Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Vicky Kaushal-Katrina Kaif यांनी अखेर आपल्या लेकाचं नाव केलं रिव्हील,

स्टार प्रवाहच्या ‘तुझ्या सोबतीने’ मालिकेला सुरु होण्याआधीच ब्रेक; १२ ऐवजी

Bigg Boss Marathi 6 मध्ये होणार  राजकीय नेत्याची एन्ट्री? रितेश भाऊने दिली

सत्तरच्या दशकात Dev Anand यांनी एका राजकीय पक्षाची स्थापना केली

Dharmaveer 2 मधील शिवरायांची ‘ती’ फ्रेम खास का आहे?

४००० कोटींच्या Ramayanaची धुरा ‘या’ मराठी माणसावर!

गौरव अमुलची काळजी कशी घेणार?; लवकरच Single Papa 2 प्रेक्षकांच्या

Hollywood मधून मराठीत रिमेक झालेले ‘हे’ चित्रपट माहिती आहेत का?

अखेर Shashank Ketkar ने स्क्रिन शॉट्ससह शेअर केलं 5 लाख

Border 2: ‘घर कब आओगे…’ तब्बल 28 वर्षांनंतर प्रसिद्ध गाणं

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Alka Kubal : “मी मार खाण्याचे पैसे घेतोय आणि तू…”; निळू फुलेंचा खास किस्सा

 Alka Kubal : “मी मार खाण्याचे पैसे घेतोय आणि तू…”; निळू फुलेंचा खास किस्सा
मिक्स मसाला

Alka Kubal : “मी मार खाण्याचे पैसे घेतोय आणि तू…”; निळू फुलेंचा खास किस्सा

by रसिका शिंदे-पॉल 12/05/2025

मराठी चित्रपटसृष्टीतील ऑल टाईम ब्लॉकबस्टर खलनायक म्हणजे निळू फुले. दमदार आवाज, उत्तम अभिनय शैली अशी ओळख असणारे निळू फुले (Nilu Phule) आजही अनेक नवोदित कलाकारांचे अभिनयातील दैवतच आहेत. निळू भाऊंनी खलनायकरी भूमिकांसोबत विनोदी अंगाकडे झुकतील अशाही भूमिका केल्या. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अलका कुबल (Alka Kubal) यांनी निळू फुले यांच्यासोबत काम करतानाचा एक रजंक किस्सा शेअर केला. काय आहे किस्सा वाचा…. (Entertainment news)

अलका कुबल यांनी ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी रिक्षावाली चित्रपटाचा किस्सा सांगताना अलका म्हणाल्या की, “निळू भाऊ जरी खलनायकाच्या भूमिका करत होते, तरी त्यांचं वाचन दांडगं होतं, त्यांचं बोलणं एवढं छान होतं की ऐकत राहावसं वाटायचं. जेव्हा निळू भाऊंना कळलं की मी बाबुराव मुंबरकर यांची नात आहे. त्यानंतर ते माझ्याशी अधिक जोडले गेले.” (Bollywood tadaka)

पुढे अलका म्हणाल्या, “आम्ही सतीश रणदिवेंचा ‘रिक्षावाली’ चित्रपट करत होतो. अगदी वडिलांसारखे माया करणारे असेच निळू भाऊ मला आठवत होते. तर त्या चित्रपटातील शेवटचा सीन असा होता की, मला निळू भाऊंना चिखलाने माखलेल्या चपलेने थोबाडीत मारायची होती, माझी हिंमतच होत नव्हती. अगदी अभिनयाची सुरुवात होती माझी आणि तो माझ्या १२ किंवा १४ वा चित्रपट होता असेल.” (Entertainment)

“तर झालं असं की, माझा हात त्यांच्या गालापर्यंत जायचा, पण मी मारायचे नाही, त्यामुळे खूप रिटेक झाले. सगळ्यांच्या लक्षात आलं की ही निळू भाऊंना चप्पल मारायला काही कबूल नाही. निळू भाऊंनी मला थांबवलं. चित्रपटात चिखलाने माखलेला ठसा गालावर पाहिजे होता, म्हणून ते मारणं गरजेचं होतं. निळू भाऊ मला बाजूला घेऊन गेले. ते मला म्हणाले की, अलका अगं तू ज्युनिअर आहेस, मी खूप सिनिअर आहे हे डोक्यातून आधी काढून टाक. मी मार खाण्याचे पैसे घेतोय, तू मारण्याचे पैसे घेतेस असं समज. एवढं कर. एक चांगली अभिनेत्री म्हणून हा हा सीन परफेक्टे दे. त्यांनी इतका धीर दिल्यामुळे तो सीन खूप छान झाला. निळू भाऊंनी त्या सीननंतर मस्त काम केलंस असं म्हणत मला शाबासकी दिली”,अशी खास आठवण अलका कुबल यांनी शेअर केली. (Marathi movies untold stories)

================================

हे देखील वाचा: Ind vs Pak conflict: “आपल्या देशाच्या खऱ्या हिरोंना सलाम”; कलाकारांनी केलं सैन्याचं कौतुक

=================================

अलका कुबल यांनी निळू फुले यांच्यासोबत ‘पुढारी’, ‘मोहिनी’, ‘पोरीची धमाल बापाची कमाल’, ‘दुर्गा आली’, ‘फट फजिती’ या चित्रपटांमध्ये कामं केली. तर अलका यांनी आपल्या अभिनयाचा श्रीगणेशा १९८१ साली आलेल्या ‘चक्र’ या हिंदी चित्रपटातून केला होता. आणि त्यानंतर १९८४ मध्ये ‘लेक चालली सासरला’ या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.  सध्या त्यांचं ‘वजनदार’ हे नाटक रंगभूमीवर सुरु असून बऱ्याच वर्षांनी अलका कुबल रंगभूमीवर परतल्या आहेत. (Alka Kubal Movies)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: alka kubal Bollywood bollywood masala bollywood tadaka Entertainment marathi celebrity news Marathi Movie marathi movies nilu phule rikshawali movie vajandar marathi natak
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.