दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
जेव्हा चार दिग्गज स्वर एका गाण्यासाठी एकत्र येतात…
हिंदी सिनेमा प्लेबॅक सिंगिंगची प्रथा तीसच्या दशकात सुरू झाली. १९३५ सालच्या ‘धूप छाव’ या सिनेमासाठी पहिल्यांदा हा प्रयोग केला गेला. संगीतकार होते पंकज मलिक आणि आर सी बोराल. चाळीसच्या दशकात ती कला खऱ्या अर्थाने बहरली. स्वातंत्र्यानंतर हळूहळू चार प्रमुख स्वरांनी या क्षेत्रात आपलं स्थान पक्क केलं. लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार आणि मुकेश. अर्थात आशा भोसले, तलत महमूद, हेमंत कुमार, मन्ना डे, सुमन कल्याणपूर, उषा मंगेशकर यांचे स्वर देखील सोबतीला होतेच पण भारतीय चित्रपट संगीतातील चार प्रमुख गायक कलावंतांची नावे सांगायची तर वर सांगितलेलीच चार नावे आधी घ्यावी लागतील. (Manmohan Desai)
अर्थात या सर्व गायक कलाकारांच्या स्वरांनी भारतीय चित्रपट संगीत अधिकाधिक समृद्ध होत गेले हे नक्की. पण या चार प्रमुख गायकांना घेऊन एकत्र गाणं करावं असा प्रयत्न आधी झाला होता की नाही माहित नाही पण तो सफल झाला सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात. या चार दिग्गजांना एकत्र आणून एक गाणं बनवण्याचं क्रेडिट जातं दिग्दर्शक मनमोहन देसाई (Manmohan Desai) यांना. दिग्दर्शक मनमोहन देसाई हे नाव सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील मसाला मनोरंजक सिनेमासाठी अग्रक्रमाने घ्यावे असे होते. अमिताभ बच्चन यांची कलाकार कारकीर्द घडवण्यामध्ये मनमोहन देसाई यांचा मोठा हात होता.
१९७७ साली त्यांचा एक चित्रपट आला होता ज्याची निर्मिती आणि दिग्दर्शन त्यांनी स्वत: केले होते. या चित्रपटाचे नाव ते ‘अमर अकबर अँथनी’. हा एक मल्टीस्टारर मसाला इंटरटेनमेंट सिनेमा होता. त्यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा तो चित्रपट होता. अमिताभ बच्चन याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार याच चित्रपटासाठी मिळाला होता. या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, ऋषी कपूर, परवीन बाबी, शबाना आजमी, नीतू सिंग यांच्या प्रमुख भूमिका होत्या. एवढे मोठे स्टार असल्यामुळे सिनेमाला एक वेटेज आले होते.
मनमोहन देसाई यांना वाटलं की एवढ्या मोठ्या स्टारला घेऊन आपण एक गाणं बनवावे. आता एवढे कलाकार आहेत तर आवाज देखील तेवढे लागतील. पण मनमोहन देसाई (Manmohan Desai) यांनी सहा ऐवजी चार स्वर गाण्यांमध्ये वापरायचे ठरवले. पुरुष गायकांमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासाठी किशोर कुमार, ऋषी कपूर यांच्यासाठी मोहम्मद रफी, आणि विनोद खन्नासाठी मुकेश तर तिन्ही नायिका परवीन बाबी, नीतू सिंग आणि शबाना आजमी या तिघींसाठी फक्त एकाच म्हणजे लता मंगेशकर यांचा स्वर यांनी वापरायचे ठरवले. चित्रपटाच्या इतिहासात पहिल्यांदाच हे चार स्वर एकत्र आले होते. आनंद बक्षी यांनी हे गाणं लिहिलं होतं. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी त्याला साजेस संगीत दिलं.
हे गाणं होतं ‘हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे….’ या सिनेमात ऋषी कपूरने एका कव्वालचा रोल केला होता त्यामुळे या गाण्यातील त्याच्या वाट्याला आलेले कडव्यात देखील कव्वालीचा ठेका पकडला आहे. ही आयडीया मनमोहन देसाई (Manmohan Desai) यांची होती. विनोद खन्नासाठी धीर गंभीर आवाजामध्ये मुकेश गातो तर किशोर कुमार अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातील अँथनीच्या स्टाईलमध्ये गातो. या गाण्याच्या रेकॉर्डिंगला खरोखरच धमाल आली असणार. हे चार दिग्गज स्वर केवळ या एकाच गाण्यात एकत्र आले पुन्हा कधीच एकत्र आले नाहीत.
==========
हे देखील वाचा : फोनवरील एका संवादातून गुलशन बावरा यांना सुचले रोमॅण्टिक गाणे!
==========
या गाण्याच्या रेकॉर्डिंगनंतर काही दिवसातच मुकेश यांचे निधन झालं. हा चित्रपट १९७७ साली प्रदर्शित झाला. प्रचंड हिट झाला. हे गाणं देखील प्रचंड चाललं. यानंतर चार वर्षांनी १९८१ साली मनोज कुमार यांचा ‘क्रांती’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटात देखील तीन दिग्गज गायक एकत्र आले होते. किशोर कुमार, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी गाण्याचे बोल होते ‘चना जोर गरम बाबू मै लाया मजेदार …’ या गाण्यात आणखी एक चौथा स्वर होता तो होता नितीन मुकेश यांचा! त्या वेळी मुकेश यांचे निधन झाले होते म्हणून मुकेशच्या ऐवजी नितीन मुकेश यांचा स्वर वापरला गेला. जर इथे देखील मुकेशचा स्वर वापरला असता तर हे दुसरं गाणं झालं असतं ज्यात हे चार प्रमुख स्वर वापरले गेले.