Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Kajol हिने ‘३ इडियट्स’ का नाकारला होता? १६ वर्षांनी केला

Karishma Kapoor ने अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप केल्यानंतर काही महिन्यांनीच….

Dilip Kumar यांनी ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हॉलिवूड चित्रपट नाकारलेला!

एकेकाळी ऑस्करमध्ये… आता बॉलीवूडमधून गायब ! कुठे आहेत Ashutosh Gowarikar

Airplane Crash : नाशिक-मुंबई प्लॅन क्रॅश; अभिनेत्याचा हात तुटला पण

Sushant Singh Rajput : अंतराळवीर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ताऱ्याची कथा!

Aamir Khan ३० वर्षांनंतर रजनीकांत यांच्या ‘या’ आगामी चित्रपटात दिसणार

Deepika Padukone : संदीप वांगा याच्या ‘स्पिरिट’मधून आता ‘या’ सुपरस्टारचा

Karishma Kapoor : बॉलिवूडमधला महागडा घटस्फोट ते अभिनेत्रीचा सौदा; मॅरेज

Ahemdabad Airplane Crash :विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू,

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Suraj Chavan : “गावातल्या मुलाला स्वीकारणारच नाही का?”; केदार शिंदेंचा ट्रोलर्सला थेट प्रश्न

 Suraj Chavan : “गावातल्या मुलाला स्वीकारणारच नाही का?”; केदार शिंदेंचा ट्रोलर्सला थेट प्रश्न
मिक्स मसाला

Suraj Chavan : “गावातल्या मुलाला स्वीकारणारच नाही का?”; केदार शिंदेंचा ट्रोलर्सला थेट प्रश्न

by रसिका शिंदे-पॉल 29/04/2025

मराठी बिग बॉस फेम सूरज चव्हाण याचा नुकताच ‘झापुक झुपूक’ (Zhapuk Zhupuk) चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षक कौतुक जरी करत असले तरीही चित्रपटाला आणि सूरजला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अशात आता दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी सोशल मिडियावरुन ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत गावातल्या मुलाला अभिनेता म्हणून आपण स्वीकारणारच नाही का? असा थेट प्रश्नच त्यांनी विचारला आहे. नेमकं काय म्हणाले? वाचा….(Marathi movies)

सूरज चव्हाणच्या (suraj chavan) ‘झापुक झुपूक’ चित्रपटाबद्दल केदार शिंदे यांनी इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या. केदार यांनी म्हटले आहे की, “सूरजच्या ज्या चुका असतील त्या सांगा. तो नट म्हणून आता सुरुवात करतोय. यापुढे त्याला मोठं करिअर आहे. सूरजचे फॅन्स कुठे  गेलेत तेच कळत नाहीये. ते ट्रोलर्सना का उत्तर देत नाहीयेत? बिग बॉस करत होतो तेव्हा सूरजची प्रसिद्धी बघितली होती. तळागाळातला माणूस सूरजच्या मागे होता.  आज नेमकी तीच माणसं कमी दिसत आहेत.” (Trending news)

पुढे केदार म्हणाले की, “अशा लोकांना वेळीच थांबवलं नाही तर या महाराष्ट्रातल्या गावखेड्यातला माणूस पुढे येणार नाही. ही गोष्ट एका शहरापुरती मर्यादीत नाही. ही गोष्ट एका शहरापुरती मर्यादीत राहू नये, यासाठी आपण सर्व मराठी माणसांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. गावातला मुलगा आपण स्वीकारणारच नाही का? मी त्याला स्वीकारला.”(Bollywood news)

केदार पुढे म्हणाले की,”मी आजपर्यंत जे १७ चित्रपट केले त्यात वेगवेगळ्या लोकांसोबत काम केलं. सोनाली कुलकर्णी कुठुन पिंपरी चिंचवडमधून येते का, मग तिला कशाला घ्यायचं?  असा विचार नाही केला. मग सिद्धार्थ जाधव कुठुन येतो तो बहुजन समाजातला आहे का, तर त्याला नाही घ्यायचं!  असा विचार कधीच माझ्या मनात नाही आला. ते पण शिकतच होते. आज त्यांची प्रगती दृष्ट लागण्यासारखी आहे. हळूहळू का होईना सूरज त्या लेव्हलला नक्की पोहोचेल.” (Entertainment news)

चित्रपटाच्या टीझरला ट्रोल केल्याच्या घटनेवरुन ते म्हणाले की, “पहिल्या टीझरला लोकांनी सूरजला खूप ट्रोल केलं. ट्रेलर आल्यावर थोडे त्यांचे सूर बदलले. सिनेमा पाहिल्यानंतर त्यांचे सूर बदलले पण तरीसुद्धा सूरजला ठोकायचंय. म्हणजे त्यांना वेगळं बोलायचंय हे कळतंय पण हा ठरवून काहीतरी वेगळंच बोलतंय. ही गोष्ट माणूस म्हणून मनाला लागण्यासारखी आहे. माणूस म्हणून आपण एकमेकांशी कनेक्ट करु शकलो नाही, तर आपण कपाळकरंटे आहोत हे माझं ठाम मत आहे”. (Marathi movie)

============

हे देखील वाचा :Hera Pheri 3: राजू, श्याम आणि बाबू भैया पुन्हा ‘हेरा फेरी’ करायला सज्ज!

============

दरम्यान, केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ या चित्रपटात सूरज चव्हाण जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Zhapuk Zhupuk movie cast)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Entertainment jio studios jui bhagwat kedar shinde marathi big boss Marathi Movie Milind Gawali Ritesh deshmukh Suraj Chavan zhapuk zhupuk zhapuk zhupuk Marathi movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.