किशोरच्या गाण्याचा भावस्पर्शी किस्सा: बडी सुनी सुनी है जिंदगी…
बॉक्स ऑफिसवर ‘पुष्पा’चाच ‘रूल’!
संपूर्ण देशभरात प्रेक्षक ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते, तो ‘Pushpa 2: The Rule’ (pushpa 2) हा सिनेमा अखेर प्रदर्शित झाला आहे. ‘पुष्पा‘ने आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडत बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला. आता ‘पुष्पा २’ देखील ने रिलीजच्या आधीच १०० कोटींचा गल्ला जमवत नवा रेकॉर्ड केला आहे. थोडक्यात काय तर, आता ‘Pushpa‘च्या पावलावर पाऊल ठेवत ‘पुष्पा २’ देखील सगळे रेकॉर्ड मोडणार हे निश्चित!
चला तर जाणून घेऊया, पुष्पा २ – द रूल !
Sukumar ने दिग्दर्शन केलेला ‘अल्लू अर्जुन‘ सोबतचा ‘पुष्पा २’ हा चौथा चित्रपट! या चित्रपटाची सुरुवात होते, तीच एका जबरदस्त ॲक्शन सीनपासून! पहिल्या भागात एका मजुरापासून ते भारतातील सर्वात मोठा सिंडीकेटचा किंग असा पुष्पाचा प्रवास आपण पाहिला आहे. तर आता दुसऱ्या भागात, पुष्पा इंटरनॅशनल कसा होतो, हा प्रवास पाहायला मिळणार आहे. सिंडीकेट मधील अंतर्गत राजकारण, त्यामुळे वाढलेले शत्रू, यादरम्यान घडलेली मारामारी, जबरदस्त ॲक्शन, दुसरीकडे रोमॅन्स, मसाला हेच सगळं सांगणारा चित्रपट म्हणजे ‘पुष्पा २’! (pushpa 2)
अभिनयाच्या बाबतीत सांगायचं झालं तर, ‘Allu Arjun‘ अक्षरशः पुन्हा एकदा ‘पुष्पा’ जगला आहे. पहिल्या भागातील ‘पुष्पा’चा स्वॅग दुसऱ्या भागातही कायम आहे. रश्मीका मंधानाचा ‘श्रीवल्ली’ चार्म या भागातही परफेक्ट फिट झाला आहे. आधीची लाजाळू श्रीवल्ली आता पुष्पावरच रूल करताना दाखवली आहे. या दोघांची जबरदस्त केमिस्ट्री ही यातील जमेची बाजू आहे. तेलुगू इंडस्ट्रीतील कमालीचा अभिनेता ‘Jagapathi Babu‘चा रोल कमी असूनही शेवटपर्यंत लक्षात राहतो. ‘फहाद फासील‘ सारख्या उमद्या कलाकाराचा मात्र, या सिनेमात हवा तसा वापर करता आला नाही असं सतत जाणवत राहतं.
चित्रपटाबाबत सांगायचं झालं तर, सुरुवातीच्या काही सीनमधील रेफ्रन्स अर्धवट सोडल्यासारखा वाटतात. त्यातच चित्रपट पुढे काहीसा संथ होतो, त्यामुळे तो कंटाळवाणा वाटतो. मात्र, मध्यांतरानंतर सिनेमाने चांगला वेग पकडला आहे. पहिल्या भागातील गाणी जेवढी दमदार व श्रवणीय होती, तेवढी या चित्रपटात वाटत नाहीत. परंतु, कोरीओग्राफीमुळे ती खिळवून ठेवतात. ‘गंगम्मा जत्रा‘ ही चित्रपटातील आणखी एक जमेची बाजू! यातील प्रत्येक सीन आपल्याला खिळवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे. यातील रंगसंगती व दिग्दर्शनाच्या अनोख्या पद्धतीमुळे सीन पाहताना आपण थेट त्या जत्रेतच आहोत की काय, असा भास होतो. (pushpa 2)
==============
हे देखील वाचा : फक्त दोन हजार रुपयाचे तिकीटही हाऊसफुल्ल
==============
आता वळूया, काही इतर पण महत्वपूर्ण बाबींकडे!
पुष्पाची स्टाईल, त्याचे डायलॉग्स, जबरदस्त ॲक्शन हे सारंच कमाल आहे. त्याच्यासाठी केलेली स्टायलीश वेशभूषा पुष्पाला खरच एक वेगळा ब्रँड बनवते. अभिनेता श्रेयस तळपदेच्या दमदार आवाजाने पुष्पाचं पात्रं जिवंत ठेवलं आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. चित्रपटातील इमोशनल सिन, आगळा वेगळा रोमान्स, मसाला, टिपिकल साउथ स्टाईल कोरिओग्राफी, कलर ग्रेडिंग आणि महत्त्वाचं म्हणजे भारतीय संस्कृतीची छाप यांचा उत्तम मेळ साधता आल्यामुळे सिनेमा अधिक सुंदर वाटतो. Climax सीनमध्ये वापरण्यात आलेलं पार्श्वसंगीत व ॲक्शन सिन निव्वळ अप्रतिम! (pushpa 2)
चित्रपटातील प्रत्येक फ्रेम Mass आणि Class एंटरटेनर आहे. त्यामुळे हा चित्रपटाचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला एकदातरी थिएटरमध्ये जावंच लागेल. शिवाय, चित्रपटाचं एंड क्रेडीट पाहायला विसरू नका, तुमच्यासाठी एक खास Surprise आहे.
‘Kalakruti Media‘ ‘पुष्पा २’ (pushpa 2) देत आहे ५ पैकी ३.५ स्टार्स!