Chhaava Box Office :’छावा’ची यशस्वी ओलांडला ३५० कोटींचा टप्पा

Rahul Deshpande ‘मी ब्रेक घेतोय’ म्हणत गायक राहुल देशपांडे यांनी शेअर केला ‘तो’ व्हिडिओ
सोशल मीडिया, यूट्यूब हे आजच्या काळात सगळ्यांसाठीच अनेक अर्थाने एक वरदान ठरत आहे. या माध्यमाचा वापर करून प्रसिद्धी मिळवण्यासोबतच बक्कळ पैसा देखील मिळतो. म्हणूनच सध्या या क्षेत्राची लोकांमध्ये कमालीची क्रेझ पाहायला मिळत आहे. हे असे एक माध्यम आहे, ज्यामुळे आपण आपले विचार, आपल्या भावना, आपली कला थेट प्रेक्षकांसमोर कोणत्याही फिल्टरशिवाय सादर करता येते. (Social Media)
त्यामुळेच कदाचित कलाकार देखील या माध्यमाच्या प्रेमात आहे. आज आपण पाहिले तर क्वचितच असे कलाकार असतील जे सोशल मीडियाचा वापर करत नाही. मात्र बहुतेक सर्वच कलाकार नेहमीच या माध्यमाचा वापर करताना दिसतात. अनेक कलाकार तर त्यांचे स्वतःचे यूट्यूब चॅनेल देखील चालवतात. या चॅनेलमध्ये ते त्यांचे दैनंदिन जीवन, कामाबद्दलची माहिती, स्वतःची माहिती आदी अनेक गोष्टी प्रेक्षकांना सांगतात. (Entertainment News)
म्हणूनच प्रेक्षक आणि कलाकारांना जोडणारे महत्वाचे मध्यम म्हणून देखील सोशल मीडिया ओळखले जाते. गायक, संगीतकार, अभिनेते असलेले राहुल देशपांडे (Rahul Deshpande) हे देखील त्यांचे एक यूट्यूब चॅनेल चालवतात. या चॅनेलवर ते त्यांचे अनेक गाणे ऐकवतात, जुनी गाणी नवीन स्टाईलने गातात. (Rahul Deshpande)
अनेकदा त्यांच्या या चॅनेलवर आपण राहुल यांच्यासोबत इतरही गायकांना गाताना पाहतो. राहुल यांचे यूट्यूब चॅनेल कमालीचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. मात्र आता राहुल यांनी काही काळ यूट्यूब चॅनेलमधून ब्रेक घेण्याचा विचार केला आहे. खुद्द राहुल यांनी याबद्दल माहिती दिली आहे. (Rahul Deshpande Youtube Channel)
राहुल यांनी त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे . या व्हिडिओमध्ये राहुल म्हणतो, “मी आता ब्रेक घेतोय युट्यूबपासून. खूप केलं 2020 पासून दर बुधवारी शनिवारी येतोच आहे. कंटाळा आला आता मला रिफ्रेश व्हायचं आहे. थोडासा विचार करतो आणि परत एकदा येतो.” (Rahul Deshpande News)
पुढे राहुल म्हणतात, “आनंदाची गोष्ट ही आहे,अमलताश या सिनेमाला तुम्ही दिलेल्या देणगीतून १,१०,००० रुपये मिळाले आहेत. रिअल टाइमही वाढला आहे. काही तरी बरोबर होत आहे आणि याचे पूर्ण श्रेय तुम्हाला आहे कारण, तुम्ही ड्राइव करताय. आजचा पेपरमधील लेख वाचून मला इतके मेल आलेत. हृदयापासून सगळ्यांचे खूप आभार, खूप मनापासून तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद.” (Social News)
===============
हे देखील वाचा : Prasad Oak प्रसाद ओकने केली नव्या बायोपिकची घोषणा, दिसणार ‘या’ दिग्गज दिग्दर्शकाच्या भूमिकेत
===============
दरम्यान राहुल देशपांडे यांचा ‘अमलताश‘ (Amaltash) हा चित्रपट २०२४ मध्ये रिलीज झाला. ५० दिवस थिएटरमध्ये यशस्वीरित्या चालल्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर रिलीज कधी होतोय याकडे सर्वांचेच लक्ष होते. मात्र काही दिवसांआधी ‘अमलताश’ सिनेमा युट्यूबर रिलीज करण्यात आला. अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मने अमलताश चित्रपटाला स्ट्रीम करण्यास नकार दिल्याने राहुल देशपांडे आणि टीमने हा चित्रपट युट्यूबर अपलोड केला. त्यांचा हा निर्णय अगदी योग्य ठरला. युट्यूबवर या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला. (Entertainment mix masala)
तत्पूर्वी राहुल देशपांडे यांनी यूट्यूबमधून काही काळ ब्रेक घेतल्याने अनेकांनी त्यांना असे न करण्याचं आवाहन केले आहे. काहींनी त्यांना ‘लवकर परत या आम्ही तुमचे गाणे मिस करू’ असे देखील म्हटले आहे. मात्र राहुल किती दिवस यूटुबरवर दिसणार नाही याबद्दल त्यांनी काहीच खुलासा केलेला नाही.