Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून कां डच्चू दिला होता?

    yash chopra and javed akhtar

    ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Aamhi Saare Khavayye चं दमदार कमबॅक; ‘जोडीचा मामला’ सह होणार आंबट-गोड खुलासा !

Subodh Bhave दिसणार ‘सकाळ तर होऊ द्या’ या नव्या चित्रपटात!

Hum Aapke Hain Koun..! ३१ वर्षांचा झाला….

Telugu Film Industry मधील कामगारांचा संप; टॉलिवूड इंडस्ट्री कशामुळे अडकली

‘श्वास’ फेम Ashwin Chitale ‘या’ कारणामुळे अभिनयापासून लांब

Ramayana : टीव्हीच्या राम-सीताची प्रतिक्रिया, म्हणाले- “चित्रपटाकडून एवढीच अपेक्षा आहे

Kajol : १६ व्या वर्षी पहिला चित्रपट ‘बेखुदी’ मिळाला तरी

Raanjhanaa : “नवीन क्लायमॅक्सने चित्रपटाचा आत्मा”; धनुषने व्यक्त केल्या भावना

Dilip Prabhavalkar : गुढ आणि रहस्यांनी भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटाचा टीझर

Aatli Batmi Futali: ‘सखूबाई’ गाण्यात दिसणार गौतमी पाटील आणि सिद्धार्थ जाधवचा जलवा

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Mahesh Manjarekar यांची ‘फिल्टर कॉफी’; प्रसिद्ध अभिनेत्री करणार रंगभूमीवर पदार्पण…

 Mahesh Manjarekar यांची ‘फिल्टर कॉफी’; प्रसिद्ध अभिनेत्री करणार रंगभूमीवर पदार्पण…
Filter Coffee Marathi Natak
नाट्यकला मिक्स मसाला

Mahesh Manjarekar यांची ‘फिल्टर कॉफी’; प्रसिद्ध अभिनेत्री करणार रंगभूमीवर पदार्पण…

by Team KalakrutiMedia 08/03/2025

Filter Coffee Marathi Drama: कॉफीची नजाकत काही वेगळीच! मग ती कोल्ड असो वा हॉट! कॉफीच्या शौकिनांची संख्या कमी नाही. कॉफीचा खरपूस दरवळ जसा घरभर पसरतो, तसाच आता  रंगभूमीवर कॉफीचा दरवळ पसरणार आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांनी  ही फिल्टर कॉफी’ नाट्य रसिकांसाठी आणली आहे. अद्वैत आणि अश्वमी  थिएटर्स  प्रकाशित महेश वामन मांजरेकर सादर करीत असलेली ही तजेलदार कॉफी ६ एप्रिल ला रंगभूमीवर येणार आहे. रितीशा प्रोडक्शन्स निर्मित महेश वामन मांजरेकर लिखित दिग्दर्शित  फिल्टर कॉफी’ या नाटकांचे निर्माते  दिलीप माधव जगताप असून सहनिर्माते राहुल भंडारे आहेत. नाटकात विराजस कुलकर्णी, विक्रम गायकवाड, कुणाल मेश्राम, अंकिता लांडे आणि उर्मिला कानिटकर यांच्या भूमिका आहेत.(Filter Coffee Marathi Natak)

Filter Coffee Marathi Natak
Filter Coffee Marathi Natak

याप्रसंगी बोलताना महेश मांजरेकर म्हणाले ‘१९९२ साली मला हे नाटक करायचं होतं. त्यावेळी ते शक्य झालं नाही आता हे नाटक मी आणलं असून ते स्वतः दिग्दर्शित करतोय. कॉफीच्या गडद रंगाप्रमाणे या नाटकाची गडद शेड नाट्यरसिकांना अनुभवायला  मिळेल’. सस्पेन्स थ्रिलर असं हे नाटक आहे. मराठी नाट्यरसिक प्रगल्भ आहे. वेगळ्या संहिताचं स्वागत त्यांनी नेहमीचं  केलं आहे.  माझ्या सॊबतीने निर्माते, कलाकार आणि तंत्रज्ञ अशी आम्ही सगळ्यांनी मिळून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आणलेली कडू गोड चवीच्या  फिल्टर   कॉफी’ ची ट्रीट नाट्यरसिक नक्कीच एन्जॉय करतील असा विश्वास महेश मांजरेकर यांनी व्यक्त केला. 

Filter Coffee Marathi Natak
Filter Coffee Marathi Natak

या नाटकाविषयी बोलताना अभिनेता विराजस कुलकर्णी म्हणाला की, वैविध्यपूर्ण नाटक मराठी रंगभूमीवर येतायेत, त्याला नाट्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. रंगभूमीमुळे मराठी चित्रपटसृष्टीला एक वेगळी ओळख मिळतेय. नाटक हे  नेहमी दिग्दर्शकाचं मानलं जातं. दिग्दर्शकाच्या नावामुळे नाट्यरसिक नाटक पाहायला येतात. महेश मांजरेकर याचं नाव त्यात अग्रस्थानी आहे. त्यांच्या कलाकृती पाहत मी मोठा झालोय. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी दवडणे शक्य नव्हतं. आम्ही घेऊन येत असलेलं हे नाटक थ्रीलर जॉनरच असून काहीतरी वेगळं नाट्यरसिकांना पाहायला मिळणार याची खात्री देतो. माझी ही पहिली नाट्यकृती असून महेश मांजरेकर यांच्यासारख्या दिग्ग्ज दिग्दर्शकासोबत काम करणं ही माझ्यासाठी पर्वणी होती. या नाटकाच्या निमित्ताने माझी नाटक करायची इच्छा पूर्ण झाली याचा आनंद असल्याचे अभिनेत्री उर्मिला कानिटकर हिने यावेळी सांगितले. (Filter Coffee Marathi Natak)

===========================

हे देखील वाचा : Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar: ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ रिअ‍ॅलिटी शोचे शीर्षकगीत भेटीला…

===========================

‘फिल्टर कॉफी’ या नाटकाचे सहलेखन अभय देखणे सहाय्यक दिग्दर्शक सुरज कांबळे आहे. संगीताची जबादारी हितेश मोडक   यांनी सांभाळली आहे. प्रकाशयोजना शीतल तळपदे तर नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे आहे. वेशभूषा लक्ष्मण येलप्पा गुल्लार यांची आहे. दिपक कुलकर्णी यांचे विशेष सहकार्य या नाटकासाठी लाभले आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor virajas kulkarni ankita lande filter coffee marathi movie mahesh manjarekar marathimovie 2025 Urmila Kanetkar vikram gaikwad
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.