Tamannaah-Vijay : लग्नाच्या चर्चा सुरु असताना तमन्ना-विजयचं ब्रेकअप?

Yogesh : ‘जिंदगी कैसी है पहेली…’ या गाण्याच्या निर्मितीची भन्नाट कथा!
कधी कधी कन्फ्युजनमधून चांगल्या गोष्टी घडून जातात. एकदा एका संगीतकाराने दोन गीतकारांना अनावधानाने एकच ट्यून देऊन गाणे लिहायला सांगितले. दोघांनी गाणी लिहून आणली. पण आता गाणे तर एकाचेच सिलेक्ट करायचे होते. त्यामुळे एका गीतकाराचे गाणे सिलेक्ट झाले आणि दुसरा गीतकारासाठी चित्रपटात पुन्हा एक नवीन सिच्युएशन क्रिएट करून गाणे लिहायला सांगितले आणि ते गाणे तर सुपरहिट झाले! बोनस मिळालेले हे गाणे आज देखील प्रचंड लोकप्रिय आहे म्हणजे कन्फ्युजनमधून झालेल्या चुकीने हे गाणे तयार झाले! कोणतं होत ते गाणं? आणि काय होता हा नेमका प्रकार? खूप गमतीशीर असा हा किस्सा आहे. (Yogesh)

ऋषिकेश मुखर्जी (Hrishikesh Mukherjee) यांचा ‘आनंद’ हा १९७१ साली प्रदर्शित झालेला चित्रपट भारतीय सिनेमाच्या इतिहासातील एक ऑल टाईम ग्रेट सिनेमातील आहे. आज पन्नास-पंचावन्न वर्ष झाली पण हा सिनेमा रसिक विसरलेले नाहीत. राजेश खन्ना-अमिताभ बच्चन पहिल्यांदाच या सिनेमात एकत्र आले होते. या चित्रपटातील गाणी गीतकार योगेश (Yogesh)आणि Gulzar यांनी लिहिली होती. गीतकार यांनी लिहिलेले ‘मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने सपने सुरीले सपने’ हे गाणं ऑलरेडी रेकॉर्ड झालं होतं.
गीतकार योगेश (Yogesh) यांनी ‘कही दूर जब दिन ढल जाये’ हे गाणे लिहिले होते. सिनेमात सुरुवातीला ही दोनच गाणी असणार होती. पण निर्माता दिग्दर्शकाला या सिनेमात आणखी एका गाण्याची सिच्युएशन सापडली आणि तिथे गाणे असायला हवे यावर एकमत झाले. संगीतकाराला तशा सुचना देण्यात आल्या. त्यानंतर संगीतकार सलीम चौधरी यांनी एक ट्यून बनवली खरं तर ती त्यांच्या एका बंगाली गाण्याची ट्यून होती आणि या ट्यूनवर गीतकार योगेश यांना गीत लिहायला सांगितले आणि अनावधानाने गीतकार गुलजार यांना देखील तीच ट्यून देऊन गाणे लिहायला सांगितले. आपण हीच ट्यून गीतकार योगेश यांना देखील दिलीय हे ते विसरूनच गेले होते! (Bollywood masala)

या दोन्ही गीतकारांना माहीत नव्हते की आपल्याला या एकाच ट्यून गाणं लिहायचं आहे. त्या दोघांनीही गाणे लिहिले आणि रेकॉर्डिंगच्या पूर्वी गाणे घेवून सलील दाकडे पोचले. आता मात्र पंचाईत झाली. एकाच ट्यूनवर आता दोन गाणी आले होती. गुलजार यांचे शब्द होते ‘ना जिया लागेना…’ तर योगेश यांनी ‘आंखिया रुलायेना …’ हे गाणे लिहिले. आता दोन पैकी एकच गाणे सिलेक्ट करणे गरजेचे होते तर त्या पद्धतीने गुलजार यांचे गाणे सिलेक्ट झाले. पण निर्माता एल बी लक्ष्मण यांनी सांगितले की, “जरी आपण योगेश (Yogesh) यांचं गाणं घेतलं नाही तरी त्यांना या गाण्याच्या मानधन आपण देऊ कारण त्यांनी या गाण्यासाठी मेहनत घेतली आहे.”
============
हे देखील वाचा : Devendra Goel : अपरिचित पण महान दिग्दर्शक
============
पण योगेश (Yogesh) स्वाभिमानी होते ते म्हणाले, ”जर माझे गाणे चित्रपटात घेतलेच नसेल आणि जे गाणे रेकॉर्ड झाले नसेल तर मला मानधन नको.” योगेश यांच्या या उत्तराने सर्वांचेच मन भरून आले. त्यामुळे असे ठरले की आपण चित्रपटात आणखी एक गाण्याची सिच्युएशन क्रिएट करू आणि तिथे गाणं आता योगेश नवीन गाणे लिहितील. त्या पद्धतीने चित्रपटात नवीन सिच्युएशन क्रिएट केली गेली आणि योगेश यांनी नवीन गाणे लिहिले. हे गाणं नंतर मन्ना डे यांच्या आवाजात रेकॉर्ड झालं. गीताचे बोल होते ‘जिंदगी कैसी है पहेली हाय कभी ये हंसाये कभी ये रुलाये….’ हे गाणे सिनेमात आधी बॅकग्राऊंडला ठेवणार होते पण राजेश खन्ना हे गाणे इतके आवडले की त्याने सांगितले, ”हे गाणे माझ्यावर चित्रित करा!” मग त्या पद्धतीने नवीन सीन लिहिण्यात आले आणि हे गाणे राजेश खन्ना चित्रीत झाले! (Untold stories)
म्हणजे बघा संगीतकार सलील चौधरी यांच्याकडून झालेल्या एका अनावधानातून झालेल्या चुकीमुळे हे सुंदर गाणे जन्माला आले! कधी कधी चुकीतून देखील चांगल्या गोष्टी निर्माण होतात हेच खरे!