
Shamshad Begum : ऑडीशनला गेली आणि बारा गाण्यांचे कॉन्ट्रॅक्ट साइन करून आली!
भारतीय चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातील पन्नासच्या दशकातील गाजलेली गायिका म्हणजे शमशाद बेगम (Shamshad Begum). खरंतर लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या आगमनानंतर बाकी सर्वच गायिकांच्या गाण्यांची संख्या कमी होत गेली तरी देखील Shamshad Begum खंबीरपणे पन्नासच्या दशकात गातच होती. आरपार, नया दौर, मुगल ए आजम… या चित्रपटातील शमशाद बेगम यांचा तिखट अनुनासिक आणि कणखर स्वर आज देखील रसिकांना तितकाच आवडतो.

शमशाद बेगम (Shamshad Begum) या अतिशय सनातनी मुस्लिम कुटुंबातून आलेल्या होत्या. त्यामुळे त्यांना फोटोग्राफीचे खूप वावडे होते. साठच्या दशकापर्यंत रसिकांनी शमशाद बेगम यांचा फोटो देखील पाहायला मिळत नव्हता. शमशादला प्रसिद्धी अजिबात आवडत नसे त्या प्रसिद्धी परान्मुख होत्या. कुठेही पार्टीला जाणे नाही. कुठल्याही मासिकांना कधी त्यांनी मुलाखती दिल्या नाहीत. एक शांत सुशेगात आयुष्य त्या जगल्या.
शमशाद बेगम (Shamshad Begum) यांच्या गायकीची सुरुवात फार रोमहर्षक पद्धतीने झाली होती. शमशाद लहानपणापासूनच गाणं गात होत्या. खरं तर त्यांना कुठलीही अधिकृत संगीताची शिकवणी मिळाली नव्हती. तरीदेखील लोकसंगीत त्या अतिशय सुंदर गात असायच्या. शाळेत असताना त्यांनी अनेक स्पर्धांमधून गाणी गायली होती. त्यांच्या घरामध्ये मात्र गाणं गायला विरोध होता. त्यामुळे यात करिअर करता येणे शक्य नव्हते. पण शमशादचे एक काका होते आमीर खान नावाचे. ज्यांना शमशादच्या आवाजाची जादू कळाली होती.
============
हे देखील वाचा : Raj kapoor मध्यरात्री दोन वाजता गीतकार शैलेंद्र यांच्या घरी का पोहोचले?
============
एकदा त्यांनी शमशाच्या आई वडिलांची नजर चुकवून तिला झेनोफोन या ग्रामोफोन कंपनीमध्ये ते घेऊन गेले. तिथे संगीतकार गुलाम हैदर (Ghulam Haider) उपस्थित होते. शमशाद बेगमचे वय त्यावेळी अवघे चौदा-पंधरा वर्षे होते. संगीतकार गुलाम हैदर यांनी शमशादला एक स्थायी घ्यायला सांगितले. शमशादला काहीच कळाले नाही. कोऱ्या चेहऱ्याने त्यांनी विचारले की, ”स्थायी म्हणजे काय?” गुलाम हैदर गोंधळले ते म्हणाले, ”बेटा तुम्हें स्थायी मालूम नही?” स्थायी का मतलब किसी गाणे का शुरुवाती लाईन..” त्यावर शमशाद म्हणाली, ”अच्छा मुखडा…” शमशादच्या त्या निरागस उत्तराने गुलाम हैदर सुखावले.
त्यानंतर शमशाने बहादूर शाह जफर यांची एक गझल गायला सुरुवात केली. ‘मेरा यार मुझे मिले अगर…’ अतिशय भावस्पर्शी स्वरामध्ये शमशाद (Shamshad Begum) गावू लागली. पहिल्या दोन ओळी झाल्या की गुलाम हैदर यांनी तिला थांबायला सांगितले. शमशाद घाबरली. तिला वाटले आपले चुकले की काय? एक तर आपण काहीही संगीताचे शिक्षण घेतलेले नाही आणि एवढ्या मोठ्या संगीतकारासमोर आपण बिनधास्त गायला सुरुवात केली. ती घाबरली. पण संगीतकार गुलाम हैदर म्हणाले ‘बेटा रुको!” लगेच त्यांनी कंपनीचे मालक त्यांना तिथे पाचारण केले आणि त्यांना पुढील गाणे ऐकायला लावले. दोघांना ते गाणे खूप आवडले आणि त्याच मीटिंगमध्ये शमशादसोबत बारा गाण्यांचे कॉन्ट्रॅक्ट साइन केले!!

