‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
चंकी पांडे बनला बांगला देशाचा सुपरस्टार अमिताभ बच्चन !
ऐंशीच्या दशकाच्या मध्यावर एक देखणा अभिनेता बॉलीवूडमध्ये आला होता पण तो काळ मल्टीस्टार सिनेमाचा असल्यामुळे सोलो हिरो म्हणून त्याला अजिबात यश मिळाले नाही. नायकाचा मित्र, नायकाचा भाऊ अशा सपोर्टिंग भूमिका करत करत तो अक्षरश: वैतागला होता. पण १९९३ साली त्याला एक सुपरहिट सिनेमा मिळाला. तो त्या वर्षीचा सर्वाधिक बॉक्स ऑफिस कलेक्शन करणारा चित्रपट होता पण या चित्रपटाने देखील या अभिनेत्या करीता यशाची दारं काही उघडली नाही. उलट या सिनेमानंतर त्याला सपोर्टिंग ऍक्टरच्या भूमिका देखील मिळणं कमी होऊन गेले. (chunky pandey)
अशा कठीण वेळेला त्याने चक्क बांगलादेशचा रस्ता धरला आणि तिकडच्या सिनेमातला तो बघता बघता सुपरस्टार झाला! बांगला देशचा अमिताभ बच्चन अशी त्याची ख्याती झाली! त्याची लोकप्रियता त्या देशात इतकी प्रचंड होती की लग्नानंतर त्याच्या चाहत्यांनी हनिमूनला बांगला देशात बोलावले! कोण होता हा अभिनेता आणि काय होती त्याची अफलातून स्टोरी? हा अभिनेता होता चंकी पांडे! (chunky pandey)
आजची पिढी अनन्या पांडेला चांगलं ओळखते. या अनन्या पांडेचे वडील म्हणजे चंकी पांडे. २६ सप्टेंबर १९६२ या दिवशी चंकी पांडेचा जन्म झाला. आई-वडील दोघेही सुशिक्षित डॉक्टर. त्यामुळे बालपण मजेत गेलं. खरं नाव सुयश पांडे. पण काम करणाऱ्या मावशी त्याला चंकी, चंकी म्हणून बोलवत होत्या आणि हेच नाव त्याला कायमच चिकटलं. अभ्यासात त्याला फारशी गती नव्हती. त्यामुळे त्याने मॉडेलिंग हे क्षेत्र निवडले. अभिनयाचं प्रॉपर शिक्षण घेतलं. काही काळ अॅक्टींग स्कूलमध्ये तो इन्स्ट्रक्टर म्हणून देखील काम करत होता.
अक्षय कुमार आणि सलमान खान यांना ग्रुमिंग करण्याचं काम देखील चंकीने केलं होतं. एका पार्टीत त्याची भेट पहलाज निहलानी यांच्याशी झाली आणि पहिल्याच भेटीत त्यांना तो आवडला. लगेच त्यांनी चंकी पांडेला दोन चित्रपट ऑफर केले. चंकी पांडेचा (chunky pandey) पहिला चित्रपट होता १९८७ सालचा ‘आग ही आग’. या मल्टीस्टारर सिनेमात त्याने शत्रुघन सिन्हा, धर्मेंद्र यांच्यासोबत स्क्रीन शेअर केला. यानंतर पुढचा चित्रपट होता ‘पाप की दुनिया’ यात सनी देओल प्रमुख नायक होता. दोन्ही चित्रपटात सहाय्यक अभिनेत्याची भूमिका केल्यामुळे त्याला तशाच भूमिका ऑफर होत होत्या.
तो काळ मल्टीस्टारर सिनेमाचाच असल्यामुळे त्याचे अनेक सिनेमे येऊन गेले पण कोणत्या सिनेमात त्याची स्वतंत्र ओळख काही झाले नाही. १९८८ सालच्या ‘तेजाब’मध्ये मात्र तो ठळक लक्षात राहिला. यात त्याच्यावर ‘सो गया ये जहां सो गया आसमान’ हे गाणे त्याच्यावर चित्रित होते. या काळात चंकीने ‘गुनाहो का फैसला’, ‘खतरों के खिलाडी’, ‘अग्नी’, ‘मिट्टी और सोना’, ‘कसम वर्दी की’, ’घर का चिराग’, ‘गोला बारूद’, ‘जहरीले’, ‘नाकाबंदी, ‘आज के शहेनशहा’, ‘कोहराम’, ‘खिलाफत’ असे चिक्कार सिनेमे केले पण कुठेही चंकी पांडे (chunky pandey) ही त्याची ओळख निर्माण करू शकला नाही. तो प्रचंड वैतागला होता. सिनेमे मिळत होते. यशस्वी होते. पण नाव होत नव्हतं.
याच काळात डेव्हिड धवन यांनी चंकी पांडे आणि गोविंदाला घेऊन ‘आंखे’ हा चित्रपट १९९३ साली दिग्दर्शित केला. हा चित्रपट तुफान यशस्वी झाला. त्यावर्षीचा बॉक्स ऑफिसवर कलेक्शन करणारा तो नंबर एकचा चित्रपट ठरला पण या सिनेमाचा गोविंदाला जितका फायदा झाला तितका फायदा चंकीला झाला नाही उलट तोटाच झाला. कारण त्याला आता सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिका देखील मिळणं बंद झालं. नव्वदच्या दशकामध्ये शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांची एन्ट्री झाली होती तर दुसरीकडे अक्षय कुमार, सुनील शेट्टी, सैफ अली खान हे ॲक्शन हिरो देखील मैदानात आले होते. त्यामुळे चंकी पांडेला (chunky pandey) भूमिका मिळणे कमी होऊ लागले.
याच काळात त्याचा एक बांगला देशचा मित्र त्याच्या मदतीला जाऊन आला. त्याने चंकीला सांगितले “तुझ्या चित्रपटांना आमच्या देशांमध्ये भरपूर लोकप्रियता मिळते. तू बांगलादेश फिल्म इंडस्ट्रीमध्ये ट्राय का करत नाहीस?” चंकी पांडेने नाही हो करत चक्क ढाक्का गाठले आणि बांगलादेश फिल्म इंडस्ट्री त्याने काम करायला सुरुवात केली ते साल होते १९९५. पुढची तीन-चार वर्ष चंकी पांडे (chunky pandey) बांगलादेशच्या सिनेमाचा सुपरस्टार झाला. तिकडच्या सिनेमाचा तो अमिताभ बच्चन ठरला. त्याच्या तिकडच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड मोठी यश मिळवले.
मायराव मानुष, स्वामी केनो अशामी, फूल ओर पोथोर, प्रेम कोरोची देश कोरोची हे चंकीचे बांगला देशातील सिनेमे बंपर हिट ठरले. १९९७ साली त्याने त्याची गर्लफ्रेंड भावना पांडे सोबत लग्न केले आणि हनिमूनला चक्क तो बांगलादेश ला गेला. पण नंतर त्याच्या मित्रांनी सांगितले की,” बांगलादेश वगैरे ठीक आहे. पण तुझी खरी जागा बॉलीवूड आहे. तू परत ये.” १९९८ मध्ये तो भारतात परत आला आणि चांगल्या भूमिकाच्या शोधात राहिल आता पुन्हा स्ट्रगल वाटायला आला होता. पण चांगल्या भूमिकाच्या तो शोधात होता.
=========
हे देखील वाचा : यश चोप्रा यांनी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना केले दिग्दर्शित !
=========
२००३ साली त्याला ‘कयामत: सिटी अंदर थ्रेट’ या चित्रपटात चांगली भूमिका मिळाली आणि तिथून पुन्हा एकदा त्याची चलती सुरू झाली. यानंतर चंकीने ‘अपना सपना मनी मनी’, ‘दरवाजा बंद करलो’, ‘डॉन-2’, ‘फूल अँड फायनल’, ‘ओम शांती ओम’, ‘हॅलो डार्लिंग’, ‘पेइंग गेस्ट’ संकट सिटी’, ‘दे दना दन’, ‘शॉर्टकट’, ‘रेडी’, ‘रासकल’, ‘बुलेट राजा’, ‘हिम्मतवाला’, ‘हमशकल’ या सिनेमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला पण त्याला खरी आयडेंटिटी पुन्हा मिळाली ‘हाउसफुल’ या सिरीजच्या चित्रपटातून. या चित्रपटाच्याच्या चारही भागातून चंकी पांडे प्रेक्षकांच्या भेटीला आला.आज चंकी पांडेच्या (chunky pandey) कारकिर्दीकडे जर आपण सिंहावालोकन केले तर खूप अप अँड डाऊन दिसतात पण जिद्दीच्या चंकी पांडेने स्वतःला सिद्ध करून दाखवले हे नक्की!