मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना उजाळा
आजच्या आधुनिक काळातील सर्वात लोकप्रिय माध्यम म्हणून सोशल मीडिया ओळखले जाते. या सोशल मीडियाच्या भोवतीच सर्व जग फिरत आहे. आपल्या भावना, मतं मांडण्याचे अतिशय उत्तम माध्यम म्हणजे हे सोशल मीडिया. अगदी सामान्य लोकांपासून कलाकारांपर्यंत सर्वच या माध्यमाच्या प्रेमात आहे. मनोरंजनविश्वात काम करणारे जवळपास सर्वच कलाकार हे या माध्यमाच्या मार्फत आपले विचार, भावना व्यक्त करत फॅन्सच्या संपर्कात राहतात.
मराठी मनोरंजनविश्वातील आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेते म्हणजे मिलिंद गवळी. मिलिंद हे नेहमीच सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देतात, त्यांचे अनुभव शेअर करतात. त्यांच्या पोस्ट मीडियामध्ये आणि प्रेक्षकांमध्ये देखील खूपच गाजतात. या पोस्टच्या माध्यमातून मिलिंद यांच्या लिखाणाचे कौतुक देखील मोठ्या प्रमाणावर केले जाते. आता देखील मिलिंद यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी त्यांच्या ‘सवतीचं कुंकू’ सिनेमाबद्दल लिहिले आहे.
मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “सवतीचं कुंकू” नंदू गवळी नावाचे एक प्रोडक्शन मॅनेजर ज्यांनी माझ्या बऱ्याच सिनेमाचं प्रोडक्शन handle केलं होतं. एक दिवस नंदू माझ्याकडे आले आणि म्हणाले की “मला एक मराठी चित्रपटाची निर्मिती करायची मला producer व्हायचे आहे”, तुम्ही माझ्या चित्रपटात हिरोची भूमिका कराल का? मी म्हटलं ,,”का नाही करणार, तू कर सुरू मी आहे तुझ्याबरोबर”, मग त्यांनी आनंद शिशुपाल यांना दिग्दर्शनाची जबाबदारी दिली.
ग्रामीण भागामध्ये चालेल असा विषय निवडला, त्या चित्रपटाला नाव दिलं “सवतीच कुंकू”, माझ्याबरोबर भार्गवी चिरमुले, निशा परुळेकर या दोघींना कास्ट केला, त्यांच्याबरोबर मिलिंद शिंदे, माधव अभ्यंकर, रवींद्र बेर्डे यांना घेतलं, कोल्हापुरात शूटिंग करायचं ठरलं. आता नंदू गवळी यांनी बरीच वर्ष प्रोडक्शन केलं असल्यामुळे, शूटिंग अगदी व्यवस्थित आणि smoothly पार पडलं,
एका ग्रामीण Commercial सिनेमासाठी लागणारे कथानक, emotions, drama सगळं भरभरून या सिनेमांमध्ये होतं, नंदूने अनेक वर्ष दुसऱ्यांच्या सिनेमासाठी काम केलं असल्यामुळे, त्याला ती गावांची माहिती होती जिथे 500-1000 लोक शूटिंगला सहज मोबmob म्हणून मिळायची, Anand shishupal दिग्दर्शक सुद्धा अनेक वर्ष सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होते, माझ्याबरोबर पितांबर काळे यांच्या एका सिनेमामध्ये आनंद होते, माझ्यासाठी दिग्दर्शक ओळखीचा असला, आणि आपल्या कामाच्या पद्धतीची त्याला माहिती असली तर मग एका कलाकाराचं काम सोपं होतं, चांगलं होतं, आणि ते काम करत असताना फार pressure नसतं, आणि सोबत चांगले कलाकार असल्यामुळे या सिनेमाचं शूटिंग करायला मला खरंच मजा आली,
त्यात मिलिंद शिंदे सारखा talented कलाकार समोर villian होता, मला समाधान वाटायचं त्याच्याबरोबर सीन्स करून, हे असे चित्रपट करत असताना मला कल्पना असायची की शहरांमध्ये या चित्रपटांना कोणी फार भाव देणार नाहीत, कोणी त्याचं कौतुक करणार नाही, पण ग्रामीण भागामध्ये, जे प्रेक्षक तिकीट काढून येतात, त्यांच्यासाठी हा चित्रपट, पैसा वसूल चित्रपट होता. आणि एका प्रोडक्शन मॅनेजरनी daring करून हा चित्रपट केला होता, त्यामुळे त्याचे पैसे परत मिळणं हे महत्त्वाचं होतं.
नंदूने हा चित्रपट चांगला प्रदर्शित पण केला, यात्रा यात्रांमध्ये छान चालला, फक्तमराठी या वाहिनीला नंतर विकून पण टाकला, चित्रपटात जेवढी गुंतवणूक केली होती, ती सगळी वसूल झाली, व दोन पैसे मिळाले, असं मला एकदा भेटल्यावर म्हणाला, मलाही आनंद झाला, 90% मराठी चित्रपट करणारे निर्माते डूबतात ते कंगाल होतात, त्यात नंदू नव्हता याचा जास्त आनंद झाला.”
दरम्यान मिलिंद गवळी यांची ही पोस्ट खूपच व्हायरल झाली. यावर कमेंट्स करताना नेटकऱ्यांनी त्यांच्या लिखाणाचे कौतुक करताना ते या सांगत असणाऱ्या आठवणींबद्दल धन्यवाद देखील म्हटले आहे. सध्या मिलिंद हे स्टार प्रवाहाची तुफान गाजणाऱ्या आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्ध या नकारात्मक भूमिकेत दिसत आहे. मात्र येत्या ३० नोव्हेंबरला ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.