ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
शाहरुख खानला हिंदी सिनेमात पहिला ब्रेक हेमामालिनीने दिला!
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचे २ मे १९८० रोजी लग्न झाले. त्या नंतर या दोघांच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी फारशी गर्दी केली नाही. हेमामालिनीने नंतर आपल्या नृत्यावर लक्ष केंद्रित केले. ‘नुपूर’ नावाची एक मालिका देखील निर्माण केली. ऐशीच्याच्या दशकात ‘शरारा’ नावाचा एक चित्रपट हेमाच्या भावाने निर्माण केला होतां. नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला हेमामालिनीने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल टाकले आणि पहिला चित्रपट दिग्दर्शित केला ‘दिल आशना है’. (Shah Rukh Khan)
हा चित्रपट आज कुणालाही आठवणीचे सुतराम शक्यता नाही. पण हा चित्रपट आजचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan)पहिला हिंदी चित्रपट होता; हीच त्याची एकमेव आठवण आता शिल्लक राहिली आहे. पण या चित्रपटात शाहरुख खानची निवड कशी झाली याचा एक इंटरेस्टिंग किस्सा आहे. हेमामालिनी रजत कपूर यांच्या ‘आप की अदालत’ या शो मध्ये सांगितला होता. त्यांच्या आत्मचरित्रात देखील याचा उल्लेख आहे.
१९९० साली हेमामालिनीचे एकदा टीव्ही वरील सिरीयल पाहताना त्यातील एका तरुणाकडे त्यांचे लक्ष गेले. ही मालिका होती ‘फौजी’. यातील तरुण अभिनेता शाहरुख खानकडे (Shah Rukh Khan) हेमाचे लक्ष गेलं. या कलाकारांमध्ये नक्कीच सिनेमाचा हिरो बनण्याचे पोटेन्शिअल आहे हे तिच्या पारखी नजरेने टिपले. तिने लगेच त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. हेमामालिनीची टीम कामाला लागली. हा कलाकार दिल्लीचा असून नाटकांमध्ये काम करतो असं कळलं. त्याचा फोन नंबर देखील मिळाला.
हेमामालिनीच्या कझिनने शाहरुखला(Shah Rukh Khan) फोन लावला. हेमा मालिनीच्या ऑफिस मधून फोन आला आहे हे ऐकून शाहरुख खानचा विश्वासच बसेना. त्याला वाटलं कोणीतरी आपली गंमत करतोय आणि त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. तिने पुन्हा फोन केल्यानंतर शाहरुख म्हणाला, ”का माझी तुम्ही अशी फिरकी घेत आहात? हेमामालिनी कशाला मला फोन करेल?” तेंव्हा तिने सांगितले ,” खरंच हेमामालिनीला तुझ्याशी बोलायचं आहे. तुला खोटं वाटत असेल तर हा नंबर घे आणि तू स्वतः फोन कर.” असे म्हणून तिने हेमामालिनीचा पर्सनल नंबर त्याला दिला.
त्यानंतर शाहरुख खानने (Shah Rukh Khan) हेमा मालिनीला फोन केला. आता मात्र त्याला खात्री पटली की खरोखरच हेमामालिनीच्या ऑफिसमधून आपल्याला फोन आला होता. त्याला मुंबईला यायचे निमंत्रण दिले. त्या प्रमाणे शाहरुख पुढच्या आठवड्यात मुंबईत आला आणि हेमा मालिनीला भेटायला आला. हेमाला तो पाहता क्षणी आवडला. फक्त त्याचे केस खूपच तोंडावर येत होते. त्यामुळे तो थोडासा मवाली वाटत होता. हेमाने त्याला केस मागे घ्यायला सांगितले. त्याने केस मागे घेतल्यानंतर मात्र तो जंटल म्हणून वाटू लागला. हेमाने त्याला चित्रपटात तुला याच रूपात अवतारायचे आहे असे सांगितले जेल लावून केस मागे घे असे देखील सांगितले. या पद्धतीने शाहरुख खानची हेमा मलिनी आपल्या चित्रपटाचा नायक म्हणून निवड केली.
धर्मेंद्रला देखील बोलून दिले, आपली निवड दाखवून धर्मेंद्रने देखील ग्रीन सिग्नल दिले त्यानंतर चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले. हा एक मल्टीस्टारर असा सिनेमा होता. यात जितेंद्र, मिथुन चक्रवर्ती, कबीर बेदी, दिव्या भारती, डिंपल कपाडिया यांच्या भूमिका होत्या हेमामालिनीने हा नायिका प्रधान चित्रपट चांगल्या रीतीने दिग्दर्शित केला. हा चित्रपट ऑक्टोबर १९९२ मध्ये जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा आपल्या देशात वातावरण बिघडलेलं होतं.(बाबरी मशीद प्रकरण) त्यामुळे सर्वत्र जातीय दंगलींच थैमान माजलं होतं. या कारणाने हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थितरीत्या पोहोचू शकला नाही. हेमा मलिनीने देखील या चित्रपटानंतर चित्रपट दिग्दर्शन करण्याचे धाडस केले नाही. पण नंतर सुपरस्टार बनलेल्या शाहरुख खानला (Shah Rukh Khan) पहिल्यांदा हिंदी सिनेमात आणण्याच श्रेय हेमामालिनी कडे जातं हे नक्की!
==============
हे देखील वाचा : धर्मेंद्रने गुरुदत्तच्या उपकाराची जाणीव कशी ठेवली?
==============
आता थोडंसं ‘दिल आशना है’ बद्दल. हा सिनेमा एच एम क्रिएशन या बॅनर खाली बनला होता. Shirley Conran यांच्या अमेरिकेत १९८२ साली टीव्ही वर आलेल्या Lace या सिरीयलवर चित्रपटाचे कथानक आधारीत होते. या सिनेमाला आनंद मिलिंद यांचे संगीत होते. हा सिनेमा शाहरुखने (Shah Rukh Khan) सर्वात आधी साईन केला होता. पण ‘दिवाना’ हा सिनेमा लवकर तयार होवून याच्या चार महिने अगोदर म्हणजे २५ जून १९९२ रोजी प्रदर्शित झाला.