूड लग्नाला उपस्थित होते. पाकिस्तान म्हणून खास एका मशहूर कव्वाली गायकाला बोलवलं होतं. रात्रभर त्याच्या कव्वालीचा कार्यक्रम चालला. कव्वाली गाणारा हा कलाकार होता नसरत फतेह अली खान. हा त्यांचा भारतातील पहिला परफॉर्मन्स होता. इथूनच त्यांची भारतीय चित्रपट संगीतात एन्ट्री झाली. या लग्नात आणखी एक अभूतपूर्व गोष्ट घडली. या लग्नाच्या निमित्ताने दिलेल्या पार्टीला नर्गीसने आपले पती सुनील दत्त आणि पुत्र संजय दत्तसोबत हजेरी लावली. ‘जागते रहो’ या सिनेमाच्या शूट नंतर तब्बल २४ वर्षानी राज – नर्गीस एकत्र आले.
=========
हे देखील वाचा : तडप तडप के इस दिल की आह निकलती रही ….
=========
नाचगाणी, खाणंपिणं याची चांगल होती. या पारंपारिक पद्धतीने झालेल्या लग्नात नीतू सिंग आणि ऋषी कपूर (Rishi kapoor) प्रचंड थकले होते. नीतू सिंगचा सुहागन का जोडा इतका वजनदार होता की त्याच्या ओझाने ती एकदा चक्क थकून अतिश्रमाने चक्कर येऊन पडली होती!