Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘खूबसूरत’; अभिनेत्री Rekha हिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट

लक्ष्मीकांत बेर्डेंनी Jeetendra यांच्यामुळे खाल्लेला वडिलांचा मार!

Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘पाणी’च्या शीर्षकगीताला लाभला शंकर महादेवन यांचा आवाज; ‘नगं थांबू रं’ हे प्रेरणादायी गाणे प्रदर्शित

 ‘पाणी’च्या शीर्षकगीताला लाभला शंकर महादेवन यांचा आवाज; ‘नगं थांबू रं’ हे प्रेरणादायी गाणे प्रदर्शित
Paani Marathi movie Title Song
मिक्स मसाला म्युझिक मस्ती

‘पाणी’च्या शीर्षकगीताला लाभला शंकर महादेवन यांचा आवाज; ‘नगं थांबू रं’ हे प्रेरणादायी गाणे प्रदर्शित

by Team KalakrutiMedia 02/10/2024

राजश्री एंटरटेन्मेंट आणि पर्पल पेबल पिक्चर्स प्रस्तुत कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ‘पाणी’ च्या टिझरने चित्रपटाची उत्सुकता ताणली असतानाच आता या चित्रपटातील मनाला उभारी देणारे ‘नगं थांबू रं’ हे शीर्षकगीत प्रदर्शित झाले आहे. आदिनाथ कोठारे याने शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला गुलराज सिंग यांनी साजेसे संगीत दिले असून हे प्रेरणादायी गाणे शंकर महादेवन यांनी आपल्या दमदार आवाजात गायले आहे. मराठवाड्यातील हनुमंत केंद्रे या ‘जलदूता’ची कहाणी सांगणाऱ्या या चित्रपटाचे शीर्षकगीत अतिशय स्फूर्तिदायी आहे.(Paani Marathi movie Title Song)

Paani Marathi movie Title Song
Paani Marathi movie Title Song

या गाण्यातून हनुमंत केंद्रे यांचा पाण्यासाठीचा लढा, संघर्ष आणि त्यांना मिळालेले यश निदर्शनास येत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या गाण्याचे बोल प्रत्येकाच्या मनाला भिडणारे असून नवीन उमेद देणारेही आहे. गावकऱ्यांच्या सहकार्याने पाणीटंचाई सारखी भीषण समस्या सोडवून गावकऱ्यांना आशेचा किरण दाखवणारे हे गाणे आहे. अतिशय भावपूर्ण बोल असलेले हे गाणे संगीतप्रेमींना नक्कीच आवडेल. 

Paani Marathi movie Title Song
Paani Marathi movie Title Song

 या गाण्याबद्दल शंकर महादेवन म्हणतात की, “ज्यावेळी या गाण्याबद्दल मला विचारणा करण्यात आली, तेव्हा मी त्वरित होकार दिला. या गाण्याचे बोल मनाच्या खोलवर रुजणारे आहेत. मनातील खंत, संघर्ष, यश, आनंद अशा सगळ्याच भावना या गाण्यातून एकत्र व्यक्त होत आहेत. हे गाणे गाताना माझ्यातही तितकाच उत्साह होता. अतिशय उत्स्फूर्तदायी गाणे आहे. कोणत्याही कठीण परिस्थितीशी लढा देताना हे गाणे प्रत्येकाला प्रेरणा देणारे ठरेल.” (Paani Marathi movie Title Song)

==============================

हे देखील वाचा: दिग्दर्शक संदीप सावंत यांचा ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ हा नवा सिनेमा लवकरच येणार भेटीला…

==============================

आदिनाथ कोठारे दिग्दर्शित ‘पाणी‘ चित्रपटात आदिनाथ कोठारे, रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील अशी तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाची कथा नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे यांची असून नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॉ. मधू चोप्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत तर महेश कोठारे, सिद्धार्थ चोप्रा या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत. येत्या १८ ऑक्टोबर रोजी ‘पाणी‘ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Adinath Kothare kishor kadam paani marathi movie Paani Marathi movie Title Song Priyanka Chopra rucha vaidya shankar mahadevan subodh bhave
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.