मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
आई कुठे काय करते’ फेम पूनम चांदोरकरची भावुक पोस्ट
लवकरच स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ ही लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मागील पाच वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आई कुठे काय करते या सुपरहिट मालिकेचे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक फॅन्स आहेत. या मालिकेला आणि मालिकेतील कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. मालिकेतील छोट्यात छोटी भूमिका देखील कमालीची गाजली आणि लोकप्रिय झाली.
आता येत्या ३० नोव्हेंबरला आई कुठे काय करते या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. नुकतेच या भागाचे शूटिंग देखील पार पडले. शूटिंगच्या शेवटच्या दिवशी सर्वच कलाकार भावुक झालेले दिसले. मालिकेतील अनेक कलाकारांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाची निवड केली. याच मालिकेत विशाखा ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री पूनम चांदोरकरने देखील सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर करत तिच्या आठवणी सांगितल्या.
A post shared by Punam Chandorkar (@punamchandorkar_official)
पूनमने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “विशाखा काळजी घे…पाच वर्ष सुरू असलेला हा प्रवास काल पूर्ण झाला (थांबला नाही म्हणणार..) इथून पुढे आता दुसऱ्या प्रवासाची सुरुवात…जिची कुठेही शाखा नाही अशी ‘विशाखा’ असं गमतीमध्ये रवी सर, अप्पा बोलायचे. ‘आई कुठे काय करते’चा काल शूटिंगचा शेवटचा दिवस…रात्री गणपती बाप्पा मोरया असे जेव्हा रवी सर बोलले तेव्हा पहिल्यांदा काहीतरी खोलवर जाणवलं…ही पॅकअपची घाई, हा आवाज, ही वास्तू, स्क्रिप्ट, क्लोजसाठी मेकअप टचअप करून रेडी होणं, कॉस्च्युम, तयारी आणि बरंच…
काही काळ समृद्धी बंगल्यात थांबले…आणि मग पहिला दिवस ते आजचा दिवस सगळं डोळ्यासमोरून येऊन गेलं…या मालिकेने, समृद्धीने कलाकार म्हणून माणूस म्हणून खरंच खूप समृद्ध केलं…शेवटचं तिथे मस्तक टेकवलं आणि वास्तूचा निरोप घेतला..आमच्या प्रोजेक्ट हेड नमिता वर्तक, मुग्धा गोडबोले याच्या लेखणीतून विशाखा तयार झाली आणि मग रवी सर, सुबोध सर, तुषार विचारे यांच्या मार्गदर्शनाने तिने आकार घेतला…अगदी कुठेही गेलं तरी विशाखा या नावाने सगळे ओळखतात…लॉकडाऊनमध्ये तर डोळे आणि आवाजावरूनही तोंडावर मास्क असतानाही ‘विशाखा आत्या’ ही हाक आली की समाधानाने भरून पावत होते.
या प्रोजेक्टसाठी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यासाठी तुमच्या प्रोजेक्ट हेड नमिता वर्तक आमच्या संवाद लेखिका मुग्धा गोडबोले, चित्रा पाटणकर, आमचे निर्माते राजन शाही यांचे मनापासून आभार. तसेच स्टार प्रवाह, सतीश राजवाडे सर, आमचे कॅप्टन ऑफ द शिप रवी सर सुबोध बरे, तुषार विचारे, तसेच कधी काही प्रॉब्लेम सांगितला तर लगेच तो सॉल करणारा आमचा हक्काचा रोहित दादा, आमचे डीओपी राजू देसाई, आमचे इपी आणि प्रत्येक डिपार्टमेंटचे तसेच सर्व कलाकारांचे मी आभार मानते.
ज्यांनी मला या सर्व प्रवासात सांभाळून घेतलं आणि कांगोरे असलेले ‘आई कुठे काय करते’ हे नेहमी मनाच्या कोपऱ्यात आढळ स्थानावर राहिल आणि या सगळ्यात विशाखा या कॅरेक्टरवर भरभरून प्रेम करणारे प्रेक्षक तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार असंच प्रेम करत राहा तुमचा आशीर्वाद असू दे. तुमचे मी खूप खूप आभारी आहे.”
पूनमच्या या पोस्टवर नेटकाऱ्यानी कमेंट्स करत मालिका बंद करण्याची घाई केली, अजून मालिका चालू ठेवायला पाहिजे होती, आमची आवडी मालिका आहे अशा आशयाचा कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ मालिका संपल्यानंतर त्याजागी अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम यांची मुख्य भूमिका असलेली ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही नवी मालिका सुरु होणार आहे. २ डिसेंबरपासून दुपारी २.३० वाजता ही नवी मालिका प्रसारित होणार आहे.