Mandakini : नेपोटिझमच्या शर्यतीत मंदाकिनीच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या…

shahenshah : पडद्यावर पोलीस, थिएटरवर बंदोबस्त
हिंदी चित्रपटातील हुकमी संवादातील (डायलॉगमधील) एक हुकमी संवाद, वक्त बदलनेमे देर नहीं लगता…
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) च्या यशोगाथेत तसेच काही वेळेस घडलयं. नरेश मल्होत्रा, बिट्टू आनंद व टीनू आनंद निर्मित व टीनू आनंद दिग्दर्शित “शहेनशाह” (Shahenshah) (मुंबईत प्रदर्शित १२ फेब्रुवारी १९८८) च्या वेळेस तसेच घडले. याची सुरुवात अमिताभने राजकारणात प्रवेश केल्यावर झाली. १९८४ च्या अगदी अखेरीस अमिताभने सत्तेच्या राजकारणात प्रवेश केला आणि इंदिरा काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ही गोष्ट त्याचे निस्सीम भक्त, प्रसार माध्यमे आणि चित्रपटसृष्टीला धक्काच होता. (Entertainment mix masala)

पडद्यावरील ॲन्ग्री यंग मॅनची राजकारणात “भूमिका” ती काय असा प्रश्न होता. उत्तर प्रदेश राज्यातील इलाहाबाद लोकसभा मतदारसंघात जनता दलाचे उमेदवार मुरब्बी राजकारणी हेमवतीनंदन बहुगुणा यांचा भारी वोटों से पराभव करुन अमिताभ खासदार झाला… काही वर्षातच त्याची भूमिका असलेला “शहेनशाह” प्रदर्शित करण्याची पूर्वतयारी सुरु होत असतानाच बोफोर्स प्रकरणावरुन विरोधी पक्षानी अमिताभविरोधात तीव्र आंदोलन सुरु केले आणि वातावरण बदलायला सुरुवात झाली.
मला आठवतय, जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये “शहेनशाह” (Shahenshah) च्या गाण्याच्या ध्वनिफीत प्रकाशन सोहळ्यात अनपेक्षितपणे एक गोष्ट घडली. अमिताभ बच्चन व टीनू आनंद यांच्यात थट्टामस्करी सुरु असतानाच अमिताभने टीनू आनंदला त्या हाॅटेलच्या स्वीमिंग पूलात ढकलले आणि आम्ही सिनेपत्रकार व फोटोग्राफर अचंबित झालो. अमिताभ असे काही करेल अशी अजिबात अपेक्षा नव्हती. या गोष्टीने मीनाक्षी शेषाद्री व पूनम धिल्लाॅनही आश्चर्यचकित आणि या सोहळ्यावर फोकस टाकताना ही गोष्ट हायलाईट.
एकिकडे चित्रपटाचे गीतकार आनंद बक्षी व संगीतकार अमर उत्पल यांचे अंधेरी रातों मे सुनसान राहो पे हे गाणे लोकप्रिय होत गेले (ध्वनिफीत टेपरेकॉर्डर यांचे ते युग होते), जाहिरातीतील रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप होते है, नाम है शहेनशाह हा डायलॉग हिट झाला (टीनू आनंदचे वडील इंदर राज आनंद हे या चित्रपटाचे संवाद लेखक होते). तर दुसरीकडे प्रसार माध्यमातून अमिताभ विरोधात वातावरण निर्माण होत गेले. ते मुद्रित माध्यमाचे दिवस होते.