दोन तासात शमशाद बेगमला (Shamshad Begum) झेनोफोनच्या एका रेकॉर्डसाठी घेतले गेले. शमशादच्या (Shamshad Begum) घरी काकांनी सर्व प्रकार सांगितला. आई-वडिलांनी सुरुवातीला थोडा विरोध केला. पण काकांच्या समजावणीमुळे सर्वजण तयार झाले. तिच्या वडलांनी एक अट घातली तिने सर्व गाणी बुरखा रेकॉर्ड करायची आणि कुठेही फोटो येवू द्यायचा नाही. शमशाद बेगम यांची ही रेकॉर्ड प्रचंड गाजली. तिला प्रत्येक गाण्यासाठी १५ रुपये मानधन मिळाले आणि या रेकॉर्डसाठी तिला रॉयल्टीपोटी तब्बल ५००० रुपये मिळाले होते. १९३४ या वर्षातील हे पाच हजार रुपये होते!
शमशाद (Shamshad Begum) यांच्या या रेकॉर्डच्या स्वराने भारतभर मोठा विक्रमी लोकप्रिय हासिल केली. शमशादचा स्वर आता रेडिओवर ग्रामोफोनवर सगळीकडे वाजू लागला. १९३६ सालापासून ती पेशावर रेडिओवर गाऊ लागली. संगीतकार गुलाम हैदर यांनी या स्वराला आणखी चांगले बनवले आणि चाळीसच्या दशकापासून शमशाद भारतातील एक अग्रगण्य गायिका बनली. या काळात तिची गाणी बेफाम गाजली. (Bollywood masala)
लेके पहला पहला प्यार (सी आय डी), कभी आर कभी पार (आरपार), कजरा मोहब्बत वाला (किस्मत) मेरे पिया गये रंगून (पतंगा), होळी आई रे कान्हाई (मदर इंडिया), छोड बाबुल का घर आज पी के नगर (बाबुल),सैय्या दिल मी आना रे (बहार) दूर कोई गाये धून ये बजाये (बैजू बावरा),चमन में रहके वीराना (दिदार),मेरी नींदो में तुम(नया अंदाज)
============
हे देखील वाचा : Naqsh Lyallpuri : चौपाटीवरील गोंगाटात लिहिली ही अप्रतिम गजल!
============
शमशादने एकूण ३० वर्षात गायलेल्या हिंदी चित्रपटातील गाण्यांची संख्या १३०० च्या आत आहे. यातही पुन्हा दशकानुसार विभागणी केली तर चाळीसच्या दशकात तिची ५०२, पन्नासच्या दशकात ७०६ तर साठच्या दशकात अवघी ७५ गाणी आली. संगीताकारानुसार जर आपण तिच्या गायकीच्या कारकिर्दीकडे बघितले तर सर्वाधिक ८६ गाणी तिने पंडीत गोविंदराम यांच्याकडे गायली. लोकप्रिय संगीतकारांपैकी नौशाद यांच्या कडे ५९ तर Omkar Prasad Nayyar यांच्या कडे ४० गाणी गायली. युगल गीतात सर्वाधिक म. रफीसोबत १६८ गाणी मुकेश सोबत २२ गाणी तर किशोर सोबत २४ गाणी आहेत. तिने लतासोबत २७ तर आशा सोबत ३९ गाणी गायली. तिच्या सोलो गीतांची संख्या ७०८ तर इतर गायक गायीकांसोबत गायलेल्या युगल व मिश्र गीतांची संख्या ५७६ आहे.
शमशाद बेगम (Shamshad Begum) यांचे आयुष्य जरी संथ शांत असलं तरी एक निर्णय मात्र त्यांनी खूप बोल्ड घेतला होता. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी चक्क एका हिंदू व्यक्तीसोबत लग्न केले होते!