Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘Big Boss Marathi’च्या नव्या सीझनने रचला इतिहास; रितेशच्या ‘भाऊच्या धक्क्या’ने तोडले सर्व रेकॉर्ड्स

 ‘Big Boss Marathi’च्या नव्या सीझनने रचला इतिहास; रितेशच्या ‘भाऊच्या धक्क्या’ने तोडले सर्व रेकॉर्ड्स
Big Boss Marathi 5 TRP
टीव्ही वाले मिक्स मसाला

‘Big Boss Marathi’च्या नव्या सीझनने रचला इतिहास; रितेशच्या ‘भाऊच्या धक्क्या’ने तोडले सर्व रेकॉर्ड्स

by Team KalakrutiMedia 17/08/2024

तो आला…अन् त्यानं जिंकलं, असं म्हटलं की डोळ्यासमोर एकच चेहरा येतो तो म्हणजे ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा होस्ट आणि महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार रितेश देशमुख. ‘बिग बॉस मराठी’चं नवं पर्व रितेश देशमुख होस्ट करणार असल्याची घोषणा झाल्यापासून चाहते नव्या सीझनबद्दल खूप उत्सुक होते. ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड प्रीमियरचा मंच रितेश भाऊने दणाणून सोडला. त्याची स्टाईल ‘बिग बॉस’प्रेमींच्या चांगलीच पसंतीस उतरली. टीआरपी रेटिंगवर होत असलेल्या वर्षावाने याची कबुली दिली आहे.’बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनने इतिहास रचला आहे. मराठी मनोरंजनाचा बॉस असणाऱ्या या कार्यक्रमाच्या ‘भाऊच्या धक्क्या’ने या आठवड्यात 3.2 TVR मिळवत टीआरपीचे सर्व रेकॉर्ड्स तोडले आहेत.( Big Boss Marathi 5 TRP )

Big Boss Marathi 5 TRP
Big Boss Marathi 5 TRP

शाळा, कॉलेज, ट्रेन, भाजीमार्केट कुठेही जा सर्वत्र फक्त ‘बिग बॉस मराठी‘ आणि रितेश भाऊच्या कमाल होस्टिंगची चर्चा होताना दिसत आहे. या नव्या सीझनच्या ग्रँड प्रीमियरने आतापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक करत 2.4 TVR मिळवला आहे. वीकेंडचं सरासरी रेटिंग 2.8 TVR आहे. संपूर्ण महाराष्ट्राला ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचं वेड लागल्याचे हे पुरावे आहेत.’बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमधील ‘भाऊचा धक्का‘ रितेश देशमुख चांगलाच गाजवत आहे.(Big Boss Marathi 5 TRP)

Big Boss Marathi 5 TRP
Big Boss Marathi 5 TRP

‘भाऊच्या धक्क्या’वर सदस्यांची शाळा घेणं असो, आठवड्याभरातील सदस्यांच्या वागणुकीवर त्याने घेतलेली हजेरी असो किंवा आपल्या हटके स्टाईलने सदस्यांचं भरभरून केलेलं कौतुक असो…या साऱ्याच गोष्टी ‘बिग बॉस मराठी’चा प्रेक्षकवर्ग वाढवण्यात कारणीभूत ठरत आहेत. एक भाऊचा धक्का संपल्यावर दुसऱ्या भाऊच्या धक्क्यावर काय होणार याची ‘बिग बॉस’प्रेमींमध्ये असणारी उत्सुकता हेच या नव्या सीझनच्या यशाचं गुपित आहे. नव्या सीझनमधील नावीन्य आणि तरुणपण प्रेक्षकांना जास्त आकर्षित करत आहे.(Big Boss Marathi 5 TRP)

============================

हे देखील वाचा: Big Boss Marathi च्या घरात पुन्हा घातला निक्कीने राडा; सदस्यांच्या कपड्यांची फेकाफेकी करत कॅप्टनला ही केली धक्काबुक्की

=============================

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनच्या यशाबद्दल बोलताना रितेश देशमुख म्हणाला,”बिग बॉस मराठी’च्या यशामध्ये आपल्या प्रेक्षकांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. रेटिंगचा चढता आलेख पाहणं खूपच सकारात्मक आणि प्रेरणादायी आहे. भाऊच्या धक्क्यासह सर्वच एपिसोडवर महाराष्ट्रभरातील प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. आम्ही संपूर्ण महाराष्ट्राचे ऋणी आहोत. मला ही संधी दिल्याबद्दल कलर्स मराठी वाहिनीचे मी खूप आभारी आहे”.असे ही रीतेश देशमुख म्हणाला.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor arbaz patel Big Boss Marathi Big Boss Marathi 5 TRP Celebrity Celebrity News Colors Marathi Entertainment marathi reality show Nikki tamboli ritesh deshmukh hot Varsha Usgaonkar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.