पण मग याच “शहेनशाह” (Shahenshah) ला पोलीस बंदोबस्तात का बरे प्रदर्शित व्हावे लागले? असे काय बरे झाले?
एखादी कथा अचानक वेगळे वळण घेते तसेच घडले. पडद्यावरचा पोलीस आणि त्याचे जग हा तर केवढा तरी मोठा, बहुरंगी, बहुढंगी फंडा. शाहीद कपूरची भूमिका असलेल्या “देवा” पर्यंत हा रुपेरी पडद्यावरील पोलीस हा प्रवास आला आहे.
अमिताभ बच्चनच्या बाबतीत तर खूपच मोठा धमाका.
अमिताभला ॲन्ग्री यंग मॅनची सर्वप्रथम प्रतिमा देणाऱ्या Salim Khan लिखित व प्रकाश मेहरा निर्मित व दिग्दर्शित ‘जंजीर’ (Zanjeer) मध्ये (१९७३) त्याने अतिशय आक्रमक कर्तबगार असा इन्स्पेक्टर विजय खन्ना साकारला होता आणि मग अनेक चित्रपटात त्याने कधी पोलीस इन्स्पेक्टर साकारला (अर्थात ‘अकेला’), कधी त्याचा धाकटा भाऊ रवि पोलीस इन्स्पेक्टर होता (अर्थात ‘दीवार’), कधी त्याचे पिता पोलीस इन्स्पेक्टर होते (अर्थात ‘शक्ती’), कधी त्याच्या प्रेयसाचा पती पोलीस इन्स्पेक्टर (अर्थात ‘फरार’), कधी संपूर्ण चित्रपटभर त्याच्यामागे पोलीस लागतात (अर्थात ‘डाॅन’) वगैरे वगैरे.
==============
हे देखील वाचा : Yaadein : जगातील पहिल्या एकपात्री चित्रपटाला ६१ वर्ष
==============
यात टीनू आनंद दिग्दर्शित ‘Shahenshah’चे उदाहरण वेगळे. यात त्याने इन्स्पेक्टर विजय कुमार श्रीवास्तव साकारला. याच सिनेमाला मुंबईतील मेन थिएटर मराठा मंदिरला डे फर्स्ट शोला थिएटरबाहेर खूप मोठा पोलीस बंदोबस्त ठेवावा लागला. (त्या काळात मेन थिएटर हा खूपच महत्त्वाचा फंडा होता.. पण भारी होता. “टाॅकीजची गोष्ट” काही वेगळीच) अमिताभच्या या चित्रपटावर अशी पोलीस संरक्षणाची वेळ ती का यावी? कुछ तो वजह होगी. पडद्यावर सलिम जावेदच्या संवादाची जोरदार डायलॉगबाजी करणारा अमिताभ लोकसभेत मात्र मौनी खासदार ठरला. म्हणजे तो कोणत्याही चर्चेत भाग घेत नसे आणि प्रश्नही करीत नसे. त्याचे ते क्षेत्रही नव्हतेच म्हणा. पण तो ‘मौनी खासदार’ म्हणून मिडियातून बरीच चर्चा झाली.
अशातच बोफोर्स घोटाळा प्रकरणी त्याचे नाव घेतले जाऊ लागले आणि या गोष्टीचे मोठ्या प्रमाणावर समाजकारण आणि राजकारण तापले. माध्यमातून सतत तेच गाजू लागले.. त्याचीच उलटसुलट चर्चा. वातावरण चिघळले. कलुषित झाले. अमिताभ जणू व्हीलन ठरला. अमिताभ विरोधातील आंदोलनाचा फटका नेमक्या त्याच वेळेस प्रदर्शनास सज्ज असलेल्या ‘शहेनशहा’ (Shahenshah) ला बसणार असे वातावरण निर्माण झाले. सिनेमा नेहमीच साॅफ्ट टार्गेट असतोच म्हणा. ब्रेकिंग न्यूज होत राहतो. मग काळ कोणताही असो.

