Aaj Kay Banvuya: ‘आज काय बनवू या…? ‘मधुरा स्पेशल’ लवकरच येणार भेटीला; आता चवदार पाककृतींची रंगत

Suniel Shetty : अमिताभ बच्चन यांनी फोन नंबर देऊनही सुनीलने कधी….
हिंदी चित्रपटसृष्टीत आज सुपरस्टार असणाऱ्या अनेक कलाकारांनी फार स्ट्रगल केलं आहे. स्टार किड असो किंवा नसो ८०-९०च्या दशकातील कलाकारांच्या वाटेला स्ट्रगल आलं नसेल असं झालं नाही. या यादीतील एक कलाकार म्हणजे सुनील शेट्टी (Suneil Shetty). आज अभिनय, वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रात निवांत असणाऱ्या सुनील शेट्टीने बॉलिवूडमध्ये स्वत:चं अस्तित्व आणि स्थान निर्माण करण्यासाठी कष्ट घेतले होते. पण तुम्हाला माहित हे का अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा लहानपणीच नंबर मिळूनही त्याता फायदा कधी सुनीलने घेतला नव्हता.. काय होता किस्सा वाचा…(Bollywood news)

तर, सुनील शेट्टीने १९९२ मध्ये ‘बलवान’ (Balwan) चित्रपटापासून आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरु केली होती. पण फार कष्टाने खरं तर त्याला हा पहिला चित्रपट मिळाला होता. कारण, बऱ्याचवेळा रिजेक्शनचा सामना केललेया सुनीलला एका लेखक आणि चित्रपट समीक्षकाने तर त्याला परत घरी जा आणि इडली विक असं सांगितलं होतं. इतकंच नाही अनेक अभिनेत्रींनी सुनीलसोबत काम करण्यास देखील नकार दिला होता. मात्र, या सगळ्या अडचणींचा सामना करत कॅटरिंगमध्ये काम करणाऱ्या वीरप्पा शेट्टीचा मुलगा आज बॉलिवूडमध्ये मोठा स्टार आहे.(entertainment tadaka)

सुनील शेट्टीच्या (Suneil Shetty) बालपणीचे काही किस्से जाणून घेऊयात… तर सुनील शाळेत असताना अभ्यासापेक्षा क्रिकेटमध्ये जास्त रमायचा.. त्याच्या शाळेतील शिक्षक आणि मित्रांनाही तो मोठा झाल्यावर क्रिकेटर होईल असं वाटायचं… आणि सुनील शेट्टीचंही क्रिकेटर होण्याचं स्व्न होतं… पण ते पूर्ण झालं नाही आणि अभिनयाच्या ग्राऊंडवर येत काही काळानंतर सुनील शेट्टीने चौके, छक्के मारण्यास सुरुवात केली ती आजवर सुरुच आहे…(Untold stories)
==============
हे देखील वाचा : ‘यु आर सीनियर दॅन मी’ असे अमिताभ बच्चन सचिन यांना म्हणाले !
==============
अमिताभ बच्चन यांनी सुनीलला लहानपणी दिला होता नंबर
तर, सुनील शेट्टी जुहूमध्ये जिथे राहायला होता तिथे जवळच बऱ्याच चित्रपटांचं शुटींग सुरु असायचं… एकेदिवशी अमिताभ बच्चन अभिनेत्री झीनत अमान यांच्यासोबत तिथे शुटींग करत होते… आता अमिताभ बच्चन शुटींग करत आहेत हे पाहायला सुनील आपल्या मित्रांसोबत तिथे पोहोचला.. ज्यावेळी बच्चन साहेबांना भेटण्यासाठी सुनील जवळ जात होता तिथल्या गार्डने त्याला अडवले…पण हे सगळं पाहून अमिताभ स्वत: त्या गार्डला म्हणाले की,त्या मुलांना थांबवू नका, त्यांना येऊ द्या. (Amitabh Bachchan) अखेर प्रयत्नाअंती सुनील शेट्टीची अमिताभ बच्चन यांच्याशी भेट झालीच आणि या भेटीत अमिताभ यांनी सुनीला त्यांचा नंबरही दिला होता.. पण कधीच त्यांनी बच्चन साहेबांना फोन केला नाही… हा किस्सा सुनील शेट्टीनेच कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर सांगितला होता… (Entertainment update)

कालांतराने १९९२ मध्ये ‘बलवान’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केलेल्या सुनील शेट्टीने ‘दिलवाले’, ‘मोहरा’, ‘गद्दार’, ‘रघुवीर’, ‘रक्षक’, ‘धडकन’, ‘भाई’, ‘आगाज’, ‘हेरा फेरी’ असे अनेक चित्रपट केले. चित्रपटांमध्ये काम करुनही क्रिकेटर होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंत सुनीला आजही आहे. ३० वर्षांपेक्षा अधिक काळ काम केलेल्या सुनील शेट्टीने (Suneil Shetty Movies) १०० पेक्षा अधिक चित्रपटात कामं तर केलीच पण ‘भागम भाग’, ‘रक्त’, खेल आणि ‘द ग्रेट इंडियन रेस्क्यू’ अशा काही चित्रपटांची निर्मितीही केली आहे. त्याने निर्मिती केलेले काही चित्रपट तर कधी रिलीजही झाले नाही. यात ‘फौलाद’, ‘जाहिल’, ‘दि बॉडीगार्ड’, ‘कौरव’, ‘काला पानी’ असे अनेक चित्रपट होते. (Bollywood news update)