Chhaava : ‘छावा चांगला असला तरी…’ मराठी अभिनेत्रीची सिनेमावर नाराजी

Rahul Solapurkar ‘त्या’ शब्दावरून निर्माण झालेला वाद पाहून राहुल सोलापूरकरांनी मागितली माफी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक महत्वाची घटना मराठी माणसाला माहित नाही असे शक्य नाही. महाराजांचा इतिहास आणि त्यांच्या आयुष्यातील सर्वच महत्वाच्या घटना सगळ्यांना अगदी तोंडपाठ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatrapati Shivaji Maharaj) आयुष्यातील अशीच एक महत्वाची आणि मोठी घटना म्हणजे आग्र्याहून सुटका. जेव्हा औरंगजेबाने त्यांना आग्र्यामध्ये नजरकैदेमध्ये ठेवले होते. तेव्हा महाराजांनी मोठ्या हुशारीने आपली सुटका करून घेतली होती. (Rahul Solapurkar)
मात्र सध्या ही घटना आणि या घटनेबद्दल बोलल्या गेलेल्या एका वक्तव्यामुळे चांगलीच गाजत आहे. त्याचे झाले असे की, काही दिवसांपूर्वी अभिनेते राहुल सोलापूरकर (Rahul Solapurkar) यांनी एका पॉडकास्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह्य व्यक्तव्य केले होते. त्यांनी सांगितले होते की, महाराजांनी आग्र्याहून सुटण्यासाठी औरंगजेबाच्या बायकोला आणि इतर अनेक लोकांनी लाच दिली होती. त्या काळात कोणतेही पेटारे नव्हते. शिवरायांनी लाच देत स्वतःची सुटका करून घेतल्याचे त्यांनी म्हटले. राहुल यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आणि त्यांना सोशल मीडियावर अनेक कलाकार लोकांनी आणि नेटकऱ्यांनी सुनावले. हा वाद वाढलेला पाहून आता राहुल यांनी माफी मागत स्पष्टीकरण दिले आहे. (Rahul Solapurkar Apologised)

राहुल यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते म्हणतात, “दीड-दोन महिन्यांपूर्वी रीमा अमरापूरकर यांच्या पॉडकास्टवर मी ५० मिनिटांची मुलाखत दिली होती. त्यातल्या एका प्रश्नाला उत्तर देताना मी इतिहासातल्या काही गोष्टी रंजक कशा बनतात, यावर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेबाबत काही गोष्टी बोललो. बिकानेरच्या राजवाड्यातील काही पुरावे, राजस्थानची काही कागदपत्रे, फारसी-उर्दू ग्रंथांमधल्या तरतुदी आणि औरंगजेबाच्या जवळच्या माणसांच्या काही गोष्टी या वाचायला – अभ्यासायला मिळाल्या. (Rahul Solapurkar Video)
त्यातल्या काही गोष्टींवर मी बोललो. हे बोलताना महाराजांनी कुणाला रत्न दिली, कुणाला पैसे दिले काय काय केले, या सगळ्याचे एकत्रीकरण करत महाराजांनी औरंगजेबाच्या लोकांना कसे आपल्या बाजूने वळवून घेतले आणि तिथून स्वत:ची सुटका करून घेतली हा विषय मांडताना मी लाच हा शब्द वापरला. साम-दाम-दंड-भेद या चारही बाबतींत छत्रपती शिवराय फार मोठे राज्यकर्ते होऊन गेले यावर मी वेगळं काही संगायची गरज नाही.
छत्रपती राजश्री शाहू महाराजांची भूमिकाही मी अत्यंत व्यवस्थित पार पाडली होती. अत्यंत नेकीने सगळा इतिहास अभ्यासून. जगभर गेली अनेक वर्षं वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतची अनेक व्याख्यानं मी दिली आहेत. जेवढा माझा अभ्यास आहे तेवढा देण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि जगभरातल्या लोकांनी त्याचे कौतुक देखील केले आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याचे माझ्या मनातही येऊ शकत नाही. कुणीतरी फक्त त्या पॉडकास्टमधली दोन वाक्य काढून महाराजांनी लाच दिली असं हा बोलला असं म्हणून त्यावरून गदारोळ उठवण्याचा प्रयत्न केला आहे.
“माझं असं प्रामाणिक यावर सांगणं आहे की यातला कुठलाही हेतू माझा महाराजांचा नखभरही अवमान करण्याचा माझा प्रयत्न नाही. इतिहास रंजक कसा केला जातो यासाठी काय काय सांगण्याचा प्रयत्न करत होतो. पण बोलण्याच्या नादात त्यातील लाच या शब्दामुळे जर शिवभक्त, शिवप्रेमी नाराज झाले असतील, तर मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. मी छत्रपतींचं गुणगाण करतच मोठा झालो आहे. गड-किल्ल्यांवर मी वाढलो आहे. मी रायगडावरची डॉक्युमेंटरी त्यासाठीच केली होती.
आपण कस पंढरपूरच्या जसा वारकरी असतो त्याच भावनेने महाराजच्या समाधीसमोर नतमस्तक व्हायला पाहिजे. मी महाराष्ट्रातला शिवप्रेमी नागरिक आहे. अनेकांना वाटत असेल की, मी महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला तस असे माझ्याकडून स्वप्नात देखील होऊ शकत नाही. यावरून उगाच महाराष्ट्रात गदारोळ उठवू नका. तुम्ही सांगत असाल तर मी यापुढे शिवाजी या विषयावर काही बोलणारही नाही.
मी जो काही विषय मांडायचा प्रयत्न केला होता, तो विषय मांडताना मूळ विषय आणि रंजकता यावर भाष्य केले. माझं एवढेच म्हणणं आहे की एखाद्या शब्दावरून कीस पाडायचा आणि एका व्यक्तिमत्वाला सातत्याने झोडपायचे. लाच हा शब्द शिवाजी महाराजांसाठी त्यांना कमी लेखण्यासाठी अजिबात नव्हता. पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. असे राहुल सोलापूरकर त्यांच्या व्हिडिओमध्ये म्हणाले आहेत.”
======
हे देखील वाचा : Abhishek Bachchan अनेक फ्लॉप सिनेमे दिल्यानंतर चमकले अभिषेक बच्चनचे नशीब, आज आहे कोट्यवधी संपत्तीचा मालक
Pranit More कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण; वीर पहारियावर विनोद करणे पडले महागात
======
राहुल सोलापूरकर यांनी पॉडकास्टमध्ये काय भाष्य केले होते?
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून लाच देऊन सुटले होते. तेव्हा तिथे पेटारे वगैरे काही नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन महाराष्ट्रात परत आले. त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवल्या याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोला देखील लाच दिल्याचे पुरावे इतिहासात आहेत. सगळा इतिहास कथा स्वरूपात सांगायचे म्हटले की थोडे रंग भरून सांगावा लागतो पण रंजकता आली की इतिहासाला छेद जातो.