Tamannaah-Vijay : लग्नाच्या चर्चा सुरु असताना तमन्ना-विजयचं ब्रेकअप?

Jitendra Joshi : “मराठी प्रेक्षक चित्रपटगृहांऐवजी मोबाईलवर…”
मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नाही अशी वारंवार तक्रार मराठी चित्रपटसृष्टीकडून केली जाते. चित्रपटगृह न मिळाल्यामुळे मराठी चित्रपट हिंदी किंवा दाक्षिणात्य चित्रपटांसारखे चालत नसल्याचेही सांगितले जाते. बॉलिवूड, टॉलीवूड आणि हॉलिवूडच्या जगात मराठी चित्रपट हरवलाय. मराठी चित्रपट चालत नाही अशी ओरड गेले काही वर्ष होत आहे. पण नेमके मराठी चित्रपट का चालत नाही? यामागचं कारण शोधायचा आपण प्रयत्न केला का? चित्रपटगृह न मिळणं किंवा प्राईम टाईम शो न मिळणं ही कारणं जरी असली तरी मुळात मराठी चित्रपटांना प्रेक्षक आहे का? हा प्रश्न अधिक गंभीर असून यावर अभिनेता जितेंद्र जोशी याने महत्वपूर्ण भाष्य केलं आहे. मराठी चित्रपट चित्रपटगृहांमध्ये जाऊन बघण्याऐवजी घरीच टीव्हीवर किंवा मोबाईलवर बघतात, अशी खंत जितेंद्रने व्यक्त केलीये. (Jitendra Joshi)
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मेराकी परफॉर्मिंग आर्टस ऑर्गनायझेनशच्या सहकार्याने आयोजित २३ वा पुणे ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’चा नागपूर पर्वाचा समारोप नुकताच झाला. यावेळी आयोजित महोत्सवात मराठी चित्रपटांची वाटचाल या विषयावर परिसंवादाचे आयोजन केलं होतं तेव्हा Jitendra Joshi ने मराठी चित्रपटांबद्दल भाष्य केलं. (Marathi films)

जितेंद जोशी म्हणाला, “महाराष्ट्र हा मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांपलिकडे देखील आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील समस्यांवर एक वेगळा चित्रपट तयार केला जाऊ शकतो. शिवाय मराठी चित्रपट चित्रपटगृहांमध्ये जाऊन बघण्याऐवजी घरीच टीव्हीवर किंवा मोबाईलवर बघतात त्यामुळे त्याचा परिणाम चित्रपटांवर होतो”, असंही तो म्हणाला. (Marathi upcoming films)
==================
हे देखील वाचा : Ankush Chaudhari प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अंकुश चौधरी बनला मराठी सिनेसृष्टीतील हँडसम अभिनेता
==================
तर, दिग्दर्शक निखिल महाजन म्हणाले, “मराठी चित्रपटांची सध्याची स्थिती खालावली आहे, मात्र एक दिवस पुन्हा सोन्याचे दिवस येतील”. तसेच, AI ही नवी टेक्नॉलॉजी नोकऱ्या संपवू शकत नाही पण तिला डावलून चालणार नाही असं देखील उपस्थीत लोकं म्हणाले. त्यामुळे मराठी चित्रपटाचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी इंडस्ट्री आणि प्रेक्षक या दोघांनी एकत्र येणं महत्वाचं आहे. मराठी भाषेची अस्मिता अबादित राहावी यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. (Entertainment masala)