
IIFA Awards 2025 :‘अमर सिंह चमकिला’ ‘पंचायत ३’ने गाजवला सोहळा!
जयपूरमध्ये संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री IIFA Awards 2025 साठी एकत्र पोहोचली होती. करीना कपूर-खान, शाहरुख खान, रेखा, माधुरी दिक्षीत, कार्तिक आर्यन अशा अनेक दिग्गज कलाकारांनी आयफा पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावत ग्लॅमर अधिक वाढवलं. एकीकडे भारताने २०२५ची चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्याचा आनंद सगळे साजरा करत होते; तर दुसरीकडे कलाविश्वातूनही वर्षभर केलेल्या कामाची पोचपावती IIFA पुरस्कारांमधून कलाकारांना मिळत होती. जाणून घेऊयात २०२५ च्या IIFA पुरस्कारावर कोणत्या, चित्रपट, वेब सीरीज आणि कलाकारांनी नावं कोरली आहेत.

IIFA Awards 2025 मध्ये Parineeti Chopra आणि दिलजीत दोसांझ यांच्या ‘अमर सिंह चमकीला’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला असून ‘पंचायत ३’ (Panchayat season 3) ही सर्वोत्कृष्ट वेब सीरीज ठरली आहे. याशिवाय, पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या क्रिती सेनॉनच्या ‘दो पत्ती’ चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री; तर ‘सेक्टर ३६’ मध्ये पहिल्यांदाच सायको किलरची भूमिका साकारणाऱ्या विक्रांत मेस्सीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देत गौरवण्यात आले आहे. (Best Actor And Actress for IIFA 2025)
IIFA Awards 2025 विजेत्यांची यादी पुढीलप्रमाणे
चित्रपट विभागातील विजेते :
सर्वोत्कृष्ट चित्रपट – अमर सिंह चमकीला
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – क्रिती सेनॉन ( दो पत्ती )
सर्वोत्कृष्ट अभिनेता – विक्रांत मॅसी ( सेक्टर २६ )

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – इम्तियाज अली ( अमर सिंह चमकीला )
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – अनुप्रिया गोयंका ( बर्लिन )
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – दीपक डोबरियाल ( सेक्टर ३६ )
सर्वोत्त्कृष्ट मूळ कथा – कनिका ढिल्लों ( दो पत्ती )
वेब सीरीज विभागातील विजेते :
सर्वोत्कृष्ट वेब सीरिज – पंचायत सीझन ३
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – श्रेया चौधरी ( बंदिश बँडिट्स सीझन २ )
सर्वोत्कृष्ट अभिनेता – जितेंद्र कुमार ( पंचायत सीझन ३)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – दीपक कुमार मिश्रा ( पंचायत सीझन ३)
===========
हे देखील वाचा : Indian Cinema : शुटींगसाठी लागली २३ वर्ष; वर्ल्ड रेकॉर्ड आणि बरंच काही….
===========
सर्वोत्त्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – संजीदा शेख ( हीरामंडी: द डायमंड बाजार )
सर्वोत्त्कृष्ट सहाय्यक अभिनेता – फैसल मलिका ( पंचायत सीझन ३)
सर्वोत्कृष्ट मूळ कथा – कोटा फॅक्ट्री सीझन ३
इतर महत्वाचे पुरस्कार
सर्वोत्कृष्ट रिॲलिटी किंवा नॉन-स्क्रिप्टेड शो – फॅब्युलस लाइव्स VS बॉलीवूड वाइव्स
सर्वोत्कृष्ट माहितीपट/डॉक्यु-फिल्म – यो यो हनी सिंह: फेमस
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत – अनुराग सॅकिया, इश्क है ( मिसमॅच्ड )

जयपूरमध्ये आयफा पुरस्कार सोहळा का झाला?
आत्तापर्यंत आयफा पुरस्कार सोहळा साऊथ अफ्रिका, मलेशिया, कॅनडा अशा जगातील विविध देशांमध्ये संपन्न होत होता. पण याचवर्षी तो जयपूरमध्ये का झाला याचं कारण जाणून घेऊयात…यंदाचं आयफा पुरस्कार सोहळ्याचं हे २५वं वर्ष आहे. याच विशेष कारणामुळे भारतीय चित्रपटसृष्टीची संस्कृती जपण्यासाठी आणि आपलं मुळ घट्ट धरुन ठेवण्यासाठी यंदाचा २५ वा आयफा पुरस्कार सोहळा भारतात संपन्न झाला. शिवाय, जयपूर या शहाला कला, संस्कृती, प्रथा यांची थोर परंपरा असल्यामुळे प्रत्येक कलाकाराला पुरस्कार स्वीकारताना नक्कीच आपलेपणा अधिक वाटला असेल. (IIFA 2025 held at Jaipur)