अशा वेळी ते वातावरण निवळण्याचा एक मार्ग म्हणून अमिताभची पाहुणे कलाकार म्हणून नृत्य असलेल्या राकेश कुमार दिग्दर्शित ‘कौन जीता कौन हारा‘ हा चित्रपट रिलीज करणे. (५ फेब्रुवारी १९८८. मुंबईत मेन थिएटर इंपिरियल) वादळाचा वेग कमी करण्याचा आणि शक्य झाल्यास त्याची दिशा बदलायचा एक प्रयत्न अथवा धडपड. त्या चित्रपटाच्या पोस्टरला काही ठिकाणी काळे फासले गेले. विरोधातले वातावरण थोडे निवळले. आणि मग पुढच्याच शुक्रवारी ‘शहेनशहा’ प्रदर्शित होत असतानाच त्याच्या पोस्टरलाही काळे फासले जाण्याची शक्यता होती. कारण अगोदरपासूनच त्यावर रोख होता. तोही वाढता. फस्ट डे फर्स्ट शोला निदर्शने झाली असती. अशा वेळी सिक्युरिटी मस्ट होतीच.
‘शहेनशहा’ (Shahenshah) रिलीज झाला आणि सुदैवाने वातावरण निवळत गेले. पब्लिक रिपोर्ट मिक्स होता. विशेष म्हणजे या चित्रपटाची कथा कल्पना. जया बच्चन यांची आहे. दिवसा भ्रष्टाचारी असलेला पोलीस नायक रात्री रुप पालटून ‘शहेनशाह’ बनून तेच गुन्हेगारांचे अड्डे उद्ध्वस्त करतो. पिक्चर बरा होता. पहिले चार पाच आठवडे सिनेमाची हवा होती. तीन आठवडे तर पोलीस व्हॅन होती. (सोशल मिडियात हा फोटो पाह्यला मिळतो.) हे सिनेमाला संरक्षण म्हणा अथवा आंदोलकाना रोखणे होते म्हणा. चित्रपटावर बेहद्द प्रेम करणाऱ्यांना अशा आंदोलनाशी काहीच देणे घेणे नसते. महत्वाचे म्हणजे दिवस जस जसे पुढे सरकले तस तसा ‘अभिनेता अमिताभ बच्चन’ वर फोकस पडायला लागला आणि तोही आपल्या नवीन चित्रपटांचे मुहूर्त आणि शूटिंगमध्ये रमला. त्याचे खरे मैदान हेच असल्याने तो येथील ‘शहेनशहा’ म्हणूनच कायमचा ओळखला जातो… कालही आजही आणि उद्याही.

बरं, अमिताभ बच्चनच्या चौफेर वाटचालीतील हा एकच स्पीड ब्रेकर नाही वा एकच वाद नाही. अतिशय उत्तम वाटचाल सुरु असतानाच बंगलोर येथील मनमोहन देसाई दिग्दर्शित “कुली” (१९८३) च्या सेटवर एका मारहाण दृश्यात पुनीत इस्सारचा ठोसा चुकवायच्या प्रयत्नात टेबलाचा कोपरा पोटात बसल्याने ओढवलेला जिवघेणा आजार हा चिंताजनक होता. देशभरात सर्व धर्मियांनी त्याला बरे वाटावे म्हणून प्रार्थना केली.
त्यातून बरा होत पुन्हा कारकिर्दीला वेग पकडतानाच राजकारणात प्रवेश. खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा चित्रपटसृष्टीत कार्यरत होतानाच मनमोहन देसाई दिग्दर्शित “गंगा जमुना सरस्वती” फर्स्ट शोपासूनच सुपर फ्लाॅप. आणि त्यानंतरही तुफान, जादुगर, अकेला, अजूबा, इंद्रजित हे फ्लाॅप तर अग्निपथ, आज का अर्जुन, हम, खुदा गवाह साधारण यशस्वी. (Shahenshah)
==============
हे देखील वाचा : Amitabh Bachchan ची “सेकंड इनिंग” जास्त प्रभावी
==============
काही काळ नवीन चित्रपट स्वीकारणे थांबवल्यावर पुन्हा कारकिर्द सुरु करताना मेजरसाब, बडे मियां छोटे मियां साधारण यशस्वी, मृत्यूदाता, कोहराम, सूर्यवंशम, लाल बादशाह अपयशी. केबीसीएल घाट्यात/ तोटय़ात. अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला. कौन बनेगा करोडपतीने यशस्वी पुनरागमन आणि २००० पासून पंचवीस वर्ष “एन्टरटेनर नंबर वन”. अधिकाधिक चतुरस्र वाटचाल.
“शहेनशाह” (Shahenshah) च्या निमित्ताने असा धावता आढावा हवाच. जहा राजा खडा होता है, वहां ही दरबार स्थापित होता है, “शहेनशाह” मधील इंदर राज आनंद यांचा हा संवाद आठवायला हवाच.