Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असलेला अल्लू अर्जुनचा ‘Pushpa 2’ च्या प्रदर्शनाची तारीख जाऊ शकते पुढे?

 प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असलेला अल्लू अर्जुनचा ‘Pushpa 2’ च्या प्रदर्शनाची तारीख जाऊ शकते पुढे?
Pushpa 2 Gets Postponed
मिक्स मसाला

प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असलेला अल्लू अर्जुनचा ‘Pushpa 2’ च्या प्रदर्शनाची तारीख जाऊ शकते पुढे?

by रसिका शिंदे-पॉल 13/06/2024

सध्या दाक्षिणात्य चित्रपटांची सगळीकडेच जोरदार चर्चा सुरू आहे. कुठे प्रभासच्या नावाचा बोलबाला आहे , तर कुठे राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरच्या चित्रपटांची वाट पाहिली जात आहे. पण सध्या बहुप्रतीक्षित चित्रपटांच्या यादीत अग्रस्थानी असलेला सिनेमा म्हणजे पुष्पा : द रूल. येत्या १५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माते पोस्ट प्रॉडक्शनचे काम ही जोरात करत आहेत. नुकतीच या चित्रपटाची दोन गाणी प्रेक्षकांसमोर आली, त्यातल पहिल- ‘पुष्पा पुष्पा’ आणि दुसर-अंगारोसा. या दोन्ही गाण्यांनीप्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. तर या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच 1000 कोटींचा व्यवसाय ही केला आहे. दरम्यान, चाहत्यांसाठी आता एक वाईट बातमी येत आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’चे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. चित्रीकरणाबरोबरच पोस्ट प्रॉडक्शनचे कामही सुरू करण्यात आले आहे . पण मध्यंतरी दोन संपादकांनी हा चित्रपट सोडला. पण तरी असे असूनही इतर संपादकांसह टीम काम न थांबवता तयारी करत आहे.(Pushpa 2 Gets Postponed)

Pushpa 2 Gets Postponed
Pushpa 2 Gets Postponed

खरं तर हा चित्रपट प्रदर्शित होण्यास अवघे 2 महिने शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे हा चित्रपट वेळेवर प्रदर्शित होणार का, असा प्रश्न सर्वांना पडला होता. आणि आता त्याचं उत्तरही समोर आले आहे. नुकताच एक साइटमध्ये मध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली होती. ‘पुष्पा : द रूल‘ सध्या शूटिंग मोडमध्ये असल्याची माहिती समोर आली होती. अल्लू अर्जुन जूनच्या मध्यापर्यंत चित्रीकरणाचा काही भाग पूर्ण करण्याची योजना आखत आहे. पण शूटिंग पूर्ण करण्यासाठी टीमला आणखी एका महिन्याची गरज आहे असे त्यात म्हंटले होते . सुकुमार आणि त्यांच्या टीमने काही भागांची पुनर्रचना केली आहे, जे नुकतेच पुन्हा चित्रित करण्यात आले.

Pushpa 2 Gets Postponed
Pushpa 2 Gets Postponed

तसेच चित्रपटातील व्हीएफएक्सच्या आतापर्यंतच्या कामावर सुकुमार समाधानी नसल्याचेही या अहवालात म्हटले जात आहे. सध्या त्यावर काम सुरू असून, ते पूर्ण होण्यास वेळ लागणार आहे. वेळापत्रकानुसार ‘पुष्पा २’चे चित्रीकरण जुलै अखेरपर्यंत होणार आहे. अशा परिस्थितीत १५ ऑगस्टला हा चित्रपट पडद्यावर आणणे पूर्णपणे अशक्य आहे. दिग्दर्शक सुकुमार यांना हा चित्रपट वेळेवर आणायचा आहे, पण त्याला ही उशीर होऊ शकतो.(Pushpa 2 Gets Postponed)

=================================

हे देखील वाचा: हृतिक रोशनची बहीण पश्मिना रोहनचा पहिला सिनेमा ‘इश्क विश्क रिबाऊंड’चा ट्रेलर रिलीज

=================================

त्याचबरोबर टीमने २४ तास काम करावे आणि वेळेत काम पूर्ण करावे, अशी ही अल्लू अर्जुनची इच्छा आहे. मात्र, निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच नव्या प्रदर्शनाच्या तारखेबाबतही कोणतीही चर्चा झालेली नाही. पण तसे झाले तर १५ ऑगस्टला इतर दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित होऊ शकतात. मात्र ‘पुष्पा २’ ची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांना अजून काही काळ वाट पहावी लागू शकते. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Allu Arjun Allu arjun pushpa 2 Celebrity Entertainment Pushpa 2 Gets Postponed Rashmika Mandanna
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.