MOM 2: श्रीदेवींच्या शेवटच्या चित्रपटाचा बनणार सिक्वेल; लेक khushi Kapoor

Dil Se.. : सिनेमातील सतरंगी रे… गाणे बनले कसे?
दक्षिणात्य दिग्दर्शक मनीरत्नम यांचा ‘दिल से’ (Dil Se..) हा चित्रपट ११ ऑगस्ट १९९८ या दिवशी प्रदर्शित झाला. Shah Rukh Khan, प्रीती झिंटा आणि मनीषा कोईराला अभिनित हा चित्रपट त्या काळात प्रचंड गाजला होता. विषय वेगळा होता. मुख्य म्हणजे मांडणी वेगळी होती आणि सिनेमाचं संगीत अतिशय अप्रतिम होतं. या चित्रपटात सहा गाणी होती आणि प्रत्येक गाणं वेगळं होतं. संगीतकार ए आर रहमान यांनी प्रत्येक गाण्याला दिलेली ट्रीटमेंट आणि प्रयोग यांची आज देखील चर्चा होते.

या सिनेमातील एका गाण्यात एका ख्यातनाम पार्श्वगायिकेला गायला लावलं नाही तर केवळ बोलायला लावलं! खरंतर गाणाऱ्या व्यक्तीला गावू न देता बोलायला लावणं तसं अवघड असतं. कारण यामध्ये गाण्याची लय बिघडली जाऊ शकते. पण संगीतकार ए आर रहमान यांची एक्सपेरिमेंटल स्टाईल निराळी असते. त्यामुळे त्यांनी ‘दिल से’ या चित्रपटातील या गाण्यात हा प्रयोग केला आणि तो १००% यशस्वी झाला. आज हे गाणं आयकॉनिक सॉंग बनलं आहे. कोणतं होतं ते गाणं आणि काय होता नेमका प्रयोग? (Untold stories)
दिग्दर्शक मनीरत्नम कायम वेगळ्या विषयावर चित्रपट देत असतात. मग तो रोजा असो, बॉम्बे असो की गुरु… ‘दिल से’ (Dil Se..) या चित्रपटातील कथानक, त्याची मांडणी आणि त्याचे दिग्दर्शन अफलातून होते. या चित्रपटाला संगीत ए आर रहमान यांचे होते तर चित्रपटातील गाणी गुलजार यांनी लिहिली होती. या सिनेमातील एका गाण्यात ख्यातनाम पार्श्वगायिका कविता कृष्णमूर्ती यांना गायचे नव्हते किंबहुना संगीत दिग्दर्शक ए आर रहमान यांनी, “तू गाऊ नकोस. फक्त यातील काही संवाद बोलून दाखव!” असं सांगितलं. कविता कृष्णमूर्तीसाठी हा एक वेगळा प्रयोग होता. तिच्यासोबत या गाण्यात सोनू निगम यांचा स्वर होता आणि गाणं होतं ‘सतरंगी रे…’ हे गाणं तब्बल साडेसात मिनिटांचे होते.

यातील Kavita Krishnamurthy चा आवाज बऱ्याच जणांना ओळखू आलाच नाही. संगीत दिग्दर्शकाला देखील हेच अभिप्रेत होतं. या सिनेमाच्या तमिळ आणि तेलगू व्हर्जनमध्ये हे गाणं चित्रा आणि श्रीनिवासन यांनी गायलं होतं. ए आर रहमान संगीताच्या दुनियेत कायम वेगवेगळे एक्सपरिमेंट करत असतात त्यातलाच हा एक प्रयोग होता. ‘दिल से’ या चित्रपटातील अन्य गाणी देखील प्रचंड गाजली. आज देखील ती लोकप्रिय आहेत. चल छय्या छय्या छय्या छय्या, (सुखविंदर सिंग स्वप्ना अवस्थी) ऐ अजनबी तू भी कभी (उदित नारायण महालक्ष्मी अय्यर) जिया जले जान जले (लता मंगेशकर). (Dil Se..)
सतरंगी गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेचा किस्सा सांगताना सोनू निगम यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, “हे गाणं साडेसात मिनिटांचं असल्यामुळे रेकॉर्डिंग सुद्धा खूप वेळ चालले. मी अक्षरशः थकून गेलो होतो.” यात शेवटी एक ओळ त्याला गायची होती ‘मुझे मौत के गोद मे सोने दे….’ सोनू निगम म्हणाले, ”माझा गळा त्यावेळी इतका थकला होता की मला माझा आवाज क्रॅक होईल की काय अशी भीती वाटत होती. म्हणून मी ए आर रहमान यांना म्हणालो “मला दोन तास थोडीशी विश्रांती करू द्या’.” त्यांनी दोन तास विश्रांती घेतली. गळ्याला आराम दिला आणि नंतर ती ओळ गायली. सोनू निगम पुढे म्हणाले, “संगीतकार रहमान गायकाकडून वेगवेगळ्या आवाजात वेगवेगळे टेक घेत असतात आणि नंतर त्याचे एकत्रित संकलन करतात. त्यामुळे गाणं बनण्याची त्यांची प्रक्रिया ही सर्वार्थाने वेगळी असते पण फायनल प्रॉडक्ट जे बनतं ते खरोखर लाजवाब असते!”
==============
हे देखील वाचा : Ankhen : या सिनेमाचे पोस्टर एका सिगारेटच्या जाहिरातीवरून बनवले होते!
==============
यातील अत्यंत गाजलेलं चल छय्या छय्या छय्या छय्या हे गाणे Malaika Arora आणि शाहरुखवर चित्रित केलं होतं. तामिळनाडूमधील उटीच्या निसर्गरम्य परिसरात निलगिरी एक्स्प्रेसवर चित्रित केले होते. उटी, कुन्नूर आणि कोटागिरी दरम्यान सर्व शूट झाले. सतरंगी रे हे गाणे लडाखमध्ये शूट झाले तर जिया जले जान जले केरळमध्ये चित्रित केले. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात ‘दिल से’ (Dil Se..) सिनेमाला १० नामांकने मिळाली होती पैकी सर्वोत्कृष्ट संगीत (ए आर रहमान) सर्वोत्कृष्ट गीतकार (गुलजार), सर्वोत्कृष्ट डेब्यू (प्रीती झिंटा), सर्वोत्कृष्ट गायक (सुखविंदर सिंग), सर्वोत्कृष्ट छायाचित्रण (संतोष सिवन), सर्वोत्कृष्ट कोरियोग्राफी (सरोज खान) हे सहा पुरस्कार मिळाले.