Chhaava : ‘छावा चांगला असला तरी…’ मराठी अभिनेत्रीची सिनेमावर नाराजी

Pranit More कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण; वीर पहारियावर विनोद करणे पडले महागात
कॉमेडियन प्रणित मोरे (Pranit More) नेहमीच त्याच्या शो मुळे आणि त्याच्या व्हिडिओमुळे कमालीचा गाजत असतो. यूट्यूबवर देखील त्याच्या शोंना लाखोंनी व्ह्यूज मिळत असतात. तरुणांमध्ये तर प्रणितची कमालीची क्रेझ पाहायला मिळते. त्याचे सर्वच शो हाऊसफुल्ल असतात. आपल्या एकापेक्षा एक दमदार शोमुळे गाजणारा प्रणित सध्या वेगळाच एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. प्रणितने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, या पोस्टमुळे प्रणित चांगलाच प्रकाशझोतात आला आहे. (Pranit More)
झाले असे की, प्रणित मोरेला सोलापूरमध्ये त्याच्या शो नंतर मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रणितने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. यासोबतच त्याने त्याला ही मारहाण अभिनेता वीर पाहरिया याच्यावर विनोद केल्यामुळे झाली असल्याचे देखील या पोस्टमध्ये म्हटले आहे. १० / १२ लोकांच्या ग्रुपने प्रणितला मारहाण केली आहे. (Pranit More Assaulted)
प्रणितच्या टीमकडून शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “२ फेब्रुवारी २०२५ ला संध्याकाळी ५:४५ च्या दरम्यान प्रणित मोरेचा 24K क्राफ्ट ब्रूझ, सोलापूर येथील शो संपला. या स्टँडअप कॉमेडी शोनंतर प्रणित त्याच्या सगळ्या फॅन्सला भेटण्यासाठी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी त्यांच्यामध्ये आला. आजूबाजूची गर्दी कमी झाल्यानंतर ११ ते १२ लोकांचा एक गट त्याच्याजवळ आला. (Entertainment mix masala)
प्रणितला वाटले फोटो काढायचा. मात्र हे लोकं फोटो काढण्यासाठी नाही तर प्रणितला मारहाण करण्यासाठी आले होते. या लोकांच्या ग्रुपने त्याला मारहाण करत धमकी दिली. त्या लोकांनी क्रूरपणे प्रणितवर हल्ला केला. त्याला लाथा मारल्या, या हल्ल्यामध्ये प्रणित जखमी झाला आहे. या ग्रुपचा प्रमुख तन्वीर शेख नावाचा व्यक्ती होता. बॉलीवूड अभिनेता वीर पहारियावर विनोद केल्यामुळे हा हल्ला घडला आहे. त्या लोकांपैकी एकाने, “अगली बार वीर पहारिया बाबा पे जोक मारके दिखा” अशी धमकीही प्रणितला दिली. (Social News)
त्याच्याबद्दल पुन्हा वक्तव्य केल्यास वाईट परिणाम भोगावे लागतील असा धमकी वजा इशाराही प्रणितला देण्यात आला आहे. अजून धक्कादायक बाब म्हणजे, 24K क्राफ्ट ब्रूझ याठिकाणी कोणतीही सुरक्षा नव्हती. अनेकदा विनंती करूनही ते सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार देत आहेत. या फुटेजमध्ये महत्त्वपूर्ण पुरावे आहेत. आम्ही पोलिसांशी देखील संपर्क साधला त्यांनी मदतीचे आश्वासन दिले पण, तसे केले नाही.” या पोस्टमध्ये त्यांनी या प्रकरणानंतर प्रणित मोरेने ऑनलाइन पद्धतीने पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली असल्याची माहिती देखील दिली आहे.
======
हे देखील वाचा : Abhishek Bachchan अनेक फ्लॉप सिनेमे दिल्यानंतर चमकले अभिषेक बच्चनचे नशीब, आज आहे कोट्यवधी संपत्तीचा मालक
======
कोण आहे वीर पहारिया?
वीरचा संबंध राजकीय घराण्याशी आहे. वीर हा स्मृती शिंदे आणि संजय पहारिया यांचा मुलगा आहे. वीरचे आजोबा सुशील कुमार शिंदे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्याने नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘स्काय फोर्स’ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. या सिनेमात तो अक्षय कुमारसोबत झळकला आहे. सिनेमाने चांगली कामगिरी करत भरपूर पैसे कमावले आहे.
या संपूर्ण प्रकरणावर वीरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याची बाजू मांडली आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये सांगितले की, त्याचा या घटनेशी काहीच संबंध नाही. सोबतच त्याने या घटनेबद्दल माफी देखील मागितली आहे. शिवाय त्याने हे देखील सांगितले की, या हल्ल्यासाठी जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई होण्यासाठी तो स्वत: लक्ष घालणार आहे.