Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Neha Shitole पद्मश्री अशोक सराफ यांच्यासाठी अभिनेत्री नेहा शितोळेची खास पोस्ट

 Neha Shitole पद्मश्री अशोक सराफ यांच्यासाठी अभिनेत्री नेहा शितोळेची खास पोस्ट
टीव्ही वाले

Neha Shitole पद्मश्री अशोक सराफ यांच्यासाठी अभिनेत्री नेहा शितोळेची खास पोस्ट

by Jyotsna Kulkarni 30/01/2025

दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते. देशातील सर्वोच्च असे हे पद्म पुरस्कार विविध क्षेत्रातील दिग्गज आणि अतुलनीय कामगिरी करणाऱ्या महान लोकांना प्रदान केले जातात. यंदा देखील या पद्म पुरस्कारांची घोषणा केली गेली. यंदाचे पद्म पुरस्कार महाराष्ट्रासाठी खूपच खास आणि महत्वाचे ठरले. कारण यंदा मराठी मनोरंजनविश्वातील दिग्गज अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना पद्मश्री पुरस्कार झाला. (Padmashree Award)

अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सोशल मीडियावर तर अशोक सराफ यांचे अभिनंदन करणाऱ्या पोस्टचा जणू पूर आला होता. नेटकऱ्यांसोबतच अनेक कलाकारांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना आणि आनंद व्यक्त केला. अशातच आता अभिनेत्री नेहा शितोळेने (Neha Shitole) देखील अशोक मामांसाठी एक खास पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Neha Shitole)

View this post on Instagram

A post shared by NEHA SHITOLE (@nehanachiket)

नेहाने तिचा अशोक मामांसोबतचा एक फोटो शेअर केला असून, कॅप्शनमध्ये लिहिले, “मागच्या फळ्यावर लिहिलेल्या महाराष्ट्र भूषण, विनोद सम्राट, मामा आणि आता पद्मश्री श्री अशोक सराफ… ह्या आणि अशा अनेक बिरुदांच वलय आपल्या कामामुळे स्वतःभोवती घेऊन फिरणारा हा नट जेव्हा माणूस म्हणून भेटतो, कळतो, आपल्याला समजून घेतो आणि हळू हळू कामाच्या पलीकडे एका मित्रत्वाच्या भावनेनं त्याच्या अनुभवाच्या शिदोरीतला (आणि रोजच्या डब्यातला सुद्धा) खाऊ आपल्या बरोबर वाटून घेतो, तेव्हा ह्या खूप मोठ्ठ्या माणसाबरोबर काम करण्याचं भाग्य म्हणजे नक्की काय हे उमगतं. नशीब काढलंय मी एवढं नक्की. मामा, खूप खूप अभिनंदन आणि ह्या शुभेच्छा मला प्रत्यक्ष तुम्हाला देता येतायंत ह्या बद्दल स्वतःचंही आज अभिनंदन करावं असं वाटतंय.” (Entertainment News)

‘महाराष्ट्र भूषण’ असलेल्या अशोक सराफ यांचे अभिनंदन करणारी पोस्ट शेअर करताना नेहाने मामांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. सध्या नेहा आणि अशोक सराफ यांची कलर्स मराठी वाहिनीवर ‘अशोक मा. मा.’ ही मालिका सुरू आहे. अशोक सराफ यांनी अनेक चित्रपट, मालिका आणि नाटक अशा मनोरंजनाच्या तिन्ही माध्यमांमध्ये भरपूर काम केले आहे. ते चित्रपटांबरोबर मालिकांमध्येही दिसले आहेत. अशोक सराफ यांनी मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील काम करत आपली ओळख निर्माण केली आहे. (Entertainment masala news )

======

हे देखील वाचा : Ramesh Deo मराठी मनोरंजनविश्वातील राजबिंडा ‘खलनायक’ रमेश देव

======

नेहाबद्दल सांगायचे झाल्यास तिने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये मालिकांमध्ये काम केले आहे. नेहा बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात देखील सहभागी झाली होती. या पर्वामध्ये ती शो जिंकली नसली तरी ती पहिली रनरअप ठरली होती. नेहाने काही प्रोजेक्टसाठी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून देखील काम केले असून, ती चांगली लेखिका देखील आहे. सध्या नेहा अशोक सराफ यांच्यासोबत अशोक मा. मा. या मालिकेत फुलराणी ही भूमिका निभावताना दिसत आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress ashok saraf Celebrity Celebrity News Entertainment Featured marathi Marathi Movie Neha Shitole Neha Shitole Ashok Saraf Neha Shitole Post On Ashok Saraf padmashree ashok Saraf अशोक सराफ नेहा शितोळे नेहा शितोळे आणि अशोक सराफ नेहा शितोळे पोस्ट
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.