
Shreyas Talpade : श्रेयस तळपदेवर पैशांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल
अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) त्याच्या चित्रपट, मालिकांमुळे चर्चत आहेच पण सध्या तो एका मोठ्या अडचणीत अडकला आहे. श्रेयस तळपदेसह १५ जणांवर उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा श्रेयस्कर आरोप करण्यात आला आहे.‘द लोनी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट अँड थ्रिफ्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ (LUCC) या चिटफंड कंपनीच्या नावाखाली ग्रामीण भागातील लोकांना पैसे दुप्पट करुन देऊ असे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप करण्यात आल्याचं समोर आलं आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात… (Entertainment news)
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, या कंपनीने लोकांकडून पैसे गोळा करुन जिल्ह्यातून एकाएकी पळ काढला. यामुळे गावकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांनी पोलिस स्थानकात तक्रार केली आहे. तक्रार केल्यानुसार महोबा पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक) आणि ४०६ (विश्वासघात) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. (Shreyas Talpade fraud case)

गावकऱ्यांच्या आर्थिक नुकसान प्रकरणात अभिनेता श्रेयस तळपदेचं (Shreyas Talpade) नाव समोर आल्याने सगळ्यांचाच गोंधळ उडाला आहे. तक्रारीनुसार, कंपनीच्या जाहिरातीत किंवा प्रचारात श्रेयस याचा सहभाग असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप श्रेयस तळपदे याच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास सुरू असून सर्व आरोपींची भूमिका तपासली जाणार आहे. या प्रकरणात श्रेयस तळपदेसह समीर अग्रवाल, सानिया अग्रवाल, आरके शेट्टी, संजय मुदगिल, ललित विश्वकर्मा, दलचंद कुशवाह, सुनील विश्वकर्मा, सचिन रायकवार, कमल रायकवार, सुनील रायकवार, महेश रायकवार, मोहन कुशवाह, जितेंद्र नामदेव, नारायण सिंग राजपूत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bollywood masala)
==============
हे देखील वाचा : Shreyas Talpade मराठीसोबत हिंदी चित्रपट गाजवणारे मराठमोळे नाव श्रेयस तळपदे
==============
चिट फंड कंपनीबद्दल सांगायचं झालं तर, महोबा येथे ही चिट फंड कंपनी द लोनी अर्बन मल्टी स्टेट क्रेडिट अँड थ्रिफ्ट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ही कंपनी गेल्या १० वर्षांपासून सक्रिय होती. लोकांकडून पैसे घेऊन त्याची रक्कम दुप्पट तिप्पट करुन देऊ असा दावा करुन त्यांना स्किममध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडले जात होते. कंपनीच्या व्यवस्थापनाने ग्रामीण लोकांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये जमा केले आणि नंतर अचानक पळ काढला. (Bollywood news update)