Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘स्काय फोर्स’ ते ‘रेड २’ बॉलिवूडच्या चित्रपटांचं Box Office Collection!

OG कान्स क्वीन Aishwerya Rai-Bachchan च्या रॉयल लूकने वेधलं लक्ष!

Kalam : मराठमोळा दिग्दर्शक उलगडणार ‘मिसाईल मॅन’चं जीवनचरित्र!

Raja Shivaji : मराठीतील पहिल्या बिग बजेट ऐतिहासिक चित्रपटात हिंदीतील

Shaktimaan Returns : चाहत्यांच्या भेटीला पुन्हा येतोय प्रसिद्ध शो ‘शक्तिमान’;

Rana Naidu Season 2 Release Date: ‘राणा नायडू सीझन 2’

Shatir Marathi Movie: मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या अनियंत्रित जत्रेतून “शातिर” चित्रपटाची

Sanjeev Kumar : ‘एक्स्ट्रा पासून एक्स्ट्रा ऑर्डीनरीपर्यंत झेप घेणारा अभिनेता

Hera Pheri 3 : राजूने पाठवली बाबू भैय्याना २५ कोटींची

Ramayan : रणबीर कपूर आणि यश स्क्रिन शेअर करणार नाहीत;

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

स्वातंत्र्यदिनी ‘अलबत्या गलबत्या’ नाटक रंगभूमीवर करणार विश्वविक्रम !

 स्वातंत्र्यदिनी ‘अलबत्या गलबत्या’ नाटक रंगभूमीवर करणार विश्वविक्रम !
Albatya Galbatya Natak World Record
नाट्यकला

स्वातंत्र्यदिनी ‘अलबत्या गलबत्या’ नाटक रंगभूमीवर करणार विश्वविक्रम !

by Team KalakrutiMedia 31/07/2024

प्रायोगिक, व्यावसायिक नाटय़सृष्टीच्या युगात सध्याच्या घडीला लहान मुलांसाठी काही विशेष नाटकं रंगभूमीवर आली आणि या नाटकांनी लहानांसोबत मोठ्यांचीही मने जिंकली. ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटकही त्यापैकीच एक. रत्नाकर मतकरी लिखित हे नाटक रंगभूमीवर आणण्याचं शिवधनुष्य निर्माते राहुल भंडारे यांनी उचलले आणि या बालनाट्यानं इतिहास घ़डवला. तुफान लोकप्रियता मिळवणारं ‘अलबत्या गलबत्या’ नाटक आता एका नव्या विश्वविक्रमासाठी सज्ज झालं आहे. झी मराठी प्रस्तुत आणि अद्वैत  थिएटर निर्मित ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाची टीम येत्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला सलग ६ प्रयोग करत मराठी बालरंगभूमीच्या इतिहासात पहिल्यांदाच जागतिक विक्रम करण्यासाठी सज्ज झाले आहेत. सकाळी ७.०० ते रात्री १०.३० यावेळेत हे ६ विश्वविक्रमी प्रयोग दादरच्या श्री शिवाजी मंदिर  मध्ये रंगणार आहेत.(Albatya Galbatya Natak World Record)

Albatya Galbatya Natak World Record
Albatya Galbatya Natak World Record

मराठी रंगभूमीवर ‘मैलाचा दगड’ ठरलेल्या या नाट्यकृतीचा अशा प्रकारचा प्रयोग कलाकार, तंत्रज्ञ या सर्वांनाच एक मोठं आव्हान असलं तरी कलावंतांना हा नाट्यानुभव खूप काही शिकवणारा असेल असं मत निर्माते राहुल भंडारे यांनी व्यक्त केलं. हा भव्य नाट्यपट  एकाच दिवशी, एकाच थिएटरमध्ये एकापाठोपाठ बघणं म्हणजे नाट्यरसिकांसाठी पर्वणीच आहे. या सलग नाट्यानुभवाच्या संकल्पनेला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या नाटकाची जोरदार तिकीटविक्री सुरु झाली आहे. स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्याचा आनंद अधिक द्विगुणित करायचा असेल तर छत्रपती शिवाजी मंदिर ट्रस्ट यांच्या सहयोगाने ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाचे होणारे हे सलग प्रयोग अजिबात चुकवू नका.

Albatya Galbatya Natak World Record
Albatya Galbatya Natak World Record

अनेक विक्रमांना गवसणी घालत ‘अलबत्या गलबत्या’ बालनाट्याची घौडदौड सुरू आहे. कोविडचा काळ सोडला तर ६ वर्षात ८०० प्रयोगांचा टप्पा पार केला आहे आणि विक्रमी १००० व्या प्रयोगाकडे वाटचाल सुरू आहे. कलेप्रती असणारी बांधिलकी जपत कलाक्षेत्रासाठी वेगळं काहीतरी करू पाहणाऱ्या कलावंतांमध्ये निर्माते राहुल भंडारे यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल.‘अलबत्या गलबत्या’नाटकाच्या प्रयोगाच्या तिकीटांसाठी नाट्यरसिकांनी लावलेल्या रांगा या त्याच्या अभूतपूर्व यशाची कल्पना देतात. या नाटकाने बालरंगभूमीवर अनेक यशस्वी प्रयोग केले आता  सलग नाटय़ानुभवाचा ऐतिहासिक प्रयोग करत जागतिक विक्रमाच्या मानाचा तुरा ‘अलबत्या गलबत्या’नाटकाच्या शिरपेचात रोवला जाणार आहे.(Albatya Galbatya Natak World Record)

===============================

हे देखील वाचा: ऐतिहासिक चित्रपटातुन प्रेम मिळवलेल्या अभिनेता अंकित मोहनने व्यक्त केले मराठी भाषेवरचे प्रेम…

===============================

या सर्व नाट्यानुभवासाठी नाटकाच्या  टीमने जय्यत तयारी सुरु केली आहे. कलाकार व संपूर्ण टीमचा डायटिशियनच्या सल्ल्याने आहार, डॉक्टरांची  टीम, आरामाची व्यवस्था, सजावट ते इतर सगळी जय्यत तयारी या नाटकाच्या टीमने नव्या विश्वविक्रमासाठी केली आहे.या नाटकाचे दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर यांनी केले आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Albatya Galbatya Natak Albatya Galbatya Natak World Record Celebrity Celebrity News chinmay mandalekar Entertainment marathi drama marathi drama news marathi kids drama Marathi Natak shivaji mandir dadar vaibhav mangale natak
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.