Lalit Prabhakar : एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट; ‘प्रेमाची

Raid 2 : अमय पटनायकची ७५ वी ‘रेड’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी!
बॉलिवूडमध्ये सध्या सीक्वेल चित्रपटांची आगामी काळात रेलचेल असणार आहे. यापैकी ‘रेड २’ (Raid 2) चित्रपट १ मे महाराष्ट्र दिनी प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी तुफान गर्दी करत चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद दिला. आय.आर.एस ऑफिस अमय पटनायक (Ajay Devgan)ची ७५ वी रेड बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करु शकली आहे. शिवाय बऱ्याच वर्षांनंतर रितेश देशमुखला (Riteish Deshmukh) खलनायकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी देखील प्रेक्षक उत्सुक होतेच. आणि विशेष म्हणजे रितेशने त्याच्या चाहत्यांना नाराज केलं नाही आहे. दरम्यान, चित्रपटाचे १५० कोटींचा आकडा पार केला असून २०० कोटींकडे वाटचाल सुरु आहे. (Bollywood news)

रेड २ चित्रपटाचं बजेट ४८ कोटी होतं आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बजेटच्या तिप्पटीने कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार रेड २ चित्रपटाने पहिल्या दिवशी १९.२५, दुसऱ्या दिवशी १२ कोटी, तिसऱ्या दिवशी १८८ कोटी, चौथ्या दिवशी २२ कोटी, पाचव्या दिवशी ७.५ कोटी, सहाव्या दिवशी ७ कोटी, आठव्या दिवशी ५.२५ कोटी कमवत पहिल्या आठवड्याच्या शेवटी ९५.७५ कोटी कमावले होते. त्यानंतर नवव्या दिवशी ५ कोटी, दहाव्या दिवशी ८.२५ कोटी, अकराव्या दिवशी ११.७५ कोटी, बाराव्या दिवशी ४.८५ कोटी, तेराव्या दिवशी ४.५ कोटी, चौदाव्या दिवशी ३.२५ कोटी, पंधराव्या दिवशी ३ कोटी कमवत दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी ४०.६ कोटी कमावले. पुढे सोळाव्या दिवशी३ कोटी, सतराव्या दिवशी ४.२५ कोटी, अठराव्या ५.६५ कोटी, एकोणिसाव्या दिवशी १.८५ कमवत आत्तापर्यंत एकूण १५१.१ कोटींची कमाई केली आहे.(Raid 2 box office collection)
==================
हे देखील वाचा : Ajay Devgan : ‘अजय ते विजय साळगांवकर’;बॉलिवूडमध्ये 9 मराठी पात्र साकारणारा देवगण!
==================
दरम्यान, ‘रेड २’ (Raid 2) चित्रपटात अजय देवगणसह रितेश देशमुख, सौरभ शुक्ला, रजत कपूर, वाणी कपूर, अमित सियाल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तसेच, चित्रपटाच्या शेवटी तिसऱ्या भागाची देखील हिंट देण्यात आल्यामुळे लवकरच अमय पटनायक ७६वी रेड मारेल अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. आगामी काळात अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्या वैयक्तिक चित्रपटांचे सीक्वेल्स येणार असून चाहते आतुरतेने आगामी चित्रपटांची वाट पाहात आहेत.(Bollywood upcoming sequels)