मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
एका गाण्याच्या टायटल वरून बनला हा सुपर हिट सिनेमा!
एखाद्या गाण्याच्या ओळीवरून चित्रपटाची निर्मिती होऊ शकते का? याचे उत्तर हो असेच आहे. दिग्दर्शक महेश भट यांच्या एका चित्रपटाकरीता हे इन्स्पिरेशनल सॉंग ठरले. आणि याच गाण्याच्या टायटल वरून चित्रपटाचे शीर्षक देखील ठरले! हा सुपरहिट सिनेमा आज देखील त्याच्या अप्रतिम संगीतामुळे रसिकांना आठवला जातो. कोणता होता हा चित्रपट? आणि काय होता नेमका हा किस्सा?
हा चित्रपट होता १२ जुलै १९९१ रोजी प्रदर्शित झालेला ‘दिल है के मानता नही’. या सिनेमाचे इन्स्पिरेशन महेश भट यांना कसे मिळाले? गीतकार फैज अन्वर (faaiz anwar) हे उत्तम शायर होतेच पण त्यांना सिनेमासाठी काम करायचं होतं. ऐंशीच्या दशकामध्ये ते मुंबईला आले आणि त्यांचा स्ट्रगल सुरू झाला. प्रत्येक संगीतकाराला जाऊन ते आपल्या रचना ऐकवत होते; पण काम काही मिळत नव्हतं. संगीतकार शंकर यांच्याकडे त्यांना पहिल्यांदा काम मिळालं. दोन गाणी देखील लिहीली. परंतु हा चित्रपट डब्यात गेला. त्यानंतर फैज अन्वर (faaiz anwar) यांची पुन्हा पायपीट सुरू झाली.
संगीतकार आर डी बर्मन यांना ते जाऊन भेटले. त्यांना आपल्या अनेक रचना ऐकवल्या. आर डी बर्मन म्हणाले माझ्याकडे एक चित्रपट आहे त्याची धून देखील तयार आहे गाणी लिहाल का? फैज यांनी लगेच त्यावर गाणे लिहून दिले. पण हा चित्रपट देखील रेंगाळला आणि सात आठ वर्षानंतर १९९३ साली पडद्यावर आला. ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस फैज (faaiz anwar) यांची भेट महेश भट यांच्यासोबत झाली. महेश भट त्यावेळी ‘आशिकी’ या चित्रपटावर काम करत होते. फैज यांना महेश भट यांच्या चित्रपटाचे संगीतकार नदीम श्रवण यांनी एक दोन चाली ऐकवल्या आणि त्यावर गाणे लिहायला सांगितले. अवघ्या अर्ध्या तासात फैज अन्वर यांनी गाणे लिहून त्यांच्या हातात दिले. ते गाणे सर्वांना प्रचंड आवडले.
महेश भट यांची मुलगी पूजा भट तिथे उपस्थित होती. तिने तिथल्या तिथे फैज (faaiz anwar) यांना दहा हजार रुपये काढून दिले आणि सांगितले, ”हे गाणे आता आमचे झाले.आमच्या पुढच्या या चित्रपटाचे गाणे तुम्हीच लिहिणार आहात.” नदीम श्रवण यांनी ते गाणे रेकॉर्ड केले. या गाण्याचा मुखडा महेश भट यांना इतका आवडला की त्यांनी आपल्या पुढील चित्रपटाचे नावच याच गाण्याच्या टायटल वरून ठेवले. गाणे होते ‘दिल है कि मानता नही’. आमिर खान- पूजा भट या जोडीचा हा रोमँटिक सिनेमा ९० च्या दशकातील एक सुपरहिट म्युझिकल हिट सिनेमा ठरला.
या चित्रपटातील सगळीच गाणी खूप गाजली. या सिनेमात फैज (faaiz anwar) यांची दोन गाणी होती. इतर गाणी समीर ,रांनी मलिक ,अजीज खान यांनी लिहिली होती. या सिनेमा नंतर फैज यांच्यासाठी बॉलिवूडच्या दरवाजे खुले झाले. नंतर त्यांनी अनेक चित्रपटांसाठी गाणी लिहिले त्यामध्ये विजयपथ, साजन पासून ते थेट अलीकडच्या दबंग चित्रपटातील ‘तेरे मस्त मस्त दो नैन मेरे दिल का ले गये चैन’ पर्यंत. फैज यांनी काही चित्रपटांची निर्मिती देखील केली.
===========
हे देखील वाचा : संगीतकार रोशन यांना आत्मविश्वास दिला होता अनिल विश्वास यांनी!
===========
आता थोडंसं ‘दिल है कि मानता नही’ या चित्रपटाबद्दल : वस्तुतः चित्रपट ‘It happened in one night’ या फ्रेंक कापरा दिग्दर्शित १९३४ साली आलेल्या हॉलीवूड चित्रपटावरून घेतला होता. याच सिनेमावर १९५६ सालचा राज नर्गीसचा चोरी चोरी हा सिनेमा देखील येऊन गेला होता. या ‘दिल है कि मानता नही’ मधील गाणी खूपच सुरीली होती. ‘तू प्यार ही किसी और का तुझे चाहता कोई और है’, ‘मेनु इश्क का लगया रोग’,’ “अदाएँ भी है”, ‘दुल्हन तू दूल्हा मैं’,’ ओ मेरे सपनों के सौदागर’,’गळ्यान साखळी सोन्याची हि पोरगी कोणाची’ हि अनुराधा पौडवाल,कुमार सानू,अभिजित यांनी गायलेल्या गाण्यांनी मोठी लोकप्रियता हासील केली होती. या सिनेमाला फिल्मफेअर ची सहा नामांकने मिळाली होती. आमीर खान च्या यशस्वी सिनेमातील हा एक होता.