Mukesh : निर्मळ मनाच्या मुकेशच्या प्रेमाचा भावस्पर्शी किस्सा!
सचिनदा यांनी भांडून ‘या’ गायकाकडूनच गाणे गाऊन घेतले!
दिग्दर्शक हा चित्रपटाचा बॉस असतो तसाच संगीतकार हा त्या चित्रपटातील गाणे निर्मितीच्या क्षेत्रातील बाप माणूस असतो. पण कधी कधी हे दोघे एकमेकांच्या कार्यक्षेत्रात दखल अंदाजी करतात आणि त्यातून बऱ्याचदा काही गमतीशीर तर बऱ्याचदा गंभीर प्रसंग निर्माण होतात. असाच एक प्रसंग १९६९ साली एका चित्रपटाच्या संगीत निर्मितीच्या वेळी झाला होता. त्यावेळी तो संगीतकार चक्क चित्रपट सोडून निघून जायला तयार झाला होता कारण त्याच्या आवडीच्या गायकाला दिग्दर्शकाचा विरोध होता. पण शेवटी संगीतकाराच्या म्हणण्यानुसारच झालं आणि ते गाणे चित्रपटात त्याच गायकाच्या आवाजात रेकॉर्ड झालं. हे गाणे त्या सिनेमाचे हायलाईट ठरले. कोणता होता तो चित्रपट आणि कोणते होते ते गाणे? (talaash)
निर्माता दिग्दर्शक O. P. Ralhan यांचा १९६९ रोजी ‘Talash‘ (talaash) नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा त्या काळात मीडियामध्ये प्रचंड गाजला होता. कारण या सिनेमाची जाहिरात ‘भारतातील पहिला एक कोटी रुपयांचा चित्रपट’ अशी केली होती. या चित्रपटामध्ये राजेंद्र कुमार, शर्मिला टागोर, बलराज सहानी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाची गाणी मजरूह सुलतानपूरी यांनी लिहिलेली होती तर संगीत S. D. Burman यांचे होते. ओ पी रल्हन यांचा ‘फुल और पत्थर‘ हा सिनेमा १९६६ सालचा सुपर डुपर हिट सिनेमा होता. त्या मुळे ओ पी रल्हन यांचा सिने इंडस्ट्रीत दबदबा वाढला होता.
‘तलाश’ (talaash) या चित्रपटातील एका गाण्याच्या निर्मितीच्या वेळेचा हा किस्सा आहे. ओ पी रल्हन यांनी संगीतकार सचिन देव बर्मन यांना गाण्याची सिच्युएशन सांगितली. एक क्लासिकल टाईपचे ते गाणे होते. या गाण्यावर एक नृत्यांगना नृत्य देखील करणार होती. त्या पद्धतीने सचिनदा यांनी धून तयार केली आणि Majrooh Sultanpuri यांच्याकडून गाणे लिहून घेतले. या गाण्याची एकूण प्रकृती पाहता हे गाणे Manna Dey ने गावे असे संगीतकार सचिन दा यांनी ठरवले आणि ते योग्यच होते. पण दिग्दर्शक ओ पी रल्हन यांना मात्र हे गाणे मुकेश यांनी गावे असे वाटले.
सुरुवातीला चर्चा झाली पण नंतर वाद सुरू झाला. दोघेही जण आपापल्या भूमिकेवर ठाम होते. दोघेही वेगवेगळी उदाहरणे देऊन पटवत होते की या गाण्यासाठी कोणाचा आवाज योग्य आहे. पण शेवटी संगीतकार सचिन देव बर्मन यांनी खूप विचार करून मन्ना डे यांचा स्वर ठरवला होता आणि त्यावर ते ठाम होते. जेव्हा निर्माता दिग्दर्शक ओ पी रल्हन यांनी दादागिरीच्या स्वरूपात हे गाणे मुकेशच जाणार असे सांगितले. तेव्हा मात्र सचिन देव बर्मन यांचा तोल सुटला आणि ते म्हणाले, ”ठीक आहे. हे गाणेच कशाला हा संपूर्ण चित्रपट तुम्ही दुसरा संगीतकाराकडे देऊन टाका आणि तुम्हाला हव्या त्या गायकाकडून हे गाणे गाऊन घ्या. मी चाललो.” आता मात्र दिग्दर्शक चपापले आणि भानावर आले.
संगीतकार सचिन देव बर्मन अगदी चित्रपट सोडण्याच्या निर्णयावर येतील असे त्यांना वाटले नाही. सचिनदा रागारागातच निघून गेले. ओ पी रल्हन प्रचंड घाबरला. शेवटी दिग्दर्शक विजय आनंद यांनी यात मध्यस्थी केली. खर तर गोल्डी विजय आनंद यांचा या चित्रपटाशी काहीही संबंध नव्हता. पण तरीही सचिन देव बर्मन यांच्यासाठी त्यांनी या वादात एन्ट्री घेतली आणि दिग्दर्शक ओ पी रल्हन यांना संगीतकार सचिन देव बर्मन यांचे मन्ना डे यांची निवड किती योग्य आहे हे पटवून दिले. शेवटी मन्ना डे यांच्या स्वरामध्ये हे गाणे रेकॉर्ड झाले. (talaash)
==============
हे देखील वाचा : वहिदा रहमानने संजीव कुमारला शिकवला चांगलाच धडा!
==============
या बेहतरीन गाण्याचे बोल होते ‘तेरे नैना तलाश करे जिसे…’ चित्रपटात हे गाणे आपले मराठी कलाकार शाहू मोडक यांच्यावर चित्रित झाले होते. संगीतकार सचिनदा यांची दिग्दर्शका बाबतची नाराजी कायम होती. असे म्हणतात या चित्रपटाच्या प्रीमियरला देखील सचिन देव बर्मन अनुपस्थित होते आणि त्यांनी मनोमन ठरवलं तर यापुढे कधीही आयुष्यात ओ पी रल्हन यांच्यासोबत काम करायचे नाही आणि त्यांनी तो शब्द पाळला. खरं तर सचिनदा यांनी स्वत:च्या स्वरात या सिनेमात एक गाणे गायलं होतं. ही खूप महत्वाची बाब होती. पण दिग्दर्शकाच्या चुकीच्या हट्टाने दोघांमधील संबधात बाधा आली.
‘तलाश’ (talaash) या चित्रपटातील सर्वच गाणी अतिशय अप्रतिम बनली होती. ’पलको के पीछे से क्या’, ‘आज तो जुनली रात मा धरती पार है आसमा’, ‘मेरी दुनिया है मां तेरे आंचल में’, ‘खाई है रे हमने कसम संग रहनेकी’ सर्वच गाणी अप्रतिम बनली होती. मन्ना डे यांच्या स्वरातील आसावरी रागावरील ‘तेरे नैना तलाश करे…’ हे गाणं तर चित्रपटाचे हायलाईट ठरले होते.