Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यांच्यातील संघर्ष दाखवणाऱ्या ‘लाईफलाईन’चा टिझर प्रदर्शित

 आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यांच्यातील संघर्ष दाखवणाऱ्या ‘लाईफलाईन’चा टिझर प्रदर्शित
Lifeline Marathi Movie Teaser
मिक्स मसाला

आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यांच्यातील संघर्ष दाखवणाऱ्या ‘लाईफलाईन’चा टिझर प्रदर्शित

by रसिका शिंदे-पॉल 15/07/2024

महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त अभिनेते अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांची प्रमुख भूमिका असणारा ‘लाईफलाईन‘ चित्रपट येत्या २ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान ‘लाईफलाईन‘ चित्रपटाचा टिझर नुकताच सोशल मीडियावर झळकला आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यांच्यातील संघर्ष या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून प्रख्यात डॉक्टर आणि एका किरवंतामध्ये ही चुरस रंगणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. त्यात आता या टिझरने ही उत्सुकता अधिकच वाढवली आहे. अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यातील ही वैचारिक जुगलबंदी कोणत्या कारणासाठी आहे, पाहाण्यासाठी मात्र प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.(Lifeline Marathi Movie Teaser)

Lifeline Marathi Movie Teaser
Lifeline Marathi Movie Teaser

 क्रिसेंडो एंटरटेनमेंट प्रस्तुत या चित्रपटात अशोक सराफ, माधव अभ्यंकर यांच्यासह हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. साहिल शिरवईकर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहेत.

Lifeline Marathi Movie Teaser
Lifeline Marathi Movie Teaser

तर अशोक पत्की यांचे संगीत लाभलेल्या या चित्रपटातील गाणी अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायली आहेत. लालजी जोशी, कविता शिरवईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिद्री आणि क्रिसेंडो एंटरटेनमेंट ‘लाईफलाईन’चे निर्माते आहेत. “आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. आता या जुगलबंदीत कोण जिंकणार, हे चित्रपट पाहूनच कळेल. (Lifeline Marathi Movie Teaser)

===================================

हे देखील वाचा:

===================================

अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांसारखे दिग्गज या चित्रपटाला लाभले आहेत. त्यांनी हा विषय आपल्या जबरदस्त अभिनयाने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे. ‘लाईफलाईन’ हा एक कौटुंबिक चित्रपट असून मराठी सिने-सृष्टीतील दर्जेदार चित्रपटांच्या यादीत ओळखला जाईल याची मला खात्री आहे.” अशा भावना चित्रपटाबद्दल दिग्दर्शक साहिल शिरवईकर यांनी व्यक्त केल्या.’लाईफलाईन‘ चित्रपट येत्या २ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Actor Madhav Abhyankar ashok saraf ashok saraf movie Entertainment Lifeline Marathi Movie Teaser Marathi Movie marathi movie 2024
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.