Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

हार्दिक-वीणाचा रंगला लग्नसोहळा!; Aranya मधील धमाकेदार गाणं प्रदर्शित

Shakti Samanta : हिट सिनेमांचा सुपरहिट दिग्दर्शक

Pallavi Joshi यांनी मराठी जेवणाबाबतच्या विवेक अग्निहोत्रींच्या त्या विधानावर केली

Nagraj Manjule : शाळेत असतानाच लागलेलं दारुचं व्यसन पण….; नागराज

“नवोदित कलाकार कसा मोठा होणार?”, Siddhant Sarfareचा Prasad Oakला प्रश्न;

हॉलीवूडची कॉपी केल्यामुळे ‘या’ हिंदी सिनेमाच्या सर्व प्रिंट्स कोर्टाने संपूर्णपणे

Jr NTR ‘वॉर २’ चित्रपटानंतर या दोन चित्रपटांमध्ये झळकणार!

Amol Palekar यांनी राजेश खन्ना यांना नरभक्षक अभिनेता का म्हटलं?

Priya-Umesh यांची ‘बिन लग्नाची गोष्ट’साठी निवड झाली तरी कशी?

Jayashree Gadkar : एका फोटोमुळे कसं बदललं जयश्री यांचं आयुष्य?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Amol Palekar : अभिनेता अमोल पालेकर ‘यांच्या’विरुध्द कोर्टात का गेले होते?

 Amol Palekar : अभिनेता अमोल पालेकर ‘यांच्या’विरुध्द कोर्टात का गेले होते?
बात पुरानी बडी सुहानी

Amol Palekar : अभिनेता अमोल पालेकर ‘यांच्या’विरुध्द कोर्टात का गेले होते?

by धनंजय कुलकर्णी 28/01/2025

संवेदनशील अभिनेता आणि कुशाग्र दिग्दर्शक अमोल पालेकर (Amol Palekar) यांनी वयाची नुकतीच ८० वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानिमित्ताने त्यांचे ‘ऐवज’ नावाचे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात त्यांनी अनेक खळबळ जनक घटनांचा उल्लेख केला आहे. खरं तर अमोल पालेकर यांची रुपेरी पडद्यावरील इमेज ही एक शांत संयमी आणि सर्व सामान्य व्यक्तिमत्त्वाच्या नायकाची होती. नंबर वनच्या स्पर्धेपासून ते कोसो दूर होते. असं असतानाही त्यांच्या अनेक भूमिकांना रसिकांनी आजही लक्षात ठेवले आहे. अलीकडे मात्र त्यांच्या काही वक्तव्यांनी ते पुन्हा चर्चेत आले होते.

पण एक कलावंत म्हणून त्यांनी कलाक्षेत्रात दमदार कारकीर्द घडवली आहे.  त्यांच्या रुपेरी कारकिर्दीत त्यांना आलेल्या काही घटनांचा उल्लेख या पुस्तकात केला आहे त्या वाचून आश्चर्य वाटते. अमोल पालेकर (Amol Palekar) यांनी एकदा निर्माता दिग्दर्शक बी आर चोप्रा यांच्यावर चक्क लीगल नोटीस बजावली होती. अभिनेता अमोल पालेकर यांना बी आर चोप्रा यांचे विरुद्ध कोर्टात जाण्याची आवश्यकता का पडली आणि या केसचे पुढे काय झाले याचे सविस्तर वर्णन त्यांनी आपल्या या पुस्तकात केले आहे. काय होता तो नेमका किस्सा? आणि अमोल पालेकर यांच्यावर कोर्टात जाण्याची वेळ का आली?

हा किस्सा साधारणत: ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीचा आहे. अमोल पालेकर त्या वेळी बऱ्यापैकी प्रस्थापित अभिनेते बनले होते. त्यावेळी अमोल पालेकर (Amol Palekar) बी आर चोप्रा यांच्या ‘अग्निपरीक्षा’ या चित्रपटात काम करत होते. हा चित्रपट बी आर फिल्म्स प्रोड्युस केला होता. या सिनेमाचे दिग्दर्शक कमल मुजुमदार होते. या चित्रपटात अमोल पालेकर, परीक्षित सहानी आणि रामेश्वरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट बनायला खूप वर्ष लागली. याचं कारण या चित्रपटाच्या दरम्यान कलावंतांचे झालेले एक्सीडेंटस.

अभिनेत्री Rameswari यांचा एका दुसऱ्या चित्रपटाच्या सेटवर अपघात झाला आणि त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली. त्यामुळे या सिनेमाचे चित्रीकरण थांबले. नंतर काही काळाने पुन्हा चित्रीकरण सुरू झाल्यानंतर अभिनेता Parikshit Sahni दुसऱ्या एका चित्रपटाच्या शूटच्या दरम्यान घोड्यावरून पडल्याने जायबंदी झाले आणि पुन्हा हा चित्रपट रखडला. काही महिन्यानंतर पुन्हा चित्रपटाची शूटिंग सुरू झाली. यामुळे चित्रपटाचे बजेट वाढत गेले. अमोल पालेकर यांच्या म्हणण्यानुसार निर्मात्याने त्यांना पेमेंट केलेच नाही. (Entertainment mix masala)

अमोल पालेकर (Amol Palekar) यांनी चित्रपटाचे डबिंग देखील पूर्ण केले आणि सिनेमाचे मानधन घेण्यासाठी ते बी आर चोप्रा यांच्या ऑफिसमध्ये गेले. तिथे त्यांना पेमेंट तर मिळालेच नाही पण वाईट वागणूक मात्र मिळाली! अमोल पालेकर निर्मात्याला म्हणाले, ”तुम्हाला जर पेमेंट शक्य नसेल तर तुम्ही तसे मला हमीपत्र द्या की तुमचे पेमेंट झाल्याशिवाय आम्ही चित्रपट प्रदर्शित करणार नाही!” हे ऐकल्यानंतर निर्माते खूप संतापले आणि त्यांना म्हणाले, ”तुझी औकात काय माझ्यासोबत बोलण्याची? तुला मी एका मिनिटात चित्रपटसृष्टीतून हाकलून देऊ शकतो!” त्यावर अमोल पालेकर म्हणाले, ”मी कोणीही गॉडफादर घेऊन सिनेमात आलो नाही. मी माझ्या टॅलेंटवर सिनेमात आलो आहे आणि चित्रपटसृष्टी म्हणजे काय तुमच्या घराची बाल्कनी नाही की तिथून कुणाला ही हाकलून देता येईल.” नंतर भरपूर वादावादी झाली. पण अमोल पालेकर यांना पेमेंट मिळालेच नाही.

त्यानंतर अमोल पालेकर (Amol Palekar) यांनी रीतसर कोर्टामध्ये निर्मात्याच्या विरुद्ध तक्रार केली. कोर्टाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले आणि निर्मात्याला मानधन द्यायला सांगितले. हे मानधन त्यांनी कोर्टात जमा करण्यास सांगितले. निर्मात्याने ते मानधन कोर्टात जमा केले खरे पण कुठलाही निकाल लागल्या शिवाय ते मानधन अमोल पालेकर यांना देऊ नये अशी देखील अट घातली! मानधन जमा झाल्याने सिनेमा रिलीजचा मार्ग मोकळा झाला. पुढे ही कोर्ट केस बरीच वर्षे चालली. (Untold stories)

============

हे देखील वाचा : R. D. Burman : म.रफी यांचे आर डी बर्मनकडे गायलेले शेवटचे गाणे कोणते?

============

दरम्यानच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित झाला सुपर फ्लॉप झाला. पण केस चालूच राहीली. अमोल पालेकर यांचे पेमेंट काही मिळाले नाही. पुढे बऱ्याच वर्षानंतर या केसचा निकाल अमोल पालेकर (Amol Palekar) यांच्या बाजूने लागला आणि त्यांना नियोजित मानधनाच्या पाचपट व्याज असेलेले मानधन मिळाले! पण या प्रकारामुळे अमोल पालेकर आणि बी आर चोप्रा यांच्यातील संबंध मात्र कायमस्वरूपी कडवट बनले. अग्नीपरीक्षा हा चित्रपट सुपर फ्लॉप झाल्यामुळे आज तो कुणालाही आठवणीच्या सुतराम शक्यता नाही. पण या चित्रपटाला संगीतकार सलील चौधरी यांचे सुमधुर संगीत होते हीच काय ती या सिनेमाची आठवण.

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress amol palekar b r chopra Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity News Entertainment Featured Parikshit Sahni rameswari
